गब्बरसिंग...
गब्बरसिंग...
एक काळ शोले चित्रपटाने गाजवला. प्रत्येक व्यक्तिरेखा सडेतोड न्याय त्या पात्रास देऊन गेली. त्याच चित्रपटातील गब्बरसिंगने मनावर कायमचा ठसा उमटवला आणि जसे कर्तव्यावरचे प्रेम तसेच शत्रुत्वावरची पकडही कसोशीने शाबूत ठेवून आपली भूमिका अगदी प्रत्येकाच्या अंतर्मनावर कोरली. अमजद खानसारख्या नवख्या पण कसदार अभिनयसंपन्न व्यक्तीने त्या भूमिकेचे सोने केले. आपल्या शत्रूची नस ओळखून घाव करणे म्हणजे काय हे त्या भूमिकेने जाणवून दिले. त्याच्या तोंडचे संवाद आणि त्या संवादाची परिणामस्वरूप होणारी फेकही खरोखरच अवर्णनीय होती. अरे ओ सांभा काय किंवा कितने आदमी थे... सारेच अगदी काटेकोर आणि चपखल बसणारे. असे अनेक संवाद आजही मुखोद्गत आहेत हेच त्या खलनायकी भूमिकेचे यश म्हणावे लागेल...
बेटा सो जा, नहीं तो गब्बरसिंग आ जायेगा.. हे दरारा निर्माण करायचे वाक्य लीलया पेरले गेले... इतकेच म्हणावे वाटते की,
जे खरोखरच अंतरी दाटून येते
गब्बरसिंगकडे मन झेपावते
जेव्हा जेव्हा शोलेची आठवण होते...
