Ajay Nannar

Abstract Romance Fantasy

4.0  

Ajay Nannar

Abstract Romance Fantasy

एक न संपलेल प्रेम....

एक न संपलेल प्रेम....

3 mins
247


    कधी न कधी आपल्या आयुष्यात एखादी तरी अशी व्यक्ती येते की ती आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते... आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनुन जाते... 


आपण तिच्या विषयी दिवसरात्र स्वप्न पाहत असतो... की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी... आपल्या सोबत असावी... फक्त ती आणि मी... आम्ही दोघे सोडून इतर कोणीही तिथे नसावे... मस्त हातात हात घालून फिरायला जावे.... तिच्या सोबत मनसोक्त गप्पा माराव्यत.... आपल सगळं जग तिच बनुन जावी असे प्रत्येकाला वाटते... 


   अशीच एक गोष्ट.... 


   श्रेयस आता मोठा झाला होता.  BBA करुन आता MBA करायला लागला....आता मोठ्या कॉलेज ला आहे.... कॉलेज चे ते दिवस मस्त, मजेत, मित्रांबरोबर जायचे.... कधी कॅन्टीन तर कधी कॅफे मध्ये दिवस जायचा... 


  कॉलेज मध्ये दोन तीन मित्रांशी ओळख झाली. काही दिवसांनी श्रेयस ला कॉलेज मधील एक मुलगी आवडायला लागली.


सगळ्यांना माहीत होते. श्रेयस ने त्या मुलीशी मैत्री केली. कधी नोट्स तर कधी अभ्यासातही मदत करीत. श्रेयस अभ्यासात खूप पुढे होता. हळूहळू चांगली मैत्री होऊ लागली... बोलणे चालणे ही होऊ लागले. आता श्रेयस ला तिच्या सोबत वेळ घालवणे आवडु लागले. कधी लायब्ररी तर कधी कॅन्टीन मध्ये जायचे. श्रेयस च्या आयुष्यात सगळ काही व्यवस्थित चालू असताना... कोणाची नजर लागली देव जाणे.... कोणी काय सांगितले तीला देव जाणे... 


   हळूहळू तिने श्रेयस शी बोलणे कमी केले... श्रेयस  एकदिवस तिला विचारले... तु माझ्याशी पहिल्या सारखी का बोलत नाहीस. माझी काही चुक झाली का❓.... त्यावर ती न बोलता सरळ निघून गेली. तिने WhatsApp, Instagram अशा Social Media वरुन ब्लॉक केले... आणि कधीही न बोलण्याचे ठरवले. 


     त्या नंतर चार महिने सोबत असुन ही ती श्रेयस शी बोलली नाही. कदाचित कोणीतरी माझ्या विषयी बोललं असेल तिला.... असे श्रेयस ला खात्रीच होती. 


श्रेयस नेहमीच तिचा विचार करत असे.तिने असे का केलं असेल... तोच विचार करत तो जगत असे... ती नसताना ही तिचे भास होत असत... कदाचित हेच प्रेम 😙😍 असावे.. हे त्याला कळून चुकले.... एकमेकांपासून दूर असुनही ते सोबत होते ... 


    श्रेयस ने आता सगळे देवावर सोडले... ती नक्की परत येईल असा विश्वास होता त्याला.


    तो विषय एक होता पण श्रेयस ने त्याचा मानसिक समतोल ढळू दिला नाही. दिवस रात्र मेहनत केली. चांगला अभ्यास केला. पेपर ला पास होण्यासाठी नाही तर ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला. 


   चार महिने नंतर श्रेयस ला मोठ्या कंपनीत Internship साठी Offer आली...


श्रेयस नी ती Offer Accept केली आणि तो सहा महिन्यासाठी कंपनी त Selection झाले. आता श्रेयस निवांत होता. चांगला पगार होता कंपनी त.


आणि अजुन तरी काय हवे होते. 


     काही दिवसांनी कॉलेज मध्ये University Exams सुरू झाल्यानंतर तो Exam ला गेला.... 


    खुप दिवसांनी कॉलेज ला आल्यावर वर्गातले मित्र भेटले. गप्पा गोष्टी झाल्या.... सगळे कसे एकदम निवांत होते.... परिक्षे मुळे Tension होते... पन श्रेयस गेल्या वर ते Tension दुर व्हायचे... मस्त मजेत असायचे सगळे.... पन ती मात्र दिसत नव्हती....श्रेयस सारखा तिलाच शोधायचा... बोलत नसले तरी ते एकमेकांकडे बघायचे.... कदाचित तिला ही काहीतरी बोलायचे असेल... असे दिसत होते. पन प्रत्येक गोष्टी ला योग्य वेळ लागते... आणि ती वेळ आता आली होती.... 


     दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पेपर झाल्यावर श्रेयस घरी जायला निघाला... पावसाचे दिवस होते... म्हणून जोरात पाऊस पडत होता... जाण्यासाठी काही च नव्हते... तरी दोन तीन रिक्षा दिसल्या चौकात... तसा रिक्षात जाऊन बसलो..... काही वेळा नी ती ही येताना दिसली... लांब वरुन मी तिला ओळखले.. कदाचित ती ही रिक्षाकडेच येत असावी.... आणि ती आली.... ती आणि तिची मैत्रीण आली होती.... मी आधीच रिक्षात असल्याने.... आणि सगळ्या मुली असल्याने मी रिक्षात पुढे रिक्षाचालक शेजारी बसलो... काही वेळा नंतर एक जण उतरले... श्रेयस आता मागे गेला.... श्रेयस आणि आनंदी आता सोबत होते.... श्रेयस लाही तिच्या सोबत बोलावे वाटत होते... मनात खूप काही असताना... मनातले मनातच राहिले..... कदाचित माझ्या मनात ले तिला कळून गेले असावे.... की मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की... माझे तुझ्या वर मनापासून खूप प्रेम😙😍 आहे. 

आणि तिला ते माहीत होते... म्हणून ती मला सारखा स्पर्शाने खुणावत होती.... आम्ही शेजारी एकमेकां सोबत बसलो होतो... मला खूप मस्त वाटत होते... बाहेर मस्त पाऊस आणि थंड वारा... आणि रिक्षात शेजारी शेजारी ती आणि मी..... तिची ही भेट योगायोगाने होती.. की देवाने आमची भेट घडवून आणली.... तिची ती एक भेट अविस्मरणीय होती.... कायम लक्षात राहणारी..... 


     कदाचित हेच ते प्रेम असावे.... कधी ही न संपणारे...... 


    समाप्त.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract