Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

veena joshi

Romance


3  

veena joshi

Romance


कॉलेज चे दिवस

कॉलेज चे दिवस

3 mins 270 3 mins 270

   अमृताला शाळेपासूनच कॉलेज चे आकर्षण होते दहावीची परीक्षा दिली आणि अचानक तिच्या जीवनाला वळण मिळाले एक गंभीर घटना तिच्या आयुष्यात घडली .मातृछ्त्र हरवले घरात केवळ बाबा नि तीच उरले .ती इतकी घाबरली की बाहेर निघणे ही तिला अशक्य झाले बाबांना तर नोकरीवर जाणे भाग होते दूरच्या मानलेल्या आजीला जवळ आणून ठेवले अकरावी बारावी झाल्यावर कॉलेज मधे जाण्याचे दिवस आले पणं पहिला हुरूप तिला वाटेना केवळ जायचे म्हणून ती कॉलेजमधे जाऊ लागली. कॉलेजचे आई आणि तिने खूप स्वप्न रंगवले होते आईची आठवण येताच ती शहारली.

      अभय एक सुशिक्षित चांगल्या घराण्यातील मुलगा होता. समाजसेवा आधुनिक विचारांचे घरी वातावरण होते त्यामुळे तोही तसाच घडला एक दिवस तो मित्रांसोबत बसला असताना अचानक त्याचे लक्ष अमृताकडे गेले उंच बांधा गोरा रंग लांब केस कमनिय डोळे वा !! सौंदर्याची अप्रतिम मूर्ती अभय एकदम चक्रावला.

आता तो रोजच तिला पाहू लागला पणं एक त्याला खटकत होते केवळ खाली मान घालून येणे नि जाणे ना हसणे ना बोलणे. ना मित्र ना मैत्रीण मैत्रिणी.. तिच्या सोबत अंतर ठेऊनच वागायच्या काय भानगड असावी? त्याने छडा लावण्याचे ठरवले ना तो तिच्या मागे लागला ना बोलला त्याने तिच्या घराचा पत्ता काढला नि ती नसताना घरी जाऊन थबकला.

 नमस्कार काका मी अभय अमृताच्या कॉलेज मधे असतो.

काही काम होत का अमृताशी!!

काम? हे काय काका काम असण्यासाठी तिने कुणाशी बोलायला तर हवे ना! 

म्हणजे काय? ती बोलत नाही कॉलेजमध्ये कुणाशी ?

नाही काका म्हणूनच एक मित्र या नात्याने मी आलो.. बाकी उद्देश काही नाही

धन्यवाद बेटा

संध्याकाळी बाबा अमृताला म्हणाले अग तुझा मित्र आला होता कुणी अभय नावाचा

माझा मित्र!मी तर ओळखत पणं नाही!

अग तू नसशील पणं तो ओळखतो तुला

असो भेटेलच उद्या तुला! मुलगा चांगला वाटला.

रात्रभर अमृताला झोप लागली नाही कोण असावा आपण तर कुणाशी बोलत पणं नाही.. कसाबसा दिवस उजाडला अमृता दैंनदिन कामाला लागली.. आजी येते ग!असे म्हणून ती कॉलेज गेली आज मात्र तिची नजर खाली नव्हती कुणाला तरी शोधत होती. अभय हे सारे पाहत होता. आपला घाव वर्मी लागल्याचे त्याला कळले त्याचा मात्र वाईट उद्देश काहीच नव्हता

हाय!! मी अभय असे म्हणून त्याने हात पुढे केला

हाय! असे म्हणून तिने केवळ हात जोडले, काही काम होत का? काल तुम्ही घरी आल्याचे कळले.

छे छे!! सहजच म्हणले ओळख वाढवावी

ह्म्म असे म्हणून ती हसून class room मघे गेली.

आज रात्री मात्र तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. का बोलला असेल हा !मुलगा तर चांगला वाटला असो.. ती निद्रेच्या स्वाधीन झाली आता मात्र तिला कॉलेजची ओढ लागली

कॉलेज मधे मात्र आता ते चांगले मित्र झाले. प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करू लागले व्यक्त होत नसले, तरी दोघांना एकमेकांच्या डोळ्यात प्रेम दिसू लागले

अमृताच्या चेहऱ्यात फरक दिसायला लागला त्यामुळे बाबांनाही बरे वाटले.

 दिवस जात होते एकदिवस अमृताला काय झाले कोणास ठाऊक अभयचे दोन्ही हात हातात घेऊन ती खूप रडू लागली काय झाले अमृता? अभय समजवण्याचा सुरात म्हणाला.

तू मला सोडून तर जाणार नाहीस ना रे!!आई प्रमाणे ! नाही अमृता मी तुला वचन देतो.. असे म्हणल्या वर ती जरा शांत झाली

  अर्थात दोघांच्या ही घरी हे प्रेम प्रकरण कळले होते .ना कुणाचीच नव्हती. दोघे ही नोकरीत सेट झाल्यावर लग्न करायचे ठरले. खूप दिवसांनी बाबाला पोरीच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य दिसले होते आणि काय हवे असते वधुपित्याला!! जमाना बदलला तरी!

        अमृताचे कॉलेज चे स्वप्न नि सोबतच आयूष्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानेआज ती जाम खुश होती तिने आईच्या फोटोला नमस्कार केला नि डोळे टिपले.

समाप्त

 


Rate this content
Log in

More marathi story from veena joshi

Similar marathi story from Romance