veena joshi

Tragedy Inspirational

4  

veena joshi

Tragedy Inspirational

सहकार्य

सहकार्य

7 mins
469


      निलीमाचा आनंद कालपर्यंत गगनात मावत नव्हता साहजिकच होते ते .पणं का कुणास ठाऊक आज सकाळपासून तिला जरा अस्वस्थ वाटत होते कारण आज जवळपास २८वर्ष झालीत केवळ विचार नि विचार !! तिला वाटायचे या विचाराने माझे डोके खोके तर होणार नाही ? विचार पणं कोणते नुसते निगेटिव्ह

चांगल्या विचाराला जणू थाराच नव्हता केवळ कामाची वेळ सोडली तर गेल्या २९ वर्षात आनंदाचे क्षण केवळ बोटावर मोजण्या इतके तिच्या नशिबी आले होते तेही केवळ पाच ते सहा महिने

      २९ वर्षापूर्वी तिने आई वडिलांना न जुमानता पळून जाऊन लग्न केले होते. लग्न करण्या पूर्वी तिने मोहनशी आईवडिलांशी गाठ घालून दिली होती मुलगा चांगला असूनही केवळ पर जातीचा असल्यामुळे त्यांनी नकार दिला होता. शिकल्या सवरलेल्या निलीमाला हे त्यांचे पटले नाही तिने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण आई वडील स्वतःच्या विचारावर ठाम होते. शेवटी एक दिवस चिठ्ठी लिहून ठेऊन ती घरातून निघून गेली आईवडिलांनी पणं तिचा शोध लावला नाही.  

     मोहनशी  लग्न केल्यावर तिला अजिबात पश्चाताप झाला नाही कारण होताच तो तसा आचार विचार, शिक्षण प्रेमळ मुख्य म्हणजे सहकार्य हे तर त्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते त्याला हे सगळे आपल्या मातापिता कडून मिळाले होते पणं लग्न  होण्या अगोदर दोन वर्षांपूर्वी दोघेही अपघातात मरण पावले होते. दूरदूर पर्यंत त्याला कुणीही नातेवाईक नव्हते. शेजारी पाजारी हेच त्याचे नातेवाईक काका काकु बहीण भाऊ मामा मामी सगळे नातेवाईक त्याने शेजाऱ्या मधून त्तयार केले होते एवढा जबरदस्त जनसंपर्क होता त्याचा याच कारणास्तव त्याच्या आंतर जातीय विवाहाला कोणी नकार दर्शवला नव्हता. जेव्हा तो कोर्ट मॅरेज करून आला तेव्हा सगळ्यांनी अगदी घरच्या सारखे धुमधडाक्यात त्याचे स्वागत केले होते निलिमा तर सगळ्यांचे प्रेम पाहून अगदी भारावून गेली होती .

        अशा या प्रेमी युगलाला मात्र कुणाची नजर लागली कुणास ठाऊक अवघ्या आठ महिन्यातच अपघातात मोहन जागीच ठार झाला निलिमा तर ऐकताच बेशुद्ध पडली शुध्दीवर यायला तिला बराच काळ लागला तो पर्यंत सगळे शेजाऱ्यांनी च पाहिले शुध्दीवर आल्यावरही निलीमाला काहीच सुचेना कारण तीन महिन्याचा गर्भ तिच्या पोटात सोडून मोहन निघून गेला होता पुढे भविष्य काय,? प्रश्न आ वासून समोर उभा होता

तिचे जे नातेवाईक होते अर्थात शेजारचे काका काकू मामा मावशी बहीण भाऊ सगळ्यांनी तिला खूप आधार दिला होता. आई बाबांना फोन करू का विचारले पणं तिने साफ नकार दिला कारण तिला माहित होते आपल्या मुळे आधीच त्यांना दुःख झाले असेल आता आणखी त्यात भर नको, तसे बाबांनी तिला खूप strong बनविले होते आपली वाट आता आपणच शोधायला हवी. थोडे दुःख दूर होताच ती मोहन च्या ऑफीस ला गेली तेथील सगळ्यांना तिच्या बद्दल सहानुभूती होतीच याला कारण मोहन चे ऑफिसवाल्यांशी असलेले संबंध वागणूक प्रत्येकाच्या बोलण्यातून तिला त्याच्या बद्दलचा अभिमान दिसून येत होता

         लवकरच तिला त्याच्या जागेवर नोकरी लागली मोहन प्रमाणेच आपणही जग जिंकायचे असे तिने ठरवले. हुशार तर ती होतीच दिवस जात होते ऑफिस मध्ये तिचा चांगला वेळ जाई वाजवी पेक्षा तिने स्वतःला कामात झोकून दिले घरी आल्यावर मात्र घर तिला खायला उठे. बाजूला एक घर होते तिथे एक काकू एकट्याच राहत होत्या मोहन त्यांचा खूप लाडका होता तो जाताच निलीमाची जबाबदारी त्यांनी स्विकारली त्या आपले घर बंद करून निलिमा कडेच राहायला आल्या. निलिमा एक जबाबदारी म्हणून त्यांनी तिला स्विकारले अगदी आईप्रमाणे त्या तिला प्रेम देऊ लागल्या याला कारणही मोहनचं होता कारण तो या काकूंना आपल्या काकू प्रमाणेच समजून हवी ती मदत करत होता.

    ...    दिवस भरत आले. निलिमाला शेजारच्यानीच दवाखान्यात admit केले एका चांगल्या मुहूर्तावर तिने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला अगदी दुसरा मोहनच. बाळंतीण असून निलिमा खूप खूप रडली सगळ्यांनी खूप समजूत घातली. घरी आल्यावर सगळे अगदी वेळात वेळ काढून हव नको ते पाहायला यायचे निलीमाने देवाचे आभार मानले सख्ख्यपेक्षा जपणारे लोक तिला मिळाले.

       बाळाचे नाव मंदार ठेवण्यात आले आता ऑफिस आणि बाळ तिला उसंता नव्हती पूर्ण तिने स्वतःला गुर्फटून घेतले दिवसागणिक बाळ मोठा होत होता. घरातून आणि वेटाळातून त्याला चांगले संस्कार मिळत होते शिवाय वडीलान प्रमाणेच हा शांत नि हुशार बनेल असे सर्वांचे मत होते. अजिबात त्रास न देता तो आई व काकू कडून सगळे करून घेत होता

      काळ माणसासाठी थांबत नसतो पहाता पहाता मंदार मोठा झाला आज तो दहावीला होता आता त्याला बऱ्या पैकी कळायला लागले होते आईला तो आता बाबांबद्दल जास्त विचारीत नव्हता त्याला कळून चुकले होते जाणार माणूस परत येत नसतो 

     आज मंदारचा रिझल्ट होता आणि अपेक्षे प्रमाणे तो मेरिट आला होता तसा तो संपूर्ण शाळेत पहिली पासून अव्वल होता नेहमी प्रमाणे सगळ्या परिसरात त्याचे कौतुक झाले आई आजी नि मंदार अवघ्यांच्या कौतुकाने भरून पावले

       निलिमा बाबांचा विषय जास्त घरात काढत नसे कारण तिला मुलाला सक्षम बनवायचे होते. इमोशनल होऊन करीअर घडणार नाही हे तिला माहीत होते. जास्तच झाले तर तो नसतांना काकू जवळ ती मनसोक्त रडून घ्यायची पणं थोडी देखील भनक ती मुलाला लागू द्यायची नाही आज बाळाच्या तोंडावरच बौद्धिक तेज आणि समाधान पाहून ती धन्य झाली.  

पुढील शिक्षणासाठी तो मोठ्या सिटीत रवाना झाला खूप मेहनत करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि एका नामांकित कंपनीत तो नोकरीला लागला एव्हढेच नव्हे तर त्याची हुशारी पाहून कंपनीने त्याला अमेरिकेला पाठविले आणि कुठलीही आडकाठी न आणता निलिमा ने त्याला हसत हसत अमेरिकेला पाठवले  आता मात्र तो गेल्यामुळे तिच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती पणं उपाय नव्हता 

       नवीन टेक्नॉ लॉजी मुळे फोन एस एम एस व्हिडिओ या माध्यमातून तो रोज आईशी बोलत असे  

     आज तो अमेरिकेवर न वापस येणार होता तिला खूप आनंद झाला पणं पुन्हा तिचा जीव घाबरायला लागला हल्ली बरेच वेळा असे होत असे .आई!! अशी हाक कानावर पडताच ती एकदम भानावर आली.  त्याची हाक ऐकून शेजारी पणं बाहेर आले होते. अग बाई मंदार आला वाटते असे म्हणून ती बाहेर आली दाराजवळ एकदम स्मार्ट गोरा राजबिंडा मुलगा पाहताच क्षणभर तिला मोहन चा भास झाला. तिने स्वतःला एकदम सावरले एक एक करता शेजारचे सगळे नातेवाईक जमा झाले. सगळ्यांनी त्याला डोळे भरून पाहिले नि सावकाश येतो म्हणून ते निघून गेले आता काकू आई नि तोच राहीले. त्यानी आई व काकूला नमस्कार करून त्यांची गळाभेट घेतली काकू आता बऱ्याच म्हाताऱ्या झाल्या होत्या. तर आईपण वयस्कर दिसत होती हे त्याच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही गप्पा गोष्टी जेवण खावण करून सगळे निद्रेच्या स्वाधीन झाले पणं निलीमाला मात्र झोप येईना तिच्या समोर आज मोहन च्या रूपात मंदार उभा होता वा रे देवा तुझी करणी!!

         जेमतेम १५ दिवस झाले असतील येऊन .अमेरिकेतील कोरोनाचे तांडव ऐकून सर्वांचे धाबे दणाणले  मृत्यूचे तांडव इतके भयानक असते याची कल्पना मानव करू शकत नाही बातम्या ऐकून ऐकून मंदार पणं सुन्न झाला. त्याचे सगळे मित्र तिकडे अडकले होते. फोन वरून काही मित्र positive तर काही मृत्यू मुखी पडल्याचे कळले.  काही दिवसात भारतात ही कोरोनाचा प्रादुर्भव दिसून आला. हळूहळू महाराष्ट्र  विळखा जास्त दिसून येत होता अशा वेळी घरात बसून राहणे मंदारला योग्य वाटले नाही. आपणही 

इतरांच्या मदतीला जावे असे त्याला सारखे सारखे वाटू लागले तशा प्रकारची चर्चा आईशी करण्याचे त्याने ठरवले

          दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि आजीला त्याने आपला विचार बोलून दाखवला. आई आपल्याला विरोध करणार नाही हे तो जाणून होता आईची परमिशन मिळताच त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली. 


         सहकार्य हा गुण त्याच्या नसानसात भरलेला असल्यामुळे आई आजीची परमिशन मिळताच त्याला हलके हलके वाटू लागले. लगेच त्याने एका मुंबईच्या डॉ. सोबत संपर्क साधला कारण सध्या मुंबई ची परिस्थिती बिकट होती. डॉ. सुरवातीला नाही म्हणाले पणं नंतर ये बरं बघू असे म्हणाले .लगेच उद्या निघायचे म्हणून तो कामाला लागला


    दुसऱ्या दिवशी सकाळीच तो स्वतःच्या गाडीने मुंबईला निघाला तिथे पोहोचल्यावर ओळखीच्या डॉ. नी त्याला मेन दवाखान्यात नेले तेथील डॉ. सोबत ओळख करून दिली पडेल ते काम करण्यास त्यानी तयारी दर्शवली.  


    दुसऱ्या दिवशी पासून दवाखान्याचे स्वरूप पाहून तो चक्रावून गेला दवाखान्याची परिस्थिती भयावह होती पणं तो डगमगला नाही काम करण्यासाठी त्याचे हात सरसावले दिसेल ती कामे तो करू लागला मृदू भाषिक असल्यामुळे थोडेच दिवसात त्याने डॉ. पेशंट यांची मने जिंकले खाणे पिणे ,औषध देणे,  वॉश रुमला नेणें कोणतेही काम तो करू लागला. बघता बघता सर्वांच्या तो आवडीचा झाला पणं नियतीला हे मान्य नव्हते पेशंटचे करता करता कोरोनाची लागण त्यालाही झाली डॉ. उपचार सुरू केले पणं घरी मात्र आईला त्याने काहीच कळवले नाही योग्य उपचार आणि प्रचंड  इच्छाशक्ती च्या जोरावर तो लवकरच बरा झाला. पुन्हा त्याने काम करण्याची ईच्छा दर्शवली परंतु या वेळेस मात्र सर्व डॉ. नकार दिला सगळ्यांनी त्याला खूप छान प्रकारे समजून सांगितले तू केले तेवढेच खूप केले बाळ. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे तुझ्या सारखे स्वतःहून समाजकार्य करणारे तरुण समोर आल्यास आम्हाला खूप मदत होईल. 

सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा त्यावर वर्षाव करून त्याचा गौरव केला व साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला .

      परतीच्या प्रवासात त्याला मात्र घरची ओढ लागली आई आजी सगळे शेजारी कसे असतील त्याच्या डोळ्यापुढे चित्र उभे राहिले आपल्या ला कोरोना झाला हे त्याने घरी कळविले नव्हते आणि शेवट पर्यंत तो सांगणार पणं नव्हता.


    दारातूनच आई अशी जोराने हाक मारताच आईने दार उघडले मुलाला समोर पाहताच आईला आनंद तर झालाच पण बाळ खूप रोड झाल्याचे आईला जाणवले .सगळे अंघोळ स्वच्छता आटोपल्यावर त्याने आईला व आजीला घट्ट मिठी मारली व  अश्रूनला वाट मोकळी करून दिली. आपल्या मुलाला तिने रडताना पाहिले नव्हते पणं या वेळी बोलणे योग्य नाही म्हणून ती प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहीली 


   मंदारला मात्र बरेच दिवसांनी खूप हलके हलके वाटत होते आईचे प्रेम व आईच्या हातचे जेवण करून तो समाधान पावला होता आता परत आईला सोडून जायचे नाही असा पक्का निर्णय त्याने मनाशी केला. इथेच राहून चाळीतील लोकांना सहकार्य करायचे त्याने ठरविले इथे नोकरी मिळणे त्याच्या सारख्या हुशार मुलाला काही कठीण नव्हते मनाशी पक्का विचार करून तो  बऱ्याच दिवसाने शांत निद्रा देवीच्या स्वाधीन झाला

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy