" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Children Stories Inspirational

4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Children Stories Inspirational

एलियनची दुनिया..

एलियनची दुनिया..

2 mins
150


एलियन बद्दल मनात खूपच उत्कंठा होती.खरच ते कुठे असतील ?ते कधी पहायला भेटतील का? त्यांचं जग कसं असेल? असे कितीतरी प्रश्न मनात यायचे आणि वाटायचं एलियनला खरंच भेटायला हवे नी तो योग आला. एलियनने माझं मन ओळखले.नी एलियन ने थेट मला फोन केला.एलियन फोन करून बोलू लागले नी म्हणाले, आमच्या बद्दल तुमच्या मनात जे काही विचार आहेत, आमचं ही तुमच्या बद्दल तसेच आहे.आम्हालाही वाटतं माणसांचं जग खरंच कसं असेल? माणूस वागतो कसा नी जगतो कसा ? माणूस आपल्याला जवळून पहायला, बोलायला मिळेल का? तुम्ही गुगलवर जे काही सर्च केलात किंवा जी माहिती तुम्हाला हवी होती ते आम्हाला समजले आहे म्हणून तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती माहिती व्हावी नी सर्व शंकांचे निरसन व्हावे यासाठी आम्ही तुमची सर्व व्यवस्था करुन तुम्हाला आमच्या दुनियेत घेऊन येणार आहोत, ज्यामुळे एकमेकांबद्दल एकमेकांना पूर्ण माहिती मिळेल.ज्ञान वाढेल व आपसात संबंध निर्माण होतील...

    एलियन चं हे सगळं ऐकून गोंधळात पडलो, काय खरं काय खोटं काही कळत नव्हतं.खरच आपण एलियनशी बोलत आहोत का? आपली एलियनशी भेट होईल का? आपणास जावे लागेल का ? नी एलियन आपणास घेऊन जातील का? या विचारात मी होतो.या बद्दल कुणाला काय बोलावे,घरी काय सांगावे ? काही सांगावे की नाही? असे कितीतरी प्रश्न मनात येत होते विचार करत होतो .नी पुन्हा फोन आला.. आपणास घेऊन जाण्याची पूर्ण व्यवस्था झाली आहे.मनात कोणत्याही शंका न आणता तयार राहावे.नी सर्व सुचना मला मिळत गेल्या.अर्ध्या रात्री माझ्या घरासमोर ते एलियन यान येऊन उभे राहिले नी दोन एलियन थेट माझ्यासमोर येऊन उभे राहिले.मला म्हणाले आम्ही घेऊन जाण्यासाठी आलोत.आमच्याबरोबर चालावे . आपणास कोणताही धोका होणार नाही.मी निर्णय घेण्याआधी च थेट त्यांच्या सोबत चालायला लागलो नी त्या यानात जावून बसलो.वाऱ्याच्या वेगाने यान निघाले नी मला काही कळण्याच्या आधीच ते यान एलियन भुमित जाऊन पोहोचले.

    एलियन ची दुनिया म्हणजे सर्व काही अजब गजबच होती.. मला सर्व काही समजेल असं ते माझ्याशी बोलायचे, माझ्या मनातील सर्व काही ते ओळखायचे..त्यांची ती आगळी वेगळी प्रगती नी आगळीवेगळी दुनिया पाहून मी पूर्णपणे चकितच झालो... मला माणसाला एकच सांगायचे आहे, माणसापेक्षा एलियन कितीतरी पटीने श्रेष्ठ तर आहेतच पण माणसात जे दूर्गुण आहेत तो एकही दूर्गुण एलियन मध्ये पहायला मिळत नाही.. भविष्यात एलियन राज जर आले तर माणसाला नवल वाटायला नको..

  मी माणसाला एकच सांगेन तुम्ही ज्याला प्रगती म्हणता,ती खरी प्रगती आहे का? प्रगती अशी करा की पश्चात्ताप करण्याची वेळ आली नाही पाहिजे.प्रगती कशाला म्हणतात ते निट समजून घ्या नी आपण आपला विध्वंस तर करून घेत नाही ना याचा विचार करावा.

  माणसाने प्रगती जरुर करावी पण ती शास्वत असली पाहिजे.प्रगती प्रगतीच असली पाहिजे.एलियनला पाहिल्यावर माणसाला प्रगती कशाला म्हणतात ते ही कळेल आणि माणूस स्वतःला जो शहाणा समजतो त्याला त्याची ओळखही होईल.. माणसाच्या खऱ्या प्रगती साठी मी ह्या धर्तीवर एलियन ला घेऊन येतोय..मी काही चूक केलोय असं मला कोणीही म्हणू नये..

  येतोय मी एलियन ला च घेऊन येतोय..वाट पहा.. तुम्ही नक्कीच स्वागत कराल...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract