STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Abstract Inspirational

2  

ANJALI Bhalshankar

Abstract Inspirational

द फर्स्ट टीचर

द फर्स्ट टीचर

4 mins
79

द फर्स्ट टीचर काल हा चित्रपट पाहण्याचा योग आला खरतर याविषयी मत मांडण्याअगोदर नौभारत सभेच्या सर्व तरूण कार्यकर्ते यांचे आभार. सिनेमा रशियन क्रांती वर आधारलेला आहे.एक शिक्षक गावातील मुलांना शिकवायला सरकारने पाठविलेल्या एका शिक्षकांचा संघर्ष पाहणारा प्रत्येक व्यकती यातुन काही ना काही धडा घेऊन जातो. विचार करायला प्रवृत्त होतो. 1935,40चा तो काळ शिक्षण आणि बाहेरच जग यापासून खअनभिज्ञ असलेल्या लोकांना लेनीन, रशियण क्रांती कामगार चळवळ यांच्याशी काहीच घेणदेण नाही पिढ्यान् पिढ्या भांडवलदारच्या दावणिला बांधलेले, अन्याय अत्याचार, स्री शोषण अज्ञान हेच जीवन समणारया मानसिकतेशी लढणं आवघड आहे परंतु अशक्य नाही. कोणत्या ही क्षेत्रात जेव्हा एकादी व्यकती प्रवहाच्या विरूद्ध पाऊल टाकते तेव्हा ती समाजाच्या नजरेत आगोदर मूर्ख व हसण्याचा विषयच ठरते. कोणतीही स्री मग ती उच्च स्वता: ला कुळातल्या समजलया जाणार्या वर्णातली असो वा पीचलेलया शोषिताना तिच्या विषयी विचार करण्याचा ,व पाहण्याचा दृष्टीकोन संकुचितच असतो या समाजाचा हे ही चित्रपट सांगून जातो त्या काळातही आणि आजही परीस्थिती फारशी बदललीय अशातला भाग नाही ती मादी आहे भोगायला मिळायलाच हवी हि पुरूषी प्रवृत्ती आणि लालसा आपल्या समाजात आजही होणारे हजारो बलात्कार दाखवून देतात. स्रीने कस राहिल पाहिजे,वागल पाहिजे, कोणते कपडे घालायला हवे कोणाशी बोलायला हवे.याचा चौकोनच जणू ठरवून दिलाय इथल्या मानसिकतेने.आणि सल याची जास्त आहे की एक स्री च दुसर्या स्रीच्या प्रती संवेदनशील नसते.हे चित्रपटातील नायिका अललीताई जेव्हा जबरदस्तीने होणार्या लग्नाला विरोध करून नायकासह घाबरलेल्या अवस्थेत सर्वप्रथम तिच्या जन्मदात्या आईकडे या अपेक्षेनं येते की तीला समजून घेईल .परंतु तसे काहीही न होता ऊलट तिलाच वेशया कुलटा, बदचलन बेअबरू, घरणयाची ईज्जत घालविणारी म्हणून मारायला ऊठते आणि त्याही पुढे एक रात्र तिच्यावर बळजबरी करणारया आणि, अगोदर एक पत्नी असताना हिला अक्षरशः विकत घेऊन भोगणारया पुरुषाला सोडून आलीस आता तू पवित्र मुलगीही नाहीस आणि नवरा सोडलास म्हणून एक आदर्श स्त्री ही नाहीस आता तुला कोण स्वीकारणार? ##आज काय स्थिती आहे कदाचित् स्वरूप बदलेलय पंरतु स्री ची अवस्था तीच एखादी मुलगी सासर च्या लोकांशी पटत नाही म्हणून चार दिवस माहेरी आली की चारच दिवस दिसायला हवी तिच्या जन्म दात्यांच्या घरात नाहीतर प्रश्नांना सुरुवात झालीच मग आईबापही या समाजापुढे हतबल होतात.## तिथे पुन्हा मस्तक सुन्न होतं की आरे!एक पोकत पुरूष एक पत्नी असतांना तिच्या संमतीने एका आईकडून तिची सोळा वर्षांच्या मुलीची बोली लावून खरेदी करतोय तिच्यावर शारीरीक, मानसिक अन्याय अत्याचार करतोय मग कुलटा वेशया आणि बदचलन नक्की कोण?तिची जन्मदाते आई ?की त्याची पहिली पत्नी? की तो पुरुष?स्री च शोषण करायला तिला वाईट,बदचलन ठरवायला पुरूषसतताक पद्धती जितकी जबाबदार आहे त्याहून कीतीतरी पटीने दुसरी स्री च कारणीभूत आहे तेव्हा ही हेच सिद्ध होते.आजही परीस्थिती फारशी बदललीय अस नक्कीच नाही .हो जग नककीच भले चंद्रावर जाऊदे परंतु रूढी परंपरांची पाळमुळ ईतकी घट्ट आहेत की सदविवेक बुद्धी जागृत झालेल्या व्यक्तीच्या कीती पिढ्या या लढ्यात संपुन जातील याची कल्पनाच केलेली बरी.लहान मुलांच्या बाबतीत तरी काय वेगळ बोलणार जीथ आईबाप अशिक्षित आहेत त्यांना आज जरी वाटतंय आपली मुल शिकावी .आपल्या सारखं कष्ट गुलामी,आर्थिक ओढातान त्यांच्या वाटयाला येऊ नये.परंतु कसं परीस्थितीने चांगल्या?मोठ्या शाळेत, किंवा शिकवणीत घालता येत नाही सरकारी शाळांची परीस्थिती त्याबद्दल तर बोलणच नको!वस्ती पातळी झोपडपटटी याठिकाणी तर भयाण अवस्था आहे मुलांवर पहिले संस्कार घरातून होतात मग ते अंधश्रद्धा, रूढी परंपरा व्यसन, हे घरात व आजुबाजुच्या वातावरणात निरीक्षण करतात कोवळ्या वयात मनावर बिंबविले विचार पुढे जन्म भर सोबत करतात काही जण शिक्षणामुळे बाहेरच्या जगातील अनुभवाने बदलतातही परंतु मध्ये पुलावरून बरच पाणी गेलेल असतं समज येईपर्यंत आयुष्य भरकटलेल असत आणि बरेचसा ऊमेदिचा काळ वाया गेलेला असतो आणि समाज आणि देश कितितरी सुज्ञ,नागरिकांना मुकलेला असतो. एक अख्खी पीढी घडवायला लहानपणीचे संस्कारच मोलाचे नाहित काय?तीच गत सुशिक्षित उच्चवर्णीय समाजातील मुलांची परीस्थिती निराळी संसकार निराळे आपण अमुक अमुक आहोत, इतरांपेक्षा उच्च आहोत त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे हे अगदी ठासुन ठासून मेंदू आणि मनात रूजविलेले त्यांच्या शाळा निराळ्या रहाण्यासाठी पोश घर.शिक्षित, सुज्ञ,पालक त्यांची दिशा ठरलेली अगदी जन्मभराच पलॅनिंग बरच आहे देश घडवालला ऊदयाच भविष्य उज्वल आहे परंतु विचारांचं काय?ही पोरही मनात तेच पेरून पुढे वाटचाल करीत आहेत जे ईथ पिढ्यान् पीढया रूजवल गेलय. अर्थात काही अपवाद दोन्हीकडून असतील आहेत पण कीती??शेवटी समाज आणि समाजातले स्री, पुरूष हे घटक महत्वाचे एकमेकांशिवाय अपूर्ण सारयांनीच समिजाआधी स्वताःमधयेच बदल करायलाच हवा की जेणेकरून या समाजाचे या देशाचे ऊदयाचे भविष्य उज्वल होईल.हेच सिनेमा दाखवून देतोय स्वताचे पेशन्स ढळू न देता जिद्दीने आपले काम करत रहावे कारण आपल्याला माहित आहे जे काही करतोय ते योग्य आहे आणि समाज कधी ना कधी ते स्वीकारणारच आपल काम सुरू ठेवल पाहिजे तोल न ढळू देता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract