एक अविस्मरणीय प्रवास...
एक अविस्मरणीय प्रवास...
हा प्रसंग मी आणि माझे मित्र रात्री लॉंग ड्राइव ला जातानाचा आहे.....
मी आणि माझे 2 मित्र आकाश आणि मयुर आम्ही सकाळीच नाशिक च्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात रात्री गाडीने जायचे ठरवले....
रात्र झाली आम्ही आमची लंबोर्गिनी काढली आणि 9 वाजता निघालो.....
रात्री 10 च्या सुमारास आम्ही मुख्य रस्त्याला लागलो.... रात्री वाहनांची रस्त्यावरची वर्दळ ही कमी झाली होती.... आजुबाजूला आमच्या खेरीज क्वचितच एखाद्या गाडीचा आवाज यायचा.... आम्ही वारा आत येऊ नये म्हणून गाडीच्या काचा बंद केल्या आणि गाडीतील रेडियो वर गाणी ऐकू लागलो. थोड्या वेळाने आम्ही स्टेशन बदलले... तोच रेडिओ वर अचानक एक बातमी येऊ लागली... ब्रेकिंग न्यूज...पावसाने जोरदार वेग पकडल्याने हायवे रस्त्याने जात असलेली सगळी वाहने चक्का जाम.....
झालं कल्याण!
"आपल्या ला लॉंग ड्राइव ची हौस, त्यात पडला हा पाऊस.... याला पन आत्ताच पडायचे होते...
चिल रे! करु आपण काहीतरी.... मी रोज या रस्त्याने येत जात असल्यामुळे मला सर्व मधले रस्ते माहित होते....
मी गाडी तिथूनच मागे घेतली आणि मधल्या रस्त्याने आम्ही निघालो..... रस्ता थोडा हायसाच होता.... कच्चा रस्ता होता म्हणून मी गाडी हळूहळू चालवत होतो...
आकाश म्हणाला.... काय यार, कोणता रोड आहे हा.... मी तर पहिल्यांदच पाहतोय.... कधी पोहचणार आपण.... आणि खुप भूक पन लागली आहे यार.... काहीतरी खाऊ आणि थोडा आराम देखील करू...
हो करु सगळे.. मी ही थकलोय या पावसाळ्यात गाडी चालवत चालवत.... पुढे काही रेस्ट रूम वगैरे दिसते का बघुयात..... तशी मी गाडी थोडी पुढे घेतली... आणि एक छोट पडकं घर दिसले आणि शेजारीच एक बाई स्वयंपाक करताना दिसली.....
चला मंडळी, राहायची खायची सोय झाली.... आज थोडा इथेच आराम करु....
आम्ही त्या घराच्या पडवीत बसलो..... आम्ही आत जाऊन पाहिले, कोणी आहे का असं पन तिथे कोणीच नव्हते....थोडा वेळ झाला... आणि घरातून आवाज आला.... "पोरांनो अरे आत तर या"..... आणि एका भयानक विचित्र हसण्याचा आवाज आला...... कोण्या बाईचा आवाज होता तो..... मी आत जाऊन पाहिले.... तर त्या बाईचा चेहरा विचित्र होता.... हात पाय वाकडे... आणि तिचे ते भयानक दात 😬. डोळे ही लाल आणि बाहेर आलेले होते. ते पाहून माझी दातखिळीच बसली. ..... आणि अचानक ती चालत माझ्या अंगावर येत होती.....
मी जोरात ओरडलो.... आणि माझा आवाज ऐकून ते तिथे आले.... मी त्यांना म्हटले.. पळा इथनं..... तसे आम्ही गाडीत बसलो.... मी गाडी कस तरी करत जोरात घेतली तिथून....
प्रवास अजून संपलेला नव्हता.... तोच ती बाई आणि तिच्या सोबत तिच्या सारखेच दिसणारे... 100 एक जण आमच्या मागेच लागले.... विचित्र आवाज करत करत....
कोण माणसे आहेत ही . आपल्या का मागे लागली आहेत ही.... विशेष म्हणजे ती सगळी माणसं अर्ध जळालेली होती.....
आकाश आणि मयुर ते द्रुश्य पाहून आधीच कोमात गेले होते......
मी घामाने आधीच भरलो होतो.... काही केल्या ती माणसे आमचा पाठलाग सोडत नव्हती....
मी गाडी जोरात 5-6 किलोमीटर नेली आणि तिथून कस तरी बाहेर निघालो....
बहुतेक त्यांची सिमा संपली असावी.... आणि मागून आवाज आला... " पुन्हा इकडे येऊ नका.... "
आम्ही आता मंदिराच्या जवळ आलो होतो.... महादेवाचा धावा करत करत त्यांच्या कृपेने आम्ही सुखरूप तिथून बाहेर पडलो.....
समोरच एक ढाबा दिसला... आणि जरास हायसं वाटलं....
आम्ही घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.... त्यावर ते म्हणाले... पोरा हो अमावस्येची रात हायं... आणि कोणता रोड ... इथून कोणताच कच्चा रस्ता लागत नाही.....
तुम्ही थोडक्यात बचावले पन तिथून नाहीतर तुमची पन तिच अवस्था झाली असती.....
आम्ही त्यांना विचारले " कोण होती ती लोक? "
तसे ते घाबरतच म्हणाले... झ,झ, झ, झ, झ,....... झोम्बीं.....
आणि त्या काकांचा ही चेहरा ... अगदी झोम्बी सारखा झाला......
आम्ही तिथून जोरात रिटर्न गेर टाकून घरी आलो.....
पुन्हा कधी च त्या मार्गे गेलो नाही.... आजही हा प्रसंग आठवला तरी ते चित्र विचित्र चेहरे आणि आवाज ऐकू येतात....
आणि अंगावर सर्रकन काटाच उभा राहतो........
समाप्त........
