The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

veena joshi

Tragedy Others

2.0  

veena joshi

Tragedy Others

गुरु महिमा...!!🙏

गुरु महिमा...!!🙏

7 mins
1.4K


"गुरुविण दुसरे मोठे दैवत जगात असणे असंभव

आचार्य देवो भव 

आचार्य देवो भव" 🙏

    गुरूंची आठवण येताच सोहमचे नेत्र पाणावले आज तो केवळ गुरूंच्या आशीर्वादाने कलेक्टर पदावर विराजमान होता आणि एका शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करी त होता of course शेवटचा टॉपिक नेहमी प्रमाणे होता गुरु !!टाळ्याच्या कडकडाटाने तो भानावर आला नि नेहमी प्रमाणे त्याने आपल्या रुमालाने आपले नेत्र टिपले एक तरुण तडफदार निगर्वी कलेक्टर म्हणून पंचक्रोशीत आज त्याचे नाव होते गरीब श्रीमंत कोणीही आपल्या समस्या घेऊन बिनधास्त त्याच्या केबिनमध्ये यायचे आणि समस्येचे निराकरण करूनच बाहेर पडायचे मनोमन सर्वांचे आशीर्वाद त्याला मिळायचे पणं अशावेळी आई बाबांची आठवण त्याला खूप सतावत असे आणि तो अस्वस्थ होऊन त्याचे मन भूतकाळाचे वेध घेई.

    ...   सोहम चे आजोबा बाबासाहेब देशमुख हे गावातील एक प्रतिष्ठित नागरिक होते शेतीवाडी. संत्र्याच्या बागा .... पण व्यक्तिमत्व जबरदस्त गावातील कोणत्याही व्यक्तीने यावे अडचणी सांगाव्या आणि समाधानी होऊनच परतावे मग पैसा असो वा इतर समस्या बरेच दिवस त्यांना मुलबाळ नव्हते काही वर्षांनी श्री गजानन महाराजांचा कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला केवढा आनंद झाला  अवर्णनीय !! नाव गजानन ठेवण्यात आले आईबाबांनी आपल्याच प्रमाणे त्यास संस्कारक्षम बनवले शिकून सवरून मुलाला आपल्या पाया वर उभे केले कारण त्याला शेतीत किवा धंद्यात इंटरेस्ट नव्हता तर शिकून त्याला मोठे व्हायचे होते आणि स्वबळावर तो झाला

     नोकरीला लागताच तो शहर विभागात सेटल झाला मात्र सणवार लग्नकार्य या वेळेस तो गावी यायचा काही वर्षाने त्याला एक गोंडस मुलगा झाला तो म्हणजे सोहम पणं अचानक आईचे निधन झाल्यामुळे काहीएक न ऐकता मुलाने बाबांना गावी न ठेवता स्वतः जवळ आणि वडील देखील काही कारण न दाखवता तयार झाले कारण सहचारिनी गेल्यामुळे त्यांना आता एवढ्या मोठ्या वाड्यात करमेनासे झाले


सोहम आता आई बाबा व आजोबा सोबत एका मोठ्या शहतात राहत होता एका सधन कुटूंबात जन्मलेला तो एकुलता एक मुलगा होता गावी आजोबांचे मोठे घर नोकर चाकर शेती वाडी बराच मोठा पसारा होता पण आजोबा मात्र आजी गेल्या पासून शहरातच मुलाजवळ राहत होते गावचा सर्व कारभार त्यांनी गडी माणसाच्या भरवशावर टाकला होता आणि आजोबांची तसी गावात ख्याती पण होती जातीयवाद गरीब श्रीमंत राजकारण या पासून ते कोसो दूर होते

गरीब असो वा श्रीमंत केव्हाही ते मदतीला तयारच होते अर्थात आपल्या एकुलत्या एक मुलाला पण त्यांनी तसेच घडविले होते एवढे सर्व असूनही त्यांना किंचितही ग ची बाधा नव्हती

      सोहम त्यांचा नातू आता सहावीत होता. अभ्यासात अत्यंत हुशार मुलगा म्हणून तो गणला जायचा एका नामांकित शाळेत तो दाखल होता एकंदर कुटूंबच शांत सोजवळ व इतरांना मदत करणारे होते

सोहमच्या आई बाबा नि आजोबांनी लहानपणापासूनच त्यावर चांगले संस्कार घातले होते जसे नियमित अभ्यास देवाजवळ सांजवात शुभंकरोती श्लोक मोठ्यांना नमस्कार मोठ्यांचे आदरातिथ्य घरी येणारे तर त्याच्या लाघवी स्वभावा नी भाराऊन जात हे सगळे तो अगदी लहानपणापासूनच शिकला आणि बाबा ऑफिस मधून आले की तो बाबांजवळ बसून अभ्यास करायचा आजोबा देखील त्याला फावल्या वेळात सुंदर सुंदर संस्कारी,धाडसी तर कधी मनोरंजनात्मक गोष्टी सांगायचे असे हे कुटूंब होते

     सोहमला भूगोल विषयात फार इंटरेस होता नद्या पर्वत डोंगर यावर तो बाबांशी बोलायचा.


असा हा गुणी मुलगा आपल्या पोटी जन्मल्या मुळे ते फार समाधानी होते छोट्या गोष्टींच्या पुस्तकांनी तर कपाट भरले होते

एक दिवस सोहम बाबांना म्हणाला बाबा गंगा नदी खूप मोठी न हो!! किती मस्त पाणी असेल बाबा ! वाहताना तिचा खळखळआवाज पणं होत असेल गंगेवर जाऊन लोक अंघोळ करतात म्हणे?

बाबांना मोठे नवल वाटले इतक्या लहानपणी याला किती माहिती नक्कीच हा वाचनाचा परिणाम बाबाचा उर अभिमानाने भरून आला ते म्हणाले बाळ पहायची का तुला गंगा नदी? हो बाबा!!मला आवडेल पहायला रात्री बाबानी ही गोष्ट वडील व बायकोच्या कानावर घातली आणि ऋषीकेश हरिद्वारला जायचा प्लॅन केला मग काय सोहमचा आनंद गगनात मावेना ट्रेन झाडे झुडपे गावे पहायला मिळतील मजाच मजा तो खूप हरखून गेला

       ठरल्या प्रमाणे मंडळी प्रवासाला निघाली सोहमला खूपच छान वाटत होते जाताना तो खिडकी जवळ बसला झाडे झुडपे पर्वत नद्या हे पाहून तो जाम खुश झाला सकाळी सकाळी ते हरिद्वारला पोहोचले नदी च्या काठावर मंदिर पाहून सोहम हरखून गेला लोक काठावर अंघोळ करत होते नदीत दिवे सोडत होते पण सोहमला मात्र नदीचे पात्र पाहून मजा वाटत होती लांबच लांब नदी भरपूर पाणी नि मोठे पात्र अहाहा!! अगदी पुस्तकातल्या सारखे आईने काठावर सोहमला अंघोळ घातली थंडगार पाण्याने शिरशिरी उठली तो आईच्या अंगावरही पाणी उडवू लागला आई म्हणाली बाळ तू आता काठावर थांब मी चटकन अंघोळ करून येते सोहम थांब ना आई! थांब ना आई !करत मजा घेत होता नंतर तोकाठावर उभा राहून आजूबाजूचे निरीक्षण करत होता इतक्यात त्याला आईचा मोठं मोठा आवाज ऐकू आला तो जाम घाबरला अरे अरे हे काय !!

नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते आईचा पाय घसरून आई पाण्यात वाहत जाऊ लागली तिला धरण्यासाठी बाबा पण मागे गेले पण पाण्याचा फोर्स एवढा होता की त्यामुळे दोघांनाही जलसमाधी मिळाली. सोहम व आजोबा खूप रडू लागले पण काही उपयोग झाला नाही शेवटी आजोबा सोहमला घरी परत घेऊन आले पाहुण्या मध्ये 15 दिवस निघून गेले तोच तो विषय ऐकून सोहम भयभीत झाला डॉक्टर नी त्याला दुसरीकडे कुठे घेऊन जायचा सल्ला दिला कारण त्याने तो प्रसंग डोळ्याने पाहिला होता. आता काय करावे आजोबा समोर मोठा प्रश्न उभा राहिला सोहम काहीही बोलेना शेवटी आजोबांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला सोहम व ते गावी आले सोहम अगदी अबोल झाला तासन्तास अंगणात बसून राहू लागला रोजचे सर्व कार्यक्रम बंद झाले आजोबा सोबतही तो जास्त बोलेना.

    आजोबांनी त्याचे नाव गावच्या शाळेत टाकले पण शाळेतील मुले तेथील वातावरण शाळा त्याला काहीच भावेना शहर आणि गाव यातील फरक होता तो बहुदा. त्याचे मन शाळेतही लागेना 

त्याचे नशीब मात्र फार बलवत्तर होते

त्याच्या वर्गाला थोडेसे वयस्कर असे छान शिक्षक होते हाडाचे शिक्षक ते! सोहम शाळेत कुणात मिसळत नसे बोलत नसे एकटाच शून्यात पाही हे त्या शिक्षकांनी ताडले व त्याची माहिती काढली तो एक अत्यन्त हुशार श्रीमंत घरचा मुलगा असल्याचे त्यांना कळले आणि इथे का आला तेही कळले त्यांनी मनात काहीतरी ठरविले.

     दुसऱ्या दिवशी सरानी सोहम इकडे ये बाळ !असे म्हणताच तो एकदम दचकला काय सर !! तुला अभ्यासा व्यतिरिक्त कशा कशात आवड आहे सांग बघू ?दोघांच्या बोलण्यावरून सोहम ऑल राऊंडर असल्याचे सरांच्या निदर्शनात आले मग सरांनी चंग बांधला ते कामाला लागले याच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे हे त्यांनी आपल्या अनुभवाने ताडले ते लगेच कामाला लागले

शाळेचे ग्रंथालय 

शालेय परिपाठ

श्लोक पाठांतर इत्यादी कामे सरांनी त्याच्यावर सोपवली त्याला आणखी दोन मुले सोबत दिली

मग काय नाही म्हणणे तर त्याला माहीतच नव्हते! तो कामाला लागला.


  आज सोहम दप्तर घेऊन बसलेला पाहून आजोबांच्या डोळ्यात पाणी आले त्यांना मागील दिवस आठवले आपला मुलगा व नातवाचे बोलणे त्यांचे हसणे खेळणे कारण नातू होताच तसा कौतुकास्पद पण त्यांनी दर्शवले नाही हळूहळू सोहम आपल्या कामात गर्क दिसायला लागला पण पूर्वीचे हास्य मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसे ना आजोबांनी सरांची भेट घेतली त्यांच्याशी बोलले होईल म्हणाले ते पण वेळ लागेल आता धीर धरण्या शिवाय आजोबा जवळ उपायच नव्हता पण सरांचे बोलणे ऐकून सर्व ठीक होईल असा आजोबा ना विश्वास वाटू लागला

     काहीच दिवसात सोहम मध्ये इतका बदल दिसू लागला की जणू संपूर्ण शाळाच त्याने काबीज केली प्रत्येक क्षेत्रात त्याचाच वर्ग पुढे दिसू लागला तो आल्या पासून जणू प्रत्येक वर्गा त शिक्षणाची चुरस लागली होती केवळ शाळेतील कार्यक्रम नव्हे तर स्पर्धा परीक्षा जसे स्कॉलरशिप नवोदय या मधे देखील चुरस सुरू झाली ही बाब शाळेचे मुख्य अध्यापक तसेच बॉडी मेंबर च्या नजरेतून सुटली नाही  कोणत्याही मुलांच्या अडचणी तो सोडउ लागला कच्च्या मुलांला मार्गदर्शन करू लागला पूर्ण वेळ त्याने स्वतःला शाळेच्या कामात झोकून दिले इतके की आता सरांचे पण त्याच्या शिवाय पान हलेना

दिवस जात होते शाळेला एक नवीन स्वरूप आले होते तेही एका मुलामुळे!! शाळेसाठी ही फार अभिमानास्पद गोष्ट होती पाहता पाहता ही गोष्ट पंच क्रोशित पसरली कारण आजोबाही पंच क्रोषित पसरलेले एक व्यक्तिमत्व होतेच शाळेत गावात सोहम चे कित्तेक सत्कार झाले स्कॉलरशिप नवोदय या सारख्या परीक्षेत तो पहिला आला होता सोहम आता 10वीला गेला. भरपूर अभ्यास, व्यायाम, खेळ चेहऱ्यावर बुद्दीचे तेज इतक्या लहान वयात एक अनोखे व्यक्तिमत्व सगळ्यांच्या समोर आले. पाहता क्षणी एक वेगळीच छाप त्याची इतरांवर पडे. परिक्षेचा दिवस उजाडला आजोबा सगळे सर आई बाबा यांच्या फोटो ला नमस्कार करून सोहम परीक्षा केंद्रावर गेला 

पण आज तो फारच बे चैन होता. आईबाबांचा चेहरा राहून राहून त्याच्या

 डोळ्यासमोर येत होता जणू ते म्हणत होते, "भिऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत "सगळे पेपर्स मात्र उत्तम गेले मेहनत आणि सर्वांच्या शुभेच्छा चे फळ असावे बहुदा आता रिझल्ट लागेपर्यंत सोहमने अवांतर पुस्तकात स्वतःला झोकून दिले

      पहाता पहाता रिझल्टचा दिवस उगवला सोहम जिल्ह्यातून पहिला आला होता शाळेनेच नव्हे तर संपूर्ण गावाने सोहमला डोक्यावर घेतले सत्कार भेटवस्तू मात्र याचे सोहमला काहीच वाटले नाही त्या दिवशी त्याने सर्व वस्तू आईबाबांच्या फोटोपुढे ठेवल्या आणि आजोबांना आलींगन देऊन तो खूप खूप रडला आता त्याला पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरी जाणे भागच होते आजोबा ना त्याला सोबत न्यावे वाटले पण ते शक्य नव्हते शेवटी आजोबांना गावच्या भरवशावर ठेऊन तो उच्च शिक्षणासाठी निघाला निघतांना सर्वाना त्याने नमस्कार केला पण सरांना आलींगन देऊन तो खूप खूप रडला आणि बोलला सर आज तुमच्या मुळेच मी इथवर पोहोचलो तुम्ही नसते तर!! सरानिही त्याचे डोळे पुसले व तू फार मोठा व्यक्ती होशील असे वक्तव्य केले कुठलीही अडचण आल्यास हे तुझे सर तुझ्या पाठीशी वडीलान प्रमाणे उभे आहेत हे लक्षात ठेव सरांचे हे बोल ऐकून त्याच्या मनाला फारच उभारी आली सगळ्यांचा साश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघाला आई बाबा हे पहिले गुरू व शाळेतील गुरूचा प्रत्यय त्याला आलाच होता त्याचे हात आपोआप जोडले गेले

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy