एकत्र कुटुंब पद्धतीचा होतोय ऱ्हास
एकत्र कुटुंब पद्धतीचा होतोय ऱ्हास
या २१व्या शतकात संस्कार, मूल्य नी नीतीमत्तेचा विचार करताना कुटुंब संस्थेच महत्त्व सर्वांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे. आईला आई नी बापाला बाप न म्हणणारी आजकालची संकरीत औलाद पाहिलं की खूपच वाईट वाटायला लागतं. या सगळ्याची कारणे पहात असताना वाटतं एकत्र कुटुंब पध्दतीचा होत असलेला ऱ्हास खरच खूप वाईट आहे... या एकत्र कुटुंब पध्दतीच्या र्हासाचे परीणाम समाजावर खूपच वाईट आहेत.
कुटुंब पध्दतीचे कार्य पाहिल्यावर लक्षात येतं की,व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या उध्दारासाठी ही एकत्र कुटुंब पध्दती आवश्यकच आहे असे नसून ते एक वरदान आहे. संस्कार, नातेसंबंध, पालन पोषण, मूल्येसंवर्धन,अपंग, अनाथ, विधवा,व्रध्द छोटी मूले,स्त्रिया इत्यादीचे संरक्षण व अन्य गोष्टींचा विचार करता खरचं एकत्र कुटुंब पध्दती केवढे मोठे वरदान होय..!
या एकत्र कुटुंब पध्दतीचा होत असलेला र्हास ही आजच्या काळात नुसती समस्या नसून महा समस्या आहे. हम दो हमारे दो । या संस्कृतीमुळे नातीगोती संपूनच गेली... आजी आजोबांचे लाड ,संस्कार, गोष्टी, तो गोडगोड पापे आत्या, काका, काकू,चुलत भाऊ आतेभाऊ,मामेभाऊ ही सारी गंमत जंमत नष्ट च झाली, दिपवाळी लाडू, फटाके, नवे कपडे यालाही या विभक्त कुटुंब पध्दतीने महत्त्व उरले नाही.
माणसाला पैसा प्यारा झाली नी नाती संपूनच गेली. आईबाबांसाठी वृद्धाश्रमाची गरज भासू लागली... किती हे वाईट... एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास हे संकट नव्हे, महासंकटच आहे.
