veena joshi

Children

4.4  

veena joshi

Children

एक कप दुधासाठी

एक कप दुधासाठी

2 mins
498


शालूला आज देवाचा खूप खूप राग आला होता. तिच्या वाटेला आलेले दुःख उपासमार नापिकी ती सहन करत होती. पण एकुलत्या एक मुलासाठी तडजोड करायला ती तयार नव्हती. एक कप दुधासाठी तिच्या बाळाने आज खूप हट्ट धरला होता, मार खाल्ला होता, रडून रडून आकांत केला होता. दूध दिले नाही म्हणून तो न जेवता तसाच झोपला पण जेवला नाही. परमेश्वराला तिने विनवणी केली एका तरी डब्यात पैसे सापडू दे. सगळे डबे तपासले पण तिला एकाही डब्यात पैसे सापडले नाहीत. शेवटी हताश होऊन निजलेल्या बाळाकडे दुःखी अंतकरणाने बघत राहिली.


      इतक्यात शेजारच्या काकूंनी कडी वाजवली. शालू ए शालू! शालूने कडी हळूच आवाज न करता उघडली. काकूच्या हाती दुधाने भरलेले भांडे पाहून

शालूच्या डोळ्यात चमक आली. पण लगेच तिच्या मनात आले कशावरून आपल्यासाठी असेल. काकू म्हणाल्या, अगं शालू हे दूध घे तुला तर माहीतच आहे आमच्या गाईने वासरू दिले! आज भरपूर दूध दिले गाईने. अजून उकडे लागलेले नाहीत. घे तुझ्या बाळासाठी गाईचे दूध पोष्टिक असते. असे म्हणताच शालूच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. 


काय झाले गं शालू

अहो काही नाही काकू जरा डोळ्यात कचरा गेला असे म्हणून तिने टाळले


काकू गेल्यावर तिने चटकन दूध गरम करायला ठेवले. साखर घातली नि बाळा जवळ घेऊन आली. एव्हाना बाळ उठून सगळे विसरला होता. तिने लगेच त्याच्या तोंडावर हात फिरवून त्याला बशीने चांगले कपभर दूध पाजले. दूध पाहून बाळाचा चेहरा आनंदाने फुलला होता. त्याने आवडीने चुटूचुटू दूध पिले व आनंदाने नाचू लागला.


     शालू देवाजवळ गेली नि देवाची क्षमा मागितली... मदतीला धावून आल्याबद्दल. एव्हाना तिला कळून चुकले होते की एक कप दुधासाठी आज बाळाला आपण मारायला नको होते... त्या बाळ जिवाची काय चूक...


Rate this content
Log in

Similar marathi story from Children