veena joshi

Others

3  

veena joshi

Others

गैरसमज

गैरसमज

10 mins
1.6K


   आज खूप दिवसांनी आपला मित्र शशी भेटल्यामुळे मनोहरला खूप खूप आनंद झाला दोघांनी अगदी रस्त्यावरच गळाभेट घेतली राघव आपल्या बाबाकडे बघतच राहिला कारण बाबांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या या बाबांच्या मित्राला त्याने कधी बघितले नव्हते इतक्यात समोरून एक व्हॅन आली राघव ने समय सूचकता राखून दोघांनाही रस्त्याच्या बाजूला ओढले. सॉरी बाळ दोघांच्या ही तोंडून एकच वाक्य निघाले.

    

अरे पण मनोहर तू इतका रोड कसा रे झालास !! सहा वर्षां पूर्वी तर आपण एका लग्नात सहकुटुंब भेटलो होतो न! काय रे राघव काय झालय काय तुझ्या बाबाला!! राघव ची नजर एकदम खाली गेली. काहीतरी अघटीत घडल्याचे शशीच्या लक्षात आले बरे जाऊ दे! तू इकडे कसा काय? मुंबईवरून केव्हा व कशासाठी आलास अरे हो हो सांगतो सगळे जरा दम घे. कुठे तरी बसू या का? अरे कुठेतरी कशाला जवळच माझे घर आहे चल अरे वा मस्त!चल मग अवघ्या १५ मिनिटातच शशीचे घर आले घर कसले छोटासा सुंदर बंगलाच होता तो !!


आता प्रवेश करताच सविता ए सविता कोण आलय बघ तरी!! अगबाई भाऊजी का! या! या !आणि ताई नाही आल्यात ताईचे नाव घेताच दोघांच्याही नजरा खाली गेल्यात

नक्कीच काहीतरी अघटीत घडलय हे शशिने ताडले. दोघा मित्रांनी मस्त गप्पा मारल्या राघव जॉईन व्हायला आला हे कळलं शशीच्या घराजवळील लॉज मधे ते लोक उतरले होते शशीने राहण्याचा खूप आग्रह केला पण पुन्हा केव्हातरी असे म्हणून त्या दोघांनी निरोप घेतला ते गेल्यावर मात्र शशीच्या मनात सारखे वाईट विचार घोळत होते का असा झाला असावा आपला मित्र? या विचाराने त्याला चैन पडत नव्हती काही दिवस शशिला खूप त्रास झाला .पणं मुलाला विचारण्याची हिम्मत होई ना.


       शशीच्या ओळखीने बाजूच्या कॉलनीत राघवला फ्लॅट मिळाला तो अधूनमधून शशी काकांकडे येऊ लागला दिवस जात होते राघव आणि आता  रेवा शशी काकाची मुलगी ही देखील त्याच्याशी गप्पा मारत असे. आज पुन्हा शशीला आपल्या मित्राची आठवण झाली एवढा स्मार्ट आपला मित्र असा कसा झाला काहीतरी नक्कीच घडले असे सारखे त्याचे मन त्याला सांगू लागले .राघव ने बाबांना तुम्ही माझ्या सोबत रहा असे खूप समजावले पणं बाबा ऐकण्यास तयार नव्हते शेवटी रात्रीच्या गाडीने ते निघून गेले. राघव ला आपल्या बाबांची फारचं काळजी वाटत होती कारण बाबांना त्याने फार जवळून अनुभवले होते. दिवस जात होते एक करमणूक म्हणून राघव शशी काका कडे जात होता गप्पा मधे वेळ निघून जाई कारण काका व राघव दोघे पणं गप्पा मारण्यात पटाईत होते. आता रेवा पणं भाग घेऊ लागली तिला आता राघव आवडायला लागला होता ,पणं राघवचे मात्र तसे काही नव्हते ,तो आपला वेळ जावा शिवाय नवीन शहर!! म्हणून येत असे. शशीला मात्र मधूनच आपल्या मित्रा बद्दल विचारण्याची हुक्की येई कारण मित्रच तो!!आणि फार छान!! व्यक्तिमत्व व नेचरही एक दिवस कोणी घरी नसताना राघव आला शशिने आज त्याला मित्रा बद्दल विचारायचे ठरवले

काय कसं वगैरे गप्पा झाल्यावर शशीने चहा केला अहो काका!मी करतो की असू देरे !! चहा बघ कसा फक्कड झाला असे म्हणून तो मोठ्याने हसला व एकदम शांत झाला. काय झाले काका ?अरे आठवण! कुणाची? अरे तुझ्या बापाची खूप मजा केली रे आम्ही कॉलेजमधे


बरं एक विचारू का राघव

हो! का नाही!! विचार की

अरे मला सांग माझा एवढा चांगला मित्र असा कशाने झाला रे?

   हडकुळा डोक्यावर केस नाही पूर्ण वाकला जसा की म्हातारा झाला अरे तो नि मी बरोबरीचे!! एनी प्रॉब्लेम?  तसे म्हणले तरी चालेल काका. असे म्हणून राघव सांगू लागला

     काका अहो हे सगळे आईमुळे झाले !.का ?आई चांगली वागत नाही का? काका अहो ती आता या जगात नाही! काय?असे म्हणून शशी ताडकन उठून बसला. कारण माधुरी त्याच्या परिचयाची होती त्याला एकदम शॉक बसला. राघव पुढे सांगू लागला आई बाबांशी आजी वरून खूप कटकट करायची. मला सासू नको सारखे हेच म्हणायची पणं तीलातरी कोण होते , कुठे जाणार बिचारी ,पणं आईचं आपलं रोज तेच... शेवटी बाबाने आजीला वृद्धाश्रमात टाकले नव्याचे नऊ दिवस .आई पुन्हा रोज कटकट करू लागली कारण काय तर तुम्ही तिला भेटायला नका जाऊ .हे कस शक्य होत काका? शेवटी या कटकटीमुळे आईने एक दिवस अंगावर रॉकेल टाकून जाळउन घेतले. अरे देवा!! शशीला एकदम कशेशे झाले आर यू ओको काका? अरे हो जरा धक्का बसला. राघव पुढे सांगू लागला मरताना आईने बयान दिले नि बाबा जेलमध्ये गेले त्यांची नोकरी पणं गेली त्यांना पाच वर्षे सजा झाली एरियात बदनामी आणि मग सगळे विस्कळीत झाले.


चला येतो काका कारण बाहेर कुणी तरी आले होते आणि वातावरण पणं सुन्न झाले होते. कारण मनोहर हा शशीचा खूप जवळचा मित्र होता अडचणीच्या वेळीही तो कामी आला होता मनोहर पेक्षा शशीला नोकरी उशिरा लागली होती.

       

रात्री शशीला झोप येईना बायको म्हणाली काय हो काय झाले? अस्वस्थ का असे? काही नाही ग जरा झोप येत नाही ह्म् इकडे राघव ही बाबांच्या विचाराने अस्वस्थ होता. नेहमीप्रमाणे राघव शशी काकांकडे जातच असे पणं काका आता बदलले असे त्याला वाटू लागले. नेहमी खळखळ हसणारे काका केवळ हो नाही असे उत्तर देऊ लागले आणि हो रेवा लाही ते फारसे बोलू देत नसत तो आला की तिला काहीतरी कारण सांगून आत पाठवीत असत राघव ल हा बदल जाणवला.

     

इकडे एक दिवस रेवाची आई शशीला म्हणाली काहो राघव तुम्हाला कसा वाटला? कशा संदर्भात रेवासाठी हो माझा विचार होता पण मी तो बदललाय. का पणं? असे म्हणून शशिने बायकोला सगळे सांगितले नि म्हणाला कशावरून मनोहरने जाळले नसेल वहिनीला? अग बाई! मग त्याला सजा का व्हावी? शिवाय आता त्यांच्या घरात कोणी बाई माणूस पणं नाही लग्ना नंतर अर्थात मनोहर यांच्याच जवळ राहणार त्यापेक्षा नकोच हात दाखऊन अवलक्षण करणे!! तेही बरोबर. इकडे रेवा मात्र बेचैन होती आजकाल तिला राघवशी बोलायला मिळेना

       

काकांच्या वर्तनतील बदल पाहून राघवने पणं जाणे कमी केले आपल्या बाबां बद्दल काकांचा वाईट ग्रह झाला हे त्याने ताणले पणं आपले बाबा तसे नाहीत हे त्याला माहीत होते आईची सर्व कृती नि बोलणे त्याने डोळ्याने पाहिले होते असे म्हणतात मरताना व्यक्ती चांगले बोलते पणं आई दवाखान्यात काय बोलली हे त्याने ऐकले होते मी तर आता मरणारच पणं तुम्हालाही मी सुखाने जगू देणार नाही!! हे वाक्य सतत त्याच्या कानी घुमे नि आईने केले पणं तसेच मरताना तिने पोलिसांना बयान दिले की माझ्या नवऱ्याने मला जाळले मग काय सगळे संपले होते.

      

बऱ्याच दिवसांनी राघव आज काकांकडे गेला हातात पेढ्याचा डबा घेऊन काकांनी लगेच विचारले कारे राघव कशाचे पेढे लग्न बिग्न ठरले की काय?वाक्य ऐकताच रेवाला जरा घाबरायला झाले ती एकदम किचन मधून बाहेर आली नाही नाही काका मला पाच वर्षा करता कंपनीने युएसएला पाठविण्याचा निर्णय घेतलाय अच्छा अच्छा अभिनंदन बाळा!! त्यांनी एकदम राघव ला मिठी मारली आणि सुटके चां श्वास घेतला...रेवा चा मात्र चेहरा पडला शशीच्या नजरेतून हे मात्र सुटले नाही. इकडे लगेच राघवने एक प्लॅन बनवला घरी जाताच त्याने रेवाला मेसेज केला व भेटायला बोलावले रेवाला तो एक चांगला संकेत वाटला.

       

 रेवा मैत्रिणीकडे जाते म्हणून बाहेर पडली व राघव ला भेटण्यास गेली राघवने पुन्हा तिला बाबांची कहाणी ऐकवली व काकांचा कसा बाबांबद्दल गैरसमज झालं ते तिला सांगितले. तिलाही ते पटले कारण बाबां मधला बदल तिलाही जाणवला होता राघव राघव करणारे बाबा आता त्याचा विषय पणं काढत नसत तर रेवा मी तुला या ठिकाणी या साठी बोलावले की मला एक मित्र म्हणून तुझ्याकडून एक वचन हवे आहे. कसले वचन राघव? रेवाच्या मनात वेगळाच विचार चमकला ती एकदम शहारली, कारण तिचे हात राघवच्या हातात होते मला असे वचन दे रेवा की तू शशी काकांच्या मनातला माझ्या बाबांबद्दलचा गैरसमज दूर करशील. काही करावे लागले तरी चालेल !! पण रेवा काहीच बोलली नाही. तिला राघवचे पटले होते पण तिला वाटले राघवने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला बोलावले. पण तिचा पूर्ण मुड ऑफ झाला करशील ना रेवा एवढे !!असे म्हणून त्याने तिच्याकडे पाहिले तिची नजर भावशून्य होती लगेच ती भानावर आली आणि हो राघव मी प्रयत्न करेल असे म्हणून बेस्ट लक म्हणून ती लगेच जायला निघाली तिला बाय करून राघव आत आला तो गेल्यावर मात्र रेवाचे डोळे पाणावले ती झरकन गाडी घेऊन घरी आली.


घरी येताच बाबा दारातच उभे होते... का ग!!आलीस पणं अन् डोळे का असे

अहो बाबा येताना चांगला किडा गेला डोळ्यात म्हणून लाल झाले

अग पणं दोन्ही डोळे!! नाही बाबा एकाच डोळ्यात.. ठीक आहे चल पाण्याचे फवारे मारून पाहू आईकडून मारून घेते आज तिला कळले की आपले प्रेक एकतर्फी आहे ती झोपली पणं तिला झोप येईना. संध्याकाळी राघव मुंबई ला निघून गेला कारण आठ दिवसात त्याला रुजू व्हायचे होते बाबा तर सोबत यायचा प्रश्नच नव्हता मी मरेल तर याच घरात असा त्यांचा अट्टाहास होता.

    

दिवस जात होते इकडे रेवाची बेचैनी वाढतच होती आजकाल आईला पणं हे जाणवत होते पणं तिने दुर्लक्ष केले. राघव गेला तरी शशी ने मात्र काही फोन वगैरे केले नाही तो अमेरिकेला जाण्याचा दिवस उगवला त्या दिवशी मात्र राघवणे काका बाबाकडे लक्ष असू द्या असे म्हणून फोन ठेवला. रेवा हॉल मध्येच होती कोणाचा फोन बाबा !अग राघव चां !तो आज निघतोय न !! विषय तिथेच संपला. आपल्या बाबाजवळ विषय कसा काढावा हे रेवाला समजेना राघव ने तर वचन घेतले होते आणि एक मित्र या नात्याने तिचे ते कर्तव्य पणं होते. रेवाने मग हिम्मत करून एक दिवस विषय काढलाच बाबा तुम्हाला राघव त्याच्या बाबा बद्दल काही बोलला का हो? तुला कसे माहित!!शशी ने आश्चर्य व्यक्त केले

अहो बाबा तो जाण्यापूर्वी मज जवळ बोलला म्हणे तुझ्या बाबांचा काहीतरी गैरसमज झाला तेव्हा शक्य असेल तर तू दूर कर .कमाल आहे आजकालच्या मुलांची!! असे म्हणून त्याची आई जेव्हा गेली तेव्हा राघव पणं तिथेच होता आणि आई बोलली ते वाक्य रेवाने बाबांना जसेच्या तसे सांगितले म्हणे राघव समोर त्याची आई म्हणे मी तर मरणारच!पणं तुम्हाला मात्र मी सुखाने जगू देणार नाही .आणि आईने मला यांनी रॉकेल टाकून जाळले असे पोलिसांना बायान दिले . अरे देवा! एवढे नाही सांगितले राघव ने पणं माधुरी थोडी होती संतापीच !!माधुरी कोण बाबा !अग राघव ची आई .मी ती नि मनोहर एकाच कॉलेज मधे होतो

बर बर असू दे! वेळ खूप झाले आपण आता इथेच थांबू असे म्हणून सगळे जेवायला उठले


इकडे रात्री परत शशीचे विचार चक्र फिरू लागले त्याला थोडे अस्वस्थही वाटू लागले त्याने मुंबईला जाण्याचे ठरवले आपल्या मनात आपल्या मित्राबद्दल वाईट विचार आल्याचा त्याला पश्याताप झाला घराचा पत्ता वगैरे त्याने आधीच काढला होता आपल्या मित्राला जाऊन सरप्राइज द्यायचे त्याने ठरविले. दुसऱ्या दिवशीच शशीनी रेवा व बायकोसहित मुंबई गाठली. डोअर बेलचे बटण दाबताच मनोहरने दार उघडले व आपल्या मित्राला पाहून त्याचे डोळे पाणावले. घरात प्रवेश करताच शशी थक्क झाला. टापटीपच्या बाबतीत अव्वल असलेल्या आपल्या मित्राचे घर पाहून त्याचे पणं डोळे भरून आले डोळे पुसत मनोहर म्हणाला आज ७/८ वर्षानंतर कोणी आपल्या घरी आलेले पाहून मला बरे वाटले. बोलण्या बोलण्यात असे आढळून आले की त्या घटने पासून लोकांनी त्याच्याशी सबंध तोडले आहे मित्रा!! राघव ची शपथ घेऊन सांगतो मी माधुरीला जाळले नाही पणं जेलमधे गेल्यामुळे सर्वांना खरे वाटणे साहजिक होते जाऊ दे रे!मी म्हणले का ? रात गई बात गई . वहिनी व मुलीने भरभर घर आवरले आणि नंतर आणलेल्या डब्यात ते चौघेही जेवले.


     परतीचे तिकीट त्यांनी काढलेच होते नाही नाही म्हणत असता त्यांनी जबरदस्तीने मनोहरला त्यांनी सोबत घेतले. आधी आल्यावर मनोहरला त्याने एका चांगल्या डॉ. ची ट्रीटमेंट दिली व त पासणी केली तपासणी अंती असे निदान निघाले की मनोहरला काहीएक झाले नसून केवळ मानसिक प्रेशर पाई प्रकृती खालवत आहे शशिच्या डोक्यावरचे ओझे खूप कमी झाल्या सारखे वाटत होते .आपल्या एका गैर समजुती मुळे एक चांगला मित्र आपण गमावला असता त्याने परमेश्वराचे आभार मानले. आज रात्री पूर्वी प्रमाणे दोघे मित्र दिलखुलास गप्पा मारत होते. औषध पाणी घरचे खाणेपिणे या मुळे मनोहर मधे खूप बदल दिसून येत होता १/२ महिने होताच मनोहरने जाण्याचे नाव काढले .अरे!असा किती दिवस मी तुझ्याकडे राहू वहिनी काय म्हणतील? काही नाही रे!!असे म्हणून शशीने वेळ मारून नेली. आता त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता राघव १महिन्याच्या सुटीत येत असल्याचे कळले दोघांना मान्य असल्यास राघव व रेवा चे शुभमंगल लावण्याचे त्या तिघांच्या मनात होते.


राघव तू आधी शशी काकाकडे ये मग आपण मुंबईला जाऊ. हो बाबा !!असे बोलणे बाप लेकाचे झाले होते. 

     

ठरल्याप्रमाणे राघव शशी काकांकडे येऊन पोहोचला. बाबा काका स्वागतासाठी उभेच होते काकू नि रेवापण आल्या आल्या आपल्या बाबाकडे पाहून राघवला धक्काच बसला अपटूडेट ड्रेस चेहरा प्रसन्न, त्याचे डोळे भरून आले त्याने बाबांना आलिंगन दिले. रेवाने दिलेले वचन निभावले तर! त्याने तिच्याकडे पाहून नजरेनेच आभार मानले रेवा परत शहारली. रात्री मस्त जेवणाचा बेत गप्पागोष्टी सगळे कसे रंगात आले होते मग काय राघव काही मुलगी बिलगी मिळाली का तिकडे केव्हा उडवणार बार? बाबा पण एकटेच असतात काही प्लॅन केला का नाही भविष्याचा. नाही काका अजून नाही. कसली घाई बघू!! विषय तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी राघव बाबांना म्हणाला बाबा निघू या का आपण मुंबईला? अरे! जवळपास दीड महिना झाला तुझे बाबा इथेच आहे घर कसे झाले असेल? काय!! बाबा तुम्ही काही बोलले नाही फोनवर अरे हा शश्या ऐकतो कुठे! तरीच तुमच्या तब्येतीत असा फरक पडलाय हो रे!खूप खूप केले या कुटुंबांनी माझ्या साठी अगदी शतशः ऋणी आहे मी यांचा पुरे हं भावजी लगेच काकू आतून म्हणाल्या 


      आज चतुर्थी होती टेकडीवर एक गणपतीचे मंदिर होते शशी म्हणाला रेवा आज तू एक काम कर तू राघवला आपले गणपती मंदिर दाखून आण उद्या हे लोक जातो म्हणतात ना ठीक आहे बाबा. सकाळीच दोघे मंदिरात गेली दर्शन घेतले राघव म्हणाला रेवा खूप खूप आभार तुझे तुमच्या मुळे आज माझे बाबा मला परत मिळाले अगदी वचन पाळले तू !दोघे मित्रांना एक आणले नि काकांचा गैरसमज दूर केलास .अरे काय हे!! पुरे न आल्या पासून बघते आहे नुसते आभार! आभार ! काही गिफ्ट वगैरे देशील की नाही ?अरेच्च्या !!ते तर माझ्या डोक्यातच आले नाही माग काय ते!! देशील नक्की !!अग हो हो !!माग तर खरी!! तू माझा होशील का ? त्याला खूप आश्चर्य वाटले त्याच्या डोळ्यात एकदम चमक आली त्याने रेवा कडे पाहिले गोरा रंग ,मोठे डोळे उंच. सडपातळ वा!!कोण नाही म्हणणार हिला . अग पणं तुझे बाबा !त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे . तू आला तेव्हापासूनच तू मला आवडला पणं नंतर कळले माझे प्रेम एकतर्फी आहे .कारण मी तुला आजमावून पाहिले अग हो बरोबर तुझे! मी बाबांच्या काळजीत इतका गूर्फटलों होतो की, तुझ्या प्रेमा कडे माझे लक्षच गेले नाही. सॉरी चल, चालेल! सूभहका भूला शाम को घर आता हैं तो उसे भूला नही कहते !असे म्हणून दोघेही जोरात हसू लागले

घरी येताच दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून प्लॅन सक्सेस झाल्याचे शशीला वाटले

त्याने रेवाचे हात हातात घेऊन म्हटले थँक यू...

कशाबद्दल

बाबा गैरसमज दूर केल्या बद्दल सगळ्यांनी एक साथ टाळ्या वाजवल्या.  


Rate this content
Log in