veena joshi

Drama

4  

veena joshi

Drama

ऊन सावली

ऊन सावली

3 mins
340


उन्हाळा दिवस असूनही खिडकीतून आलेल्या गार वाऱ्याच्या झुळकीने आणि मोगऱ्याच्या सुगंधाने शालिनीस जाग आली बऱ्याच वेळ रात्री वाचत बसल्यामुळे सकाळी सकाळी जरा गाढ झोप लागली होती जाग येताच ती उठली आणि मुख संमार्जन करून अंगणात आली.

       अहाहा!!बाहेर आल्याबरोबर तिला जणू स्वर्गात असल्या सारखे वाटले वाऱ्याच्या मंद लकिरी बरोबर झाडाच्या फांद्या डुलत होत्या मोगऱ्याचा मंद मंद सुगंध अंगणात दरवळत होता सारे वातावरण कसे भारल्यागत भासत होते इतक्यात समोर लक्ष जाताच शालिनी थोडी गंभीर झाली नयनाक्का एक भारदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी कधी सावली पाहिलीच नव्हती संपूर्ण आयुष्य जणू उन्हाने करपून गेले होते. पण, आयुष्याची संध्याकाळ होता होत नव्हती. 


  शालिनीने आई कडून ऐकले होते. अग, ऊन तिथे सावली !! उन्हानंतर प्रत्येकाच्या जीवनात सावली ही येतेच.  


शालिनीला वाचनाची खूप आवड होती आणि मोठमोठ्या नावाजलेल्या लेखकांचे विचार वक्तव्य हेच होते उन्हा नंतर सावली!! पण शालिनीला हे फारसे पटले नव्हते याचे मूर्तिमंत उदा.म्हणजे खुद्द ती नि नयनाक्का !! तिला वाटायचे, दुनियेत आपल्या सारख्या कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांच्या जीवनात सावली नाही आणि काही अशा आहेत की वरवर जरी सावली दिसली तरी आतील उन्हाचे काय? आतील उन्हाने त्या नुसत्या होरपळून चालल्या आहेत पण समाजाला त्यांची पर्वा नाही त्यांचे नशीब त्यांच्या साथ म्हणून सर्वांनी त्यांना सोडून दिले. पुरुष काय नि स्त्रिया काय सगळे तेच म्हणतात, शेवटी स्त्री च स्त्रीची वैरीण असते या मध्ये सत्यता जाणवते. 


     नयनाक्का आणि शालिनी एकाच गावच्या आणि योगायोग असा लग्न झाल्यावर दोघीही एकाच गावात पडल्या नयनाक्का नि शालिनीत मात्र पूर्ण जनरेशनचा फरक होता नयनाला चाळीतील सर्व आक्का म्हणत इतरांपेक्षा ती थोडी मोठी होती नयना नि शालिनी दोघींचे ही वडील बालपणीच गेलेले त्यामुळे पालन पोषण शिक्षण संस्कार सर्व काही आईनेच केले मुली मात्र फारच हुशार निघाल्यात अभ्यासात. नयनाक्का ला तर हुशारी पाहून मागणीच आली पण नशीब बघा कसे केवळ एकच महिन्यात मुलगी घरी आली नवरा अपघातात गेल्या मुळे!! सासू सासरे एकुलता एक मुलगा पण जुन्या विचारा मुळे मुलीस सांभाळ ण्यास नकार दिला झाले मग काय सुरू झाले पुन्हा कष्टमय जीवन नोकरी साठी वणवण पायपीट नोकरी मिळाली पण मन मात्र पार करपून गेले नोकरी एके नोकरी बाकी विश्व नाही.  


  अचानक एके दिनी एक वकील साहेब नैनास भेटण्यास आले. सर्व मालमत्ता सुनेच्या नावावर करून सासू सासऱ्यानी कायमचा निरोप घेतला होता. सुनेला न भेटता नैनाने सासरी जाण्याचा निर्णय घेतला व आईला घेऊन ती सासरच्या गावी आली सर्व मालमत्ता घरदार पाहून तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला पण हाय रे दुर्दैवा!!अवघ्या पंधरा दिवसातच वार्धक्क्या मुळे आईने जगाचा निरोप घेतला नयनाक्का सुन्न झाली न कोणाशी बोलणे न कुठे जाणे एकांती जीवन जगणे तिला आता आवडू लागले सकाळ संध्याकाळ शालिनीस ती सदोदित झोपाळ्यावर बसलेली दिसे. बोलायला गेल्यास ती विशेष बोलत नसे हे सगळे बघून शालिनीला वाटे कशाचे ऊन नि कशाची सावली!  स्वतःच्या बाबतीतही तिचे तसेच घडले होते श्रीरंग तिचा नवरा देखील पोटात स्वतःची खूण ठेऊन निघून गेला होता. स्व कर्तृत्वावर मेहनतीवर, तिने शुभम ला वाढविले मोठे केले पण त्या साठी ती स्वतःचे आयुष्य काहीच जगली नाही. घर दार नोकरी मुलगा शिक्षण हेच तिचे आयुष्य झाले!! तिच्यावर प्रेम करणारे तिच्या भावना जाणणारे जवळ घेणारे कुणीच तिला म्हणा का नयनाक्का ला कोणीच सापडले नाही. ना वडील ना नवरा ना आई मग कशाची ऊन सावली !! म्हणूनच ती स्वतःच्या मनाशी ठाम आहे ऊन नंतर सावली हे तिला मान्य नाही. उन्हात होरपळणाऱ्या स्त्रिया विषयी वाचले पाहिले की तिचा संताप अनावर होतो.  

       आजकाल तिने असल्या प्रकारचे वाचन सोडून दिले. ती नि तिची बाग हेच तिचे विश्व आहे. मुलाचे लग्न करण्याच्या ती विचारात आहे पण त्यातही तिला म्हणावा तसा रस नाही एक कर्तव्य म्हणून ती ते करणार आणि आयुष्य आहे तो पर्यंत ती नयनाक्का आणि त्यांच्या सारख्या अनेक स्त्रिया केवळ उन्हात होरपळत राहणार सावलीची अपेक्षा न ठेवता जीवनाच्या अखेर पर्यंत . कितीही कोणी तिला सांगितले अग घरात राहतेस ही सावली नव्हे का!! मुलगा म्हातारपणाची काठी होईल ही सावली नव्हे का!! पण तिला ते मान्य नाही योग्य वयात मिळायला हवे ते प्रेम न मिळाल्याने उन्हा नंतर सावली हे तिला मान्य नाही.


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama