veena joshi

Drama Others

4.8  

veena joshi

Drama Others

बदल...!!

बदल...!!

7 mins
1.3K



     सकाळ ची सहा साड़े

 सहाची वेळ असेल नेहमी प्रमाणे मी उठून अंगणात आले पण आज पारिजात उघड़लेला दिसत नव्हता का बरे आज उशीर!!कुणाची तब्बेत तर ठीक नसेल?मनात ऊगीच शंका पण शंकेला तिलांजली दिली काल रात्री तर आपण शालिनी काकुशी झोपा ळ्यावर बऱ्याच वेळ गप्पा मारत होतो

     शालिनी काकू नि शरद काका अगदी आमच्या घरासमोर राहयचे अगदी उठल्या उठल्या त्यांच्या घराचे दर्शन व्हायचे कारण त्यांच्या घराचे तोंड दक्षिणेला तर आमचे उत्तरेला

उठल्या बरोबर प्रसन्न व्यक्ति मत्वाच्या काकू दिसल्या की सगळा दिवस छान जायचा झाली का सुजाता मॉर्निंग असे त्या रोज म्हणत  मी पण हसुन प्रतिसाद द्यायचेच


अशा या काका नि काकू दोघेही फार प्रेमळ काका पोष्टातून सेवा निवृत्त झालेले 2500च्या प्लॉट मधे एक टुमदार घर घराचे नाव 'पारिजात' ठेवले. बाकी जागेत सुंदर अशी मनोवेधक बाग़ फुलवलेली होती काका काकुला एकुलता एक मुलगा होता मोहनिश 2 वर्ष झाले होते नोकरिला लागुन त्यामुळे कुटुंब श्रीमंत नाही पण खाऊन पिऊन सुखी होतं. एक दिवस मी नि काकू रात्री झोपाल्यावर गप्पा मारत बसलो होतो काकू मला शांत आणि चिंताग्रस्त वाटल्या मीम्हणले का हो काकू चेहरा उतरलेला बरं नाही का ?नाही ग !तस काही नाही आजकाल आमचा मोहनिश न जरा अंतर्मुख वाटतो काही बोलत नाही पूर्वी सारखा !!एकटा आपला पडलेला असतो खोलीत पहिले सारखा बोलत नाही हसत नाही असे वाटते काही भानगड तर नसेल मग तुम्ही विचारा की त्याला! समोरा समोर मी सहज च बोलले

दुसऱ्या दिवशी काकू त्याला लगेचच म्हणाल्या मोहनिश एक विचारु का रे? तो म्हणाला हम्म आजकाल तू मला जरा सुस्त सुस्त दिसतो काही बोलत नाही हसत नाही काय झालं रे!! काही नाही ग आई !!थोड़ ऑफिस टेंशन बाकी काही नाही अस म्हणून त्याने वेळ मारून नेली पण मोहनिश मला अस वाटत नाही अरे!!आई आहे मी तुझी काही असेल तर सांग विषय तिथेच थांबला तो झोपायला चालला गेला काकू थोड्या उदास झाल्या तितक्यात काका आले बायकोला उदास बघताच म्हणाले काय झालं ग !काही प्रॉब्लेम ?काकूंनी लगेचप्रसंग थोड़ा समजाउंन सांगितला.


      अजून एक आठवडा तसाच गेला एक दिवस मोहनिश आईला म्हणाला आई मला तुझ्याशी नि बाबांशी बोलायचंय !काय बरं झालं असावे ?त्या थोड्या धास्तावल्याच चल मोहनिश झोपाळ्यावर जाऊन बोलू !नाही ग! इथे हॉल मध्ये बसूनच बोलूया ठीक आहे तिघांचे चेहरे जरा गंभीर दिसत होते

      बोल बेटा काय झालं एवढा अस्वस्थ का? काही मुलीची भानगड आहे का काका काकू एकसाथ म्हणाले हो तसं म्हणले तरी चालेल!! आई बाबा मला माहित आहे मला तुम्ही लव्हमॅरेज करायला नाही म्हणणार नाही पण मंजिरीची जरा वेगळीच अट आहे मला पण त्याचे आश्चर्य वाटते!!

     मोहनिश म्हणाल मी व मंजिरी कॉलेज फ्रेंड आहोत!

मोहनिश नि मंजिरीने कॉलेज झाल्यावर कुठले तरी कम्प्युटर कोर्स केले आणि दोघेही चांगल्या जॉब वर लागले मधून मधून ते भेटायचे नोकरीचे सेटलमेन्ट झाल्यावर एक दिवस मोहनिश म्हणाला आपण आता घरी सांगून लग्न करूया आपले दोघांचेही आईबाबा नकार देणार नाही हे नक्की मंजिरी म्हणाली माझीही काही हरकत नाही पण माझी एक अट आहे ती शक्य असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेल अन्यथा नाही

     अट कोणती ती!!आतापर्यंत काही बोलली नाहीस!

मोहनिशला आश्चर्य वाटले, लग्न झाल्यावर मला तुझ्या आणि माझ्या आईबाबा व्यतिरिक्त आपल्या घरी कोणीही आलेले चालणार नाही. ही कुठली अट? मंजिरी मला तर खुपसारे नातेवाईक आहेत आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. मी काही दिवस काकांकडे शिकलो देखील आहे. ही तर जगावेगळीच अट दिसते तुझी आणि हो आपण कोर्ट मॅरेज करू या लग्नाला फक्त तुझे आणि माझे आईबाबा बघ तुला पटतं का मी तुला वेळ देते कळव मला मी मात्र माझ्या मताशी ठाम आहे.


     हे सर्व मोहनिश आपल्या आईबाबांना सांगत होता ते देखील ऐकून थोडे विचलित झाले पाहुणे/नातेवाईक का आपल्या घरी राहण्यासाठी येतात बदल म्हणून दोन दिवस येतात नि निघून जातात आणि आपल्या घरी तर गेटटू गेदर ची प्रथाही आहे. दोघेही थोडे गंभीर झाले हिला सासु सासऱ्यांची नव्हे तर इतर मंडळीचीच अडचण अजबच दिसते मुलगी !!बरं जाऊ दे बघू आपण !मात्र बाकी सगळे व्यवस्थित आहे न ! हो आईबाबा बरं झोप तू आता बराच वेळ झालाय उद्या ऑफिस पण आहे. काळजी नको करू निघेल काही सोल्युशन विषय तिथेच संपला मनातले सगळे सांगितल्या मुळे मोहनिशला जरा शांत शांत वाटले.


        आठ दिवसांनी काका काकूंनी मोहनिशला आपला निर्णय सांगितला. ठीक आहे बेटा तुला ती पसंत आहे न !करू आपण तिची अट मान्य पण आई! काकाकाकू, मामामामी, आत्यामामा सगळे माझ्यावर जीव टाकतात. शिवाय नुकतेच लग्न झालेले दादा आणि आरती वहिनी काय म्हणतील ग सगळे?मग आता काय करणार बेटा समजवेल मी सगळ्यांना आणि हो समजतील ते सगळे मी उद्याच सगळ्यांना फोन करून सांग.ते तू काळजी नको करू ठरल्या प्रमाणे मोहनिशने मंजिरीला आपला होकार कळवला लवकरच मोहनिश आणि मंजिरीच कोर्ट मॅरेज झालं. मंजिरी माप ओलांडून सासरी आली सासुसासरे तर प्रेमळ होतेच पण मंजिरी पण स्वभावाने चांगली होती प्रेमळ होती सासू सासऱ्यांशी तिचे छान जमायचे.

        बघता बघता लग्नाला 5 वर्षे झाली दोघांच्या वेलीवर छानसे फूल उगवले सगळे त्याला मिंटू म्हणू लागले छान गोड आणि गुबगुबीत मात्र मंजिरीची अट कायमच होती ना कुणाचे येणे ना जाणे त्यामुळे काका काकू मधून मधून नर्व्हस व्हायचे पण काही उपाय नव्हता. नातवा सोबत दोघांचे दिवस छान जात होते, शिवाय सोबतीला त्यांची बाग होतीच झोपाळ्यावर बसणे नातवाला छान छान गोष्टी सांगणे दिवस कसे भरभर जात होते.


     अचानक दोघांची पण बदली मुंबई ला झाली. आपल्या सोबत आईबाबा येतील असे दोघांनीपण गृहीतच धरले होते पण काका काकूंनी जाण्यास नकार दिला, ते म्हणाले "अरे आम्ही आलो तर या बागेचे काय होईल रे ते पण आपल्या मुलासारखेच की एवढ्या वर्षाची प्रेमाने लावलेले ही सगळी झाडे यांना सोडून मला येणे शक्यच नाही रे मुलांनो" मंजिरीला नि बाळाला पण काकूंची बाग फार आवडे. बाळ म्हणे देखील आजी तू झाडाशी का बोलते ग! माझ्याशीच बोल ना! काकू कळवळीने सांगत होत्या मोहनिश मंजिरीला पण ते अतिशयोक्ती वाटले नाही कारण त्यांनी कितीतरी वेळा झाडांशी बोलतांना त्यांच्यावरून हात फिरवताना पाहिले होते काकू म्हणाल्या माझ्या मोहनिश प्रमाणेच मी या झाडांची काळजी घेतली आहे तिथे आपल्या बाळाची काळजी घेण्यास तुम्ही आहात पण यांचे काय आपण तेथे गेलो तर ही बाग पार मरून जाईल हातपाय थकले की आम्हाला येणेच आहे तिथे आईचे बोलणे दोघांनाही पटले शिवाय या वयात आई बाबांना दुःखी पाहणे त्यांना जमले नसते म्हणून दोघेही म्हणाले ठीक आहे आई तू म्हणशील तसे

     7दिवसांनी मोहनिश मंजिरी व नातू मुंबई साठी रवाना झाली तेथे गेल्यावर महेशला त्यांनी शाळेत टाकले त्यांचे दोघांचे ऑफिस रुटीन सुरू झाले महेशला पाळणा घरात ठेवण्यात आले, येतांना दोघांपैकी कुणीतरी घेऊन येई काही दिवस चांगले गेले आणि काही दिवसांनी महेश तब्बेतिनी सुकत आहे सुन्न सुन्न राहत आहे चेहऱ्यावर चा फ्रेशनेस गेला असे दोघाच्याही लक्षात आले. सुरवातीला वाटले आजी आजोबांची आठवण येत असेल असे वाटले पण नंतर महेश खूपच रोड दिसायला लागला तेंव्हा दोघांचेही धाबे दणाणले दोघेही आजी आजोबाच्या संपर्कात होतेच इकडे आजीही चिंतेत पडली तिकडे बहुतेक त्याला एकटे एकटे वाटत असावे असे सगळ्यांचे मत पडले

सर्व ऐकून आजीपण चिंतेत पडली आणि तिने आपला गेट् टू गेदर चा प्लॅन सुनेला व मुलाला बोलून दाखवला.

        ठरल्याप्रमाणे मोहनिश व मंजिरी १५ दिवसाच्या सुटीवर आले. महेशच्या शाळेत आजरपणाचे कारण सांगून त्यालापण सुट्टी मिळाली होती आल्या आल्याच महेश ने आजीकडे झेप घेतली दुसऱ्या दिवशी पासून सगळे कामाला लागले बऱ्याच दिवसाची गॅप गेल्यामुळे सगळ्यांचे फोन /पत्ते शोधण्यात त्यांचा वेळ गेल्या दुसऱ्यादिवशी शालिनी काकू मोहनिश सगळे फोन करण्यात गुंतलेले दिसले काका महेशला खेळवत्व मजा घेत होते त्याला पण मजा येत होती. कार्यक्रमाचा दिवस येऊन ठेपला सगळी तयारी जय्यत सुरू होती बंगला छान सजवला होता दाराला छानसे आंब्याच्या पानांचे तोरण बांधले होते सगळे नातेवाईक प्लॅनिंगनी आले असल्यामुळे स्टेशनवर एकत्र गोळा होऊनसगळे सोबत आले

      काका काकू

      मामा मामी

     आत्या मावशी

     दादा वहिनी 

        दादा वहिनीची मुले इतके सारे सोबत आले आल्याबरोबर सगळ्यांनी एकमेकांना कधी भेटतो असे झाले होते गळाभेट झाल्यावर सगळे फ्रेश झाले नाश्ता वगैरे झाला हसून खेळून मस्त गप्पा मारत होते विशेष म्हणजे महेश मुलांमध्ये खेळण्यात इतके गर्क झाला की त्याला कशाचीही शुद्ध नव्हती एवढा आपला महेश आनंदी पाहून मंजिरी खूप खुश झाली. आत जाऊन तिने खूप रडून घेतले तिला आपली चूक लक्षात आली होती. सगळ्यानी सगळ्यांसाठी हव्यातश्या वस्तू आणल्या होत्या. देणे घेणे झाले कौतुक झाले. विशेष म्हणजे सगळ्यांनी मंजिरीचे एवढे कौतुक केले की ती अगदी भारावून गेली. दुसऱ्यादिवशी पुन्हा गेट टूगेदर प्रसंगी भेटू असे आश्वासन घेऊन आपआपल्या घरी परतले. महेश दमून खेळून शांत झोपलेलं पाहून मोहनिश व मंजिरी खूप समाधान पावले. हॉल मध्ये जाऊन मंजिरी ने सासुसासऱ्यांची माफी मगितली व वाकून नमस्कार केला. अग असू दे बेटा आमचा तुला भरभरून आशीर्वाद आहे.

    काकू म्हणाल्या,

    अग मंजिरी माणसं कशाला हवी असतात.

१] सुखदुःखात एकमेकांना साथ द्यायला.

२]एकमेकांचे कौतुक करायला

३]अडीअडचणी आल्यास निभवायला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रोजच्या रुटिंग मधून change म्हणून एकमेकांकडे जायला. हाच नात्याचा उद्देश बाकी कुणीकुणाकडे नेहमी येत नसते. अहो हो आई आज माझी चूक माझा लक्षात आली. यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. मी माहेरी असताना आईने मला हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण sorry आई तेव्हा मी तो *बदल* माझ्या स्वभावात करू शकले नाही, पण आज मात्र माझी चूक मला कळली आणि तुमच्या सहवासात हा *बदल* मी घडून आणला. असे म्हणून मंजिरी नमस्कार करायला खाली वाकली पण शालिनी ताईंनी तिला वरचेवर आलींगन दिले दोघींचे डोळे भरुन आले.

     आज सुजाताला समोरचा पारिजात शांत दिसण्याचे कारण म्हणजे काका काकू आज मुंबईला जायला निघाले होते. त्यांच्या एका नाते वाईकांची बदली इथे झाल्यामुळे त्यांना तो पारिजात राहायला देऊन मुंबई ला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसे त्यांनी आपल्या नातवाला सांगितले होते की आम्ही लवकरच तिथे राहायला येऊ आणि विशेष म्हणजे येणारे जे कुटुंब होते ते निसर्ग प्रेमी होते त्यामुळे आजीला आपल्या बागेची काळजी घेतल्या जाईल याची गँरटी होती. मला मात्र एका प्रेमळ    कुटुंबाच्या सहवासाला मुकावे लागणार होते पण असो ते कुटूंब आनंदात ना! मग प्रश्नच मिटला मी आपल्या कामासाठी वळले उद्या पासून हसमुख काकू मात्र दिसणार नव्हत्या आणि ही कमी मला आयुष्यभर राहणार होती

       


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama