STORYMIRROR

Prashant Shinde

Action

3  

Prashant Shinde

Action

चतुर कावळा

चतुर कावळा

1 min
8.8K

पूर्वी कस छान होत

आजोबा आज्जीच छत्र होत

नात्याचं गोत्र होत

मित्र मैत्रिणीच पत्र होत...


गोष्टींचं गान होत

खेळांच रान होत

आनंदच भान होत

सौख्याच वाण होत...


अस काहीतरी नाचत बागडत बालपण सरत होतं, पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकतच जीवन खुलत होत,फुलत होत... 

त्यातलीच कावळ्याची गोष्ट अजूनही स्मरणात आहे.सुरईतील पाणी पिण्यासाठी तहानेने व्याकुळ झालेला कावळा आपल्या बुद्धी चतुर्याचा वापर करून सुरईत खडे टाकून पाण्याची पातळी वाढवतो आणि आपली तहान भागवतो हे चित्र जसे च्या तसे आजही आठवते आणि आमचे बालपण इतर आठवणींचा उजाळा देते.आशा अनेक गोष्टींनी जशी करमणूक केली तसेच ज्ञानात भरही घातली आणि जीवन समृद्ध झाले.आमच्या दैनंदिन जीवनात सुद्धा लागणारी कल्पकता या गोष्टींच्यामुळेच वाढीस लागली म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर सोप्या पद्धतीने सुईत दोरा कसा ओवायचा यापासून ते हवाबंद पिशवी कशी करावी याच्या क्लुप्त्या या गोष्टीं मुळेच सुचत गेल्या हे काही खोटे नाही.


पंचतंत्रातल्या गोष्टी 

देतात ज्ञान अफाट

भरते आपोआप

ज्ञानाचे सुखद कपाट


आनंदाची गोष्ट

करते जीवन पुष्ट

एकेक विचार स्पष्ट साफ

होई लीलया आपोआप...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action