STORYMIRROR

Ajay Nannar

Horror Thriller

4  

Ajay Nannar

Horror Thriller

शिट्टी...

शिट्टी...

4 mins
474

 लहानपणी आपण शिट्टी वाजवलीच असेल. आणि ते गाणं ही ऐकलं असेल. शिट्टी वाजली गाडी सुटली.... पण एका गावात आजही शिट्टी वाजली तर लोक घराबाहेर येत नाहीत. रात्री च्या वेळी कोणीच बाहेर भटकत नाही. कारण त्या गावात आजही शिट्टी वाजते.... चला तर मित्रांनो जाणून घेऊया या शिट्टी मागचं रहस्य......


म्हादबां मागच्या च गावात राहणारा स्थानिक, वाड्या वस्त्यांमध्ये, रानोमाळ फिरणारा. चांगलाच दांडगा अनुभव असणारा. जवळपास साठी ओलांडली असेल त्यांनी.आमच्यासाठी बाबा होते ते. घराला खूप आधार दिला होता. आणि ते आम्हाला गोष्टी ही सांगत. त्यातलीच एक ही शिट्टी. आजोबांनी सांगायला सुरुवात केली की आख्खा गाव गोष्टी ऐकायचा. 


आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली... कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आरवली.... लहान असताना बालपण तिथेच गेले. ते कोकण किनारपट्टीवर जायचे. सगळीकडे नारळाची झाडे आणि तो निसर्गरम्य परिसर. खुप छान वाटायचे. असेच एके दिवशी आजोबा आणि त्यांचे मित्र सदा काका रात्री फिरायला गेले असता... सदा त्यांना म्हणाला आता येथून पुढे जाणे आपल्या साठी योग्य नाही आपण मागे जायला हवं. का मागे जायचं, भिता का काय आपण आजोबा म्हणाले. आजोबा धीट, नीडर होते. सदा काका म्हणाले तसे नाही पण आपण रात्री च्या वेळी बाहेर पडलोय... आणि रात्री तर वाईट शक्ति वगैरे जागरूक होतात. वेशीच्या बाहेर आपण नको जायला...सदा काका मागे जायला निघाले... थोडे मागे गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की आपल्या ला चकवा लागलाय.. वाईट शक्तींच्या घेऱ्यात आपण अडकलोय... आणि तेवढ्यात अचानक शिट्टी वाजली.. ते शिट्टी च्या दिशेने जाऊ लागले. वाटले कोणीतरी लहान मुल मस्करी करतंय... थोडे पुढे गेल्यावर जाता जाता सदा काकांना जाणवले की मागुन कोणीतरी त्यांचे पाय जमिनीत आतमध्ये खेचतयं....त्यांनी बाहेर यायचा प्रयत्न केला पण व्यर्थ.. आणि अचानक पाय मोकळा झाला. सदा काकांना नेमके काय होतयं काहीच समजेना... थोडे पुढे जाताच त्यांना हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला होता कारण एवढ्या वेळ ते कोणाच्या तरी सोबत बोलत होते. पण शेजारी आजुबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. फक्त काळाकुट्ट अंधार आणि स्मशान शांतता. जाता जाता एक स्मशानभूमी लागते... आणि सदा काका नेमके ते ओलांडून पुढे चालले होते तेवढ्यात त्यांना एक काळी सावली त्यांच्याच कडे येताना दिसली. आणि काळजात एकदम धस्स झाले. 

अंधारात ती काळी सावली एकदम गडद होत चालली होती. सदाभाऊ जोरजोरात धावू लागले पण त्यांच्या लक्षात आले की आपण जेवढे जास्त धावत आहोत तेवढीच ती काळी सावली अजुन जवळ येत आहे आणि ती आपल्या मागे येत आहे आणि तिचा आकार ही मोठा मोठा होत चालला आहे. आता सदाभाऊ धापा टाकत टाकत गावाच्या वेशीवर येण्याचा प्रयत्न करत होते पण जेवढे पळत पुढे जात होते त्यापेक्षा दुप्पट अंतर वाढत चालले होते. आता तर सदाभाऊंची होती नव्हता तो जीव हातात आला. आता मरण जवळ येतयं की काय असे वाटू लागले. तेवढ्यात मागुन परत शिट्टी चा आवाज आला आणि एक वाक्य ऐकू आले... " सदा माघारी जायचो नाय आता इथंच मरण हायं ".... आणि जोरजोरात हसण्याचा चित्रविचित्र आवाज कानी येऊ लागला. आता आपले काय खरं नाय सदाभाऊ मनात म्हणाला आणि परत होता नव्हता तो जीव घेऊन धावू लागला. पण संकट अजून संपले नव्हते. सदाभाऊ धावत धावत एका ठिकाणी पोहोचला तिथुन दोन रस्ते जात होते... चला सुटलो एकदाच....बहुतेक ते रस्ते आपल्या ला आपल्या वेशीपर्यंत घेऊन जातील आता आणि त्याने वर रस्त्याच्या पाटीवर पाहिले एक रस्ता स्वर्गात तर दुसरा नरकात जात होता.... बापरे जिवंतपणी स्वर्गात जाणार... रस्ते कसले मरणचं ते .... काळी सावली आपल्याला बहुतेक स्वर्गातच घेऊन जाणार.... थोडा रस्ता पार केला...तिथे भुतांची जणू जत्राच भरली होती... चित्रविचित्र आवाज कानी येऊ लागले... सदाभाऊ धावत सुटले या स्वर्गाच्या रस्त्यावर तर आलो आता परत कसे जाणार...सदाभाऊ जसाजसा रस्ता मागे जायचा प्रयत्न करत होता तेवढाच तो रस्ता भयानक वाटत होता. जाता जाता रक्ताचा थारोळ्यात कोणीतरी पडलेले दिसले.. सदाभाऊ त्यांना मदत करण्यासाठी हात देणार तेवढ्यात त्याचे लक्ष त्याच्या शरीरावर गेले आणि लक्षात आले की त्याला मुंडके च नाही आहे. त.. त.. प.. प... करत तिथून जाण्याचा प्रयत्न केला पण ते शरीर त्याच्या मागे येऊ लागले आणि त्याच्या हातात एक धारधार शस्त्र होते... बहुतेक तो आपल्या ला मारायलाच आला असणार... ते जे काही आहे आपल्याच मागे आहे.... आता ती काळी सावली आणि ते शरीर आपल्या ला सोडणार नाही. सदाभाऊ मनातल्या मनात देवाचा धावा करु लागले.. कोण आहे तो... खविस,मानकाप्या , काळी सावली... सदाभाऊ आता खूप मोठ्या संकटात सापडले होते... ती वाट म्हणजे म्हसणवाटंच होती. एका वेळेस एवढी भुते बाहेर आली... आता काय खरं नाय... आणि धावता धावता लक्षात आले आज आकाशात ला चंद्र नाय म्हणजे ही अमावस्येची रात्र हाय आणि भुतांचा प्रहर हा सुरू झालाय.... 


 सदाभाऊ धावत धावत वेशीवर येण्याचा प्रयत्न करत होते. वाटेवर गावातलाच एकदंत दिसला. सदाभाऊ थांबले आणि त्यांनी एकदंताला विचारले आपला रस्ता कोठे आहे... एकदंतानी हात दाखवला वाटेकडे आणि अद्रुष्य झाला. सदाभाऊ तिकडे जाऊ लागले आणि मनात आराध्य दैवत श्री. वेतोबा चा धावा करु लागले... काही वेळा नी एक रस्ता बाजूला झाला आणि तो रस्ता सरळ वेशीवर जाताना दिसला.. आणि ती भुते तिथे येणार तोच विजांचा आवाज आला आणि एक आवाज आला.. " जोवर मी इथे उभो हाय तोवर कोणीबी आत जावाचो नायं... माझ्या लेकरासनी तरास द्यावोचा नायं... नायतरं माझी काठी बोलतलें "..... क्षेत्रपाल श्री देव वेतोबा तेथे आले.... 


सदाभाऊ आता सुखरूप त्या चक्रातून बाहेर पडलो.आणि श्री वेतोबा देवाचे दर्शन घेतले.... 


आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावात क्षेत्रपाल श्री वेतोबा गावाच्या वेशीवर पालन करतात. आणि अनेक जणांना वेगवेगळ्या रूपात मदत केल्याचे अनुभव ही आले आहेत. आणि वाईट शक्ती त्या गावात आता प्रवेश करू शकत नाही....


तुम्हीही कधीतरी आरवली गावात जाऊन क्षेत्रपाल श्री देव वेतोबा यांचे दर्शन घ्यायला नक्की जा.... 


धन्यवाद...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror