Ajay Nannar

Horror Thriller

4  

Ajay Nannar

Horror Thriller

संगम लॉज

संगम लॉज

5 mins
560


शहराच्या त्या भागाचा म्हणावा असा विकास झाला नव्हता.तिथली लोकसंख्या पण जास्त नव्हती.एरवी शहरात नसणारी शांतता ईथे अनुभवता येत होती.ठिकठिकाणच्या जमिनीला कंपाउंड केले होते.तर काही ठिकाणी मोठमोठ्या लॉजचे काम पुर्ण झाले होते..

अशाच एका लॉजमध्ये नुकताच मी राहायला आलो होते. नाव होते संगम लॉज .कामाचे ठिकाण तिथुन जवळ होते.बऱ्यापैकी पॉश एरिया होता..लॉज बांधुन एक दोन वर्ष झाली असतील.आम्हीही लॉज मध्ये एक रूम घेतली होती. आजुबाजुला बरीच बांधकाम देखील चालु होती.पण एक गोष्ट तिथे जाताच लक्षात आली.ती म्हणजे ईथल्या बऱ्याच रूमच्या दरवाजांना कुलुप लावले होते.माझी रूम पाचव्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर होता.दरवाजाचे कुलुप ऊघडुन आत पाऊल टाकले.फरशीवर साचलेली धुळ सोडली तर सगळी रूम अगदी व्यवस्थित होती.आत कसले सामान नव्हतेच,नाही म्हणायला एक मोठा लाकडी बेड आणि लहानसे टेबल होते.ते नक्कीच सावंतांचेच असणार.सावंत माझे सिनियर सहकारी आणि या रूमचे मालक काही कारणाने त्यांनी ही रूम सोडली होता.त्यांना ती विकायची होती. पण ती रूम कोणी विकत घेतच नव्हते.कंपनीतील त्यांच्या ओळखीची कितीतरी लोक फक्त एक दिवस राहुण दुसऱ्या दिवशी तो रूम सोडत असे,काय कारण असेल ते असेल.मला त्याच्याशी काही घेणे देणे नव्हते.माझी राहायची सोय झाली हेच माझ्यासाठी बास होते.दहा पंधरा मिनिटातच तीन रुमचा संपुर्ण फ्लॅट झाडुन घेतला.बॅगेतुन कपडे काढुन हॅगरवर अडकवले.

झोपायला लाकडी बेड होताच,पण माझी हाईट सहा फुट आणि त्या मानाने बेड छोटा होता.खालीच फरशीवर झोपावे लागणार होते.त्याला ओढत आणुन गॅलरीजवळ लावण्याचा मनात विचार आला.पण तो एवढा जड़ होता कि जरासुध्दा जागेवरुण हलत नव्हता.शेवटी तो विचार सोडुण दिला..

रात्री अंधार पडल्यावर जेवण करायला बाहेर गेलो.जेवत असताना सावंताचा फोन आला.त्यांच्या बोलण्यावरुण ते काळजीत असल्यासारखे वाटत होते.सापडला का पत्ता वगैरे चौकशी झाल्यावर त्यांनी सांगितले.

"ऐक मी ती रूम विकण्याचा विचार केव्हाच सोडुण दिलाय .तुला फारच गरज होती म्हणुन दिलाय...लवकरात लवकर तुझी दुसरीकडे सोय कर ..शक्यतो ऊद्याच.."

"पण का मी तुमच भाड वेळेवर देत जाईन.."

"प्रश्न पैशांचा नाही,त्या घरात मला खुप भयानक अनुभव आले आहेत.त्यामुळे मी ती रूम सोडली.त्यानंतर तिथे राहणाऱ्या अनेकांना पण असाच अनुभव आलाय..तिथे भुताटकी आहे.."

आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितल ते ऐकुन माझ जेवणारच लक्ष उडाल..

"ठिक आहे.."

अस म्हणत मी फोन कट केला..

फोन ठेवताच एकटाच हसायला लागलो.काय तर म्हणे भुताटकी..पण त्यांनी केलेल वर्णन एवढ भयानक होत.कि ऐकताना माझही ह्रदय धडधडत होत .जेवण झाल्यावर जरा फेरफटका मारला.आणि परत सोसायटीत आलो जिन्यावर अंधार होता.लिफ्ट तर कोणी वापरतच नसावे.पहिल्या दोन मजल्यावरील लोक सोडता बाकिच्या मजल्यावर कोणीच राहत नव्हते.आणि पाचव्या मजल्यावर तर मी एकटाच..पण मला याचे काहीच वाटत नव्हते.लिफ्टमधुन मी वर जाऊ लागलो.पहिला मजला गेला.दुसऱ्या मजल्यावर आल्यावर एक लहाण मुलगी लिफ्टमधुन जाणाऱ्या माझ्याकडे पाहत होती.त्यांनंतर पुढच्या तीनही मजल्यावर गडद अंधार पाचव्या मजल्यावर लिफ्ट थांबली तरी अंधारामुळे ते समजले नाही. मोबाईलचा टॉर्च ऑन केला दरवाजावरील कुलुप ऊघडले.आत जाऊन दरवाजा बंद केला.सकाळी लवकर कामावर जायचे असल्याने खालीच फरशीवर चादर टाकुन त्याच्यावर पडलो.एकदा त्या लाकडी बेडकडे पाहिले आणि सावंताचे बोलणे आठवले.काही वेळाने झोप लागली,मधुनच कुणाच्यातरी खोकल्याचा आवाज आला पण झोपेत असल्याने त्याकडे लक्ष गेले नाही.फ्लॅटमध्ये हलकासा गुरगुरण्याचा आवाज आला..विलक्षण थंडी वाजु लागली.आणि मी ऊठुण बसलो आवाज अजुनही येत होता.तो लाकडी बेडवरुण येत होता.अंधारात एक पुसटशी काळी आकृती बेडवर दिसत होती.हळुच ऊठुण लाईटीचे बटन दाबले.खोलीत स्वच्छ प्रकाश पसरला बेडवर एक म्हतारी झोपली होती..ती एका अंगावर असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता.फक्त अंगावरील जुन्या पध्दतीची साडी..काळेकुट्ट पाय....डोक्यावरील पांढरे केस एवढेच दिसत होते.साडीखाली शरीर आहे कि नुसताच हाडांचा सांगाडा काही कळत नव्हते.

सावंताचे बोलणे आठवले नवीन फ्लॅट घेतेवेळी त्यांनी सेकंडहन्ड असलेला हा बेडपण घेतला होता.बेड दुकाणातुन बाहेर आणताच शॉर्टसर्किट होउन दुकान जळाले.सामान असणाऱ्या मोठ्या गाडीतुन बेड आणताना गाडीचा ॲक्सीडेंट होऊन ड्रायव्हर गेला.ज्यां चौघांनी रूममध्ये बेड आणला त्यांचा त्याच दिवशी वेगवेगळ्या अपघातात मुत्यु झाला.एवढे बळी घेऊन बेड घरात आला.दुसऱ्या दिवशी आमची संपुर्ण फॅमिली तिथे शिफ्ट झाली.माझी आजी खुप देवधर्म करायची.घरात येताच तिला काहीतरी जाणवले असावे.ती एकटक बेडकडे पाहत राहिली.तिने लगेच भिंतीवर मारुतीचा फोटो लावला.सगळ्यांच्या गळ्यात मारुतीची लहाणशी गदा घातली.बेडला कोणी हातही लावायचा नाही असे सांगितले.नंतर देवाच्या फोटोसमोर बसुन सारखी माळ ओढु लागली.ती फार देवभोळी होती..खुप वेळ झाला तरी ती तशीच बसुण होती.जेवायची वेळ झाली तिला हाक मारली तर माझ्याकडे पाहत नुसतीच..

"अवघड हाय..तुम्ही जेवुण घ्या"

एवढेच म्हणुन परत डोळे मिटले.

रात्री झोपताना बेडवर कोणीच झोपायचे नाही असे तिने सगळ्यांना सांगितले.सगळे एकाच जागी झोपले तिने आमच्या भोवती कुंकवाचे एक मोठे रिंगण आखले.आम्हाला काय चाललय काही समजत नव्हते.घरात तिचा दराराच एवढा होता कि काही विचारायची सोय नव्हती.सगळे झोपले पण ती जागीच होती. मध्यरात्रीची वेळ असेल सगळे गाढ झोपेत होते.अचानक जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागला.सुरुवातीला दुर्लक्ष केले पण लगेच समजले कि आवाज आपल्याच घरातुन येतोय.त्यातील एक माझ्या आजीचा होता आणि दुसरा कोणाचा हे बघायला ऊठलो.बघतो तर आमच्या समोरचे कुंकवाचे रिंगण चमकत होते.बेडवर एक म्हतारी बसली होती,कोण ती ईथे कशी आली.काही समजेना ती काळीकुट्ट दिसत होती..चेहऱ्यावर सुरकुत्या..दोन्ही गाल आत गेलेले..तिचा घोगरा आवाज फ्लॅटमध्ये घुमत होता.एकंदरीत ती भयानक दिसत होती.काही वेळ असे वाटले कि आपण स्वप्नात तर नाही.तिच्या समोर आजी ऊभी होती.दोघी जोरात भांडत होत्या..बायको आणि दोन्ही मुलपण ऊठुण बसली.

"कुठुन आलीस तिथ परत जा..हे माझ घर हाय.."आजी तिला म्हणात होती.

"म्या जाते पर ह्या चौघातल्या एकाला माझ्यासोबत घेऊन जाणार...."

ती आमच्याकडे पाहत म्हणाली..आणि जोरात हसु लागली.तिच्या तोंडात दातच नव्हते..होता तो फक्त काळाकुट्ट अंधार..

"खबरदार..ही माझी पोर हायती.ह्यांना जर काय झाल तर गाठ माझ्याशी हाय..."

आजीच्या बोलण्याने आम्हाला आधार वाटु लागला..

"अस कस ह्यातला एक तरी मला दे..ती पोरगी दे तिला घेऊन जाते.."

ती बायकोकडे पाहत म्हणाली.तशी बायको मला बिलगली..

नंतर काय झाले सगळीकडे अंधार पसरला.येत होता तो फक्त भांडणाचा आवाज..आजीच्या आवाजात कधी जरब होती..तर कधी विनंती होती.मध्येच त्या म्हतारीचा घोगरा आवाज..

"मी एकाला तरी घेऊनच जाणार.."

तिचा आवाजही खोल खोल होत गेला.पहाटे कधीतरी हे थांबल कुंकवाच्या रिंगणाचही चमकण बंद झाल.खोलीत प्रकाश पसरला.आजी बेडसमोर ऊभी होती. पण आता ती म्हतारी नव्हती.आजी आमच्याजवळ आली...

"चला सामान भरा लवकर हे घर खाली करावे लागेल.न्हायतर काय खर नाय.."

ती माझ्या चेहऱ्यावरुण हात फिरवित म्हणाली.

"पण ती कोण होती.."

"ते काय माहित नाय...हे प्रकरण काय साध नाय.ती भुकेली हाय..जो कोणी तिची झोपमोड करील ती त्याला सोडत नाय.मी मुद्दम तिची झोपमोड केली.पण तिला संपवण माझ्या हाताबाहेरच हाय..."

ती बेडकडे पाहत म्हणाली..

मी लगेच निर्णय घेतला.रूम खाली केला.तो बेड तिथेच ठेवला.थोडे दिवस नातेवाईंकाकडे राहिलो.आणि नंतर स्वत:ची सोय दुसरीकडे केली.मला कोणालाही संकटात टाकायचे नव्हते..म्हणुन रूम विकण्यापुर्वी सगळ्यांना त्याची कल्पना अगोदरच दिली होती.ज्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता.त्यांनी एक रात्र तिथे घालवली.सर्वाना तोच अनुभव आला त्यांना मध्यरात्री म्हतारी बेडवर दिसल्यानंतरच खात्री पटली.त्यांनीही संयमाने काम करत तिची झोपमोड न करता तिथुन सटकने पसंद केले.शेवटी मी ती रूम विकण्याचा नादच सोडुन दिला..

सावंतांनी फोनवर सांगितलेले आठवत असताना.मी कधी बेडजवळ आलो.काही कळलेच नाही.ती म्हतारी माझ्या दिशेने वळली.सावंतानी वर्णन केल्याप्रमाणे..काळाकुट्ट चेहरा...त्यावर सुरकुत्या..दोन्ही गाल आत गेलेले.ऊघड्या तोंडात दिसणारा काळाकुट्ट अंधार...मी मागे मागे सरकु लागलो.अगदी हळुहळु कोणताही आवाज न करता.आणि नेमका मध्ये ठेवलेल्या टेबलाला धडकुन खाली पडलो.आणि म्हतारीने डोळे ऊघडले..

दुसर्या दिवशी संगम लॉज च्या पहिला मुत्यु झाला.पाचव्या मजल्यावरील सावंतांच्या रूममध्ये माझे प्रेत सापडले.ऊघडे असलेले डोळे बेडवर खिळले होते.शेजारी सावंत ऊभे होते.प्रेत पोस्टमार्टनसाठी नेण्यात आले.पण मुत्युचे कारण फक्त सावंत आणि मलाच माहित होते.


समाप्त..


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror