Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

veena joshi

Drama


3  

veena joshi

Drama


सासुरवास

सासुरवास

2 mins 209 2 mins 209

    आज धनाजीला आपल्या बायकोचा अभिमान वाटू लागला शिक्षणाने विचारात प्रगल्भता येते हे त्यास पटले. महीपतराव व सगुणाबाई एका तालुक्याच्या गावी राहत जवळच एका खेड्यावर भरपूर शेती, संत्र्याच्या बागा ,आमराई सगळे कसे रेलचेल होते.एक मुलगा एक मुलगी असा छोटा परिवार मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली चंदी व शिरपत हे जोडपे त्यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होते.


      आपला मुलगा धनाजी आता मोठा झाल्याचे दोघांना जाणवले. मुलीपण चालून येत होत्या पणं नवरा बायकोचे मत वेगळे होते. महीपत रावाना शिकलेली सून पसंत होती तर सगुणाला अडाणी! जेणे करून सतत ती आपल्या ताटा खालची मांजर होईल अशा सगुणा बाई होत्या .पणं म्हणतात ना!! लग्न गाठी स्वर्गात च जुळतात! त्यांना एक शिकलेली सुंदर सून मिळाली. विचाराने पणं सुसंस्कृत मोठ्यांचा आदर ठेवणारी. सगळी कडे शेवंताची वाहवा होऊ लागली. इथेच माशी शिंकली! सगुणा बाईला हे सर्व खटकत होते. शेवटी त्यांनी आपले तिसरे नेत्र उघडले. नुसता क्रोध, संताप, कटकट एवढे चांगले घर केवळ एका बाईमुळे रणांगण भासू लागले त्यात शेवंताला मुलगी झाली. मग काय? सासरी न पाठवता तिने शेवंताला इथेच ठेवले. आणि मग चालू झाला सासुरवास.


सालगडी सोडले, घरची सर्व कामे, मुलीला सांभाळणे, खाण्याला न देणे, मुलाशी आठ आठ दिवस अबोला, वाचन लेखन न करू देणे एक ना अनेक! शेवटी शेवंता चा सहनशक्तीचा कळस झाला. शेवंता बुद्धीने खूप हुशार होती तिने एक प्लॅन बनवला पैशाची घरात कमी नव्हतीच प्लॅन मधे नवरा व घर काम करणारे चनदी व शिरपत यांना सामील केले. ते दोघे नोकरी गेल्यापासून आपल्या मुलखात राहायला गेले होते. एका रात्री धनाजी ने बायकोला चंदी व शिरपत यांच्या गावी पाठून दिले व शेवंता गायब झाल्याचे आईला सांगितले. सगळे घर घाबरून गेले आठ दिवस झाले तरी शेवंता सापडेना प्रकरण पोलिसात जाऊ नये याची मात्र धनाजी ने काळजी घेतली. सर्वात जास्त घाबरली ती सासू शिवाय जबाबदारी, लहान मुलगी, घरकाम शिवाय घराची बदनामी आता घरी कामाला ही कोणी  येईना. शेजारी पाजारी मदतीला कोणी धावेना असे करता करता १५ दिवस झाले.


सासूला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला.तिला लग्न होऊन आलेली शेवंता आठवली सुंदर मुखडा, शालीनता, घरकामात तरबेज, शिकलेली. सगुणा बाई एका एकी मोठमोठ्याने रडू लागली काय झाले म्हणून नवरा व मुलगा धावत आले पाहतो तर काय? आई देवाजवळ बसून डोके आपटत होती मुलाला आईला पश्चात्ताप झाल्याचे जाणवले आता मात्र त्याने ताणून न घेता आई व बाबाला सर्व हकीकत सांगितली आपली सून सुरक्षित असल्याचा सासूला आनंद झाला दुसऱ्या दिवशी अख्खं कुटुंब गाडी घेऊन गेले व सुनेला घरी आणले सोबत चंदी व शिरपत होतेच घरी येताच सासू सुनेचे पाय पकडू लागली पणं नाही! सुनेने वरच्या वर सासूला आलिंगन दिले. यानंतर मी तुला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळेल असे वचन दिले.सगळ्यांचे नेत्र पाण्याने डबडबले.


घर पूर्वीप्रमाणे आनंदी भासू लागले धनाजीने खूप दिवसांनी एक मोकळा श्वास घेतला आता त्याला खूप हलकं हलकं वाटत होतं. 


Rate this content
Log in

More marathi story from veena joshi

Similar marathi story from Drama