Ajay Nannar

Abstract Inspirational

4.0  

Ajay Nannar

Abstract Inspirational

जुनी गढी

जुनी गढी

3 mins
312


   गावची गढी व गढीवरील उंचच उंच हवेली तेही कौलारु असलेली.घराचे चारही बाजूंना पाण्याची वळण असलेले छप्पर.पावसाळ्याच पाणी धो धो यायचं.त्या पाण्याने गढीच अंग धुवून निघायचं व नंतर सुसाट वारं येवून अंग पुसायचे.कारण गढी ही एक गावातील इतर घरांपेक्षा स्वतंत्र अस्तित्वाच तगं धरणार ठिकाण होती.तेव्हा गढीच्या पायथ्याशी गेल्यावर, जर गढीचे वरचे टोकाकडे पाहीले तर डोक्यावरची टोपी पडायची. एवढी उंच पण तेवढीच रुबाबदार ताडमाड दिसणारी ती गढी.गढी आंब्याचे डेरेदार झाडासारखी डौलदार असलेली नजरेत भरणारी.

    तेव्हाची गढी म्हणजे गावचे वतनदाराची ती एक छोटीशी वसाहतच. संपूर्ण गढीचेवर त्यांचे कुटुंबीयांचा व नोकरचाकरांचा गढीभर वावर.गढीवरील गावचे सगळ्यात धनिक कुटुंब म्हणून पंचक्रोशीतील वतनदार ह्या नात्याने ओळख होती.ईंग्रजांचे काळातील त्यांनी ठरविल्या नुसार कमीशनवर शेतसारा वसूल करुण तो शासन दरबारी जमा करण्याची जबाबदारी त्यांचेवरच असायची.त्या मुळे गढीवरील दिवाणखान्यात चोविसतास माणसांचा राबता.व त्या मुळेच अनेक ईतर कुटुंबासाठी सुद्धा राहण्याची सर्वत्र स्वतंत्र व्यवस्था गढीवरच असायची.

   गावाचे मधोमध असलेली ती गढी व तिला ईतर गावक-यांचा कडेकोट पहारा.लुटारु किंवा इतर गुन्हेगार जर गढीवर चाल चालून आले तर त्यांचे गैरवर्तनाची हालचाल दुरुनच दिसायची व त्यामुळे गढीवरील सर्व यंत्रना सावध व्हायची.गढी ही त्या काळची टेहळणीसाठी वापरायचे उंच असलेले ठिकाण होते. तेव्हा गावक-यांना सूचना देवून सावधानतेचा इशारा दिल्या जात होता.तेव्हा गावातील संपूर्ण मंडळी गावावरील संकटसमयी एकजुटीने गावाची शत्रूपासून संरक्षण करायची.तेव्हा एकजुट दिसायची.गढीच्या पायथ्याशी धान्याची पेव सुध्दा ज्वारीने भरलेली असायची.धान्या सोबत तेव्हा पेवात ईतर मौल्यवान ऐवजही ठेवलेल्या जात होता. पेवांची ईतरांना कानोकानी खबर नसायची.कारण त्या गावाची गढी म्हणजे ती तेव्हाची अन्नधान्याची अन्नपूर्णा असायची.

   गढी ही उंचावर असल्या मुळे गढीवरील अनेक भुयारी गुप्त मार्ग दूरवर जाऊन बाहेर निघत होती.तेव्हाची गढी म्हणजे एक शत्रूला झुंज देणारा बालेकिल्लाच होता.गढीवर तिक्ष्ण दगडांचा ढिग,मोठं मोठी पाणी साठविण्याची हौद,मोठमोठ्या लोखंडी कढया, भरपूर इंधन,हरयाणा अतिरीक्त साठा नेहमीच असायचा.शत्रुपासुन संरक्षण करण्या साठी.पण गढीवर सर्वांत मोठी समश्या होती ती दैनंदिन वापरण्याचे पाण्याची.तेव्हा ईतर कोणत्याच सोई पाणी साठविण्याच्या व पाणी यंत्राव्दारे वर ओढण्याच्या सोयी नसल्या मुळे.गढीवर पाण्याची तहान भागवण्यासाठी एकतर हेल्याचे पाठीवर पखाल लादून पाणी आणा.नाहीतर खोल दोनशे फूट विहीरीतून पाणी काढा.त्या पैकी योग्य पर्याय घेऊन पाण्याची व्यवस्था केल्या जात होती.

   तेव्हा इंग्रजांचा काळ असल्यामुळे.गावक-यांकडून येणारा वार्षिक शेतसारा चांदिचे राणीचे कलदार चांदीचे रुपाने येत होते.ती सांभाळत ठेवणे एक मोठी समश्याच होती.म्हणून त्या पैकी काही गोळा केलेला शेतसारा जमीनीत गाडून ठेवायची ती वेळ..तेव्हा तो खजिना गढीच्या आडवडणी ठिकाणी गाडून ठेवणे तो सुरक्षित भासत होता.एखादा दडवून ठेवलेला खजिण्याचा साठा मालकाचा मृत्यू झाला किंवा वासरले की तो अनंत काळ दडलेलाच असायचा.

   आता कुठेकुठे गढींवर‌ मोजकेच लोक राहतात.बाकी ठिकाणी गढी ओस पडत आहे.कारण सर्व सामान्यांच्या मनात गढीविषयी धनाचे गुपीत म्हणून गुढ असलेलं कोड म्हणून पाहल्या जात आहे.

   दिवसेन दिवस गाव गावच्या गढ्या जसजश्या ओस पडत आहेत तसतसे धनगोळाकरणा-याचा वावर गढीचे भोवती वाढत आहे.कमी श्रमात धन मिळतं.असा त्यांचा अंध विश्र्वास आहे.त्या करीता ते मात्रीक,ता़त्रीकतेचा सहारा घेतात.नरबळी देणे,पायाळू व्यक्तीव्दारे धन शोधणे,साधनेव्दारे धन शोधणे,प्राण्याचा बळी देणे.असे अनेक प्रयोग गढीवर अमावस्येला व पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या जातात.त्यांचे हाताला काम लागते ते देवच जाणे...

   पण भाग्यवंताला गढीची माती घरातल्या भिंती सारवण्यासाठी आणतांना आम्ही लहान असताना ऐकवात होती." टोपलभर माती आणायला गेला,अण टोपलभर चांदीचे राणीछाप कलदार झाकून घेवून आला'.बरे हे त्यांचे नशिब होते त्यालाच जुनी नानी मिळाली.तो श्रीमंत झाला गावचा विकास करण्यात त्याचे धनाचा उपयोग तेव्हाचे किळी व्हायला लागला.

   अजुनही बरीच लोकं त्या ओसाड गढी कडे धनाचे लालसेने पाहतात.कारण त्या गावची गढी म्हणजे धनाचे आश्रय स्थानच आहे की काय? गढी वरली वस्ती ही जरी ओसरली असेल तरी पण गढीवर आधारीत धनाच्या दंतकथा अजुनही पारावर,खोडावर,ओट्यावर चविने चघडल्या जातात.माझा नंबर येईल व मलाही टोपलभर राणीछाप कलदार मिळतील.हीच भोळी भाबडी आशा घेऊन.. आणि ती जुनी नानी व धनाचे गबाड कुषित दडवून ठेवलेली गढी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract