arun gode

Action Others

3  

arun gode

Action Others

चोरांची मोहीम

चोरांची मोहीम

5 mins
211


       एका परिवारात दोघे पति-पत्नी,सासु-सासरे आणी त्यांचे दोन मुल होती.घर प्रमुख एक केंद्रिय कर्मचारी होता. मुळ गांव सोडुन बरेच वर्ष झाले होते. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. तो सारखा बदल्यामुळे देशभरात फिरत होता. आता जवळ-जवळ चाळीसी ओलांडली होती. आई-वडिल फार वृध्द झाले होते.त्यांनी जीवण्याच्या शेवटच्या टप्यात प्रवेश केला होता.त्यांना पण आपल्या भागत आपला मुलगा आला पाहिजे असे मना पासुन फार वाटत असे . गृहिनीची पण ईच्छा होतो कि त्यांनी आता नागपुरला येवुन स्थाई झाले पाहिजे. तीने पाहिलेल्या आपल्या स्वतःच्या बंगलाची स्वप्नपूर्ती झाली पाहिजे असे वाटत होते.मुलांचे पण उच्च शिक्षणसाठी नागपुरला स्थाई होने अतिआवश्यक होते. असे सर्वांना वाटत होते. थांब टकल्या भांग पाडतो, काही न करता अनायशे मोठे काम झाले होते. खुदा मेहरबान तो गधा पहेलवान.यावेळस नशिबाने साथ दिला.व घर प्रमुखाचे पदोन्नोतीवर नागपुरला तैनाती झाली. सर्वांच्या मना सारखे झाले होते.


      नागपुरला आल्यानंतर त्याचे मुख्य लक्ष्य छोटासा बंगला बांधण्याचे होते. त्या साठी जे आवश्यक दस्तावेज आणी संबंधीत संस्थाचे अनुमतीचे कागद पत्र जमविले होते. घर बांधनी साठी लागनारी रक्कम मिळवण्यासाठी बैंकेचे कर्ज घेण्याचे ठरविले होते. लाखां शिवाय बात नाही अन वडा पाव शिवाय खात नाही. अशी गत घर मालकाची होती आता घराचे काम सुरु करुन काही महिने झाले होते. घरासाठी जवळची व बैंकेचे कर्ज असी पूर्ण रक्क्म संपत आली होती. आली अंगावर तर गेतली शिंगावर. नंतर ईकडुन-तिकडुन पैसा जमवुन घराचे काम पूर्ण केले होते. आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला पन्नासवी गाठावी लागली होती. मुल मोठी होवुन इंजिनिअरिंग करत होते. मुलगी इंजिनिअर होवुन पुन्याला एका कंपनी लागली होती.मुलगा पन  मुलीच्या मागेच इंजिनिअर होवुन एम.टेक. करन्यासाठी व्ही. आय. टी . वेल्लोरुला गेला होता. सेवानिवृत्तिच्या अंतिम दशकात परिवार प्रमुखाची वाटचाल अग्रेसर होत होती. सगळ काही व्यवस्थित चालले होते. पति=पत्नि दोघेही राजी- खुशिने आपला संसार थाटात करत होते.


      ज्या कॉलोनीत ते राहत होते. तिथे फार तुरक वस्ती होती.नविन क्षेत्र असल्यामुळे दाट वस्ती नव्हती.रोज इकडे-तिकडे काही चो-या-चपाट्या झाल्याचे ऐकु येत होते. दर आठ-दहा दिवसांनी एक-दोन चो-या झाल्याच्या बातम्या मोहल्यातील शेजार-पाजरी आणी गृहणी सांगत होती. बाजारात तुरी अन भट भटणीला मारी. ती फार चिंतीत होती. तीची चिंता बघुन मी तीला म्हणत होतो.अरे आपल्या कडे आता काय उरले आहे.सगळी जमा-पुंजी व सोन-नाण तर तुझा बंगला बांधण्यात व मुलांच्या शिक्षणात संपुन गेला आहे. आता त्या बिच्या-या चोरांन साठी इथे काय उरले आहे.आपली दशा आता, मोठा वाडा अन पोकळ वासा अशी आहे, अग चिंता करत जावु नको. आपल्या कडे चोर येणार नाही. अरे तुम्ही आवश्यकता नसतांना ऐवढा मोठा बंगाला बांधुन ठेवला.तुमच्या मुलाच्याने याची पैंटींग पन होणार नाही !. व डोंगरा ऐवढ्या कर्जात डुबुन आहे. हे मला जरी माहित आहे. पण चोराला कुठे माहित आहे ?. जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही. ती आपली भडास सारखी काढत असे.


     एक दिवस मी नेहमी प्रमाने गाढ झोपेत होतो.घरात आई-वडिलांच्या मरणामुळे व दोघेही मुल बाहेर असल्यामुळे घरात आम्ही दोघेच असतांना आमच्या कडे उशिरा रात्री खरचं चोर आले होते. त्यांनी जेव्हा आम्हा दोघांनाही गार झोपेत खिडकितुन पाहुन घेतले असावे.व नंतर हॉलच्या दरवाज्या कडुन घरात शिरण्याचा बेत त्यांनी बनवला होत. त्याकरिता दरवाजाला जोडली असलेली खिडकी प्रथम उघडली होती.नंतर आत लावलेले कुलुप पण तोडले होते. उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग, तरी पण दरवाजा उघडत नव्हता. तो उघडण्याच्या प्रयत्नात खिडकीचा काच फुटला.काचाच्या आवाजा मुळे माझ्या पत्निची झोप उघडली होती.तीच्या लक्षात आले कि घरात चोर घुसण्याचा प्रयत्न करत आहे. तीने मला हालवु- हालवु उठविले. मी फार गार झोपेत असल्यामुळे मला या सर्व प्रकरण्याची सुद नव्हती. ती मला म्हनाली, अरे समोर चोर आले आहे. समोरचा दरवाजा तोडत आहे.मी लगेच उठ्लो आणी हॉल कडे जाण्यासाठी निघालो.मलापण त्यांची चाहुल लागली होती. मी जो-यानी आवाज दिला. कोण आहे तिथे. असे दोन- चार वेळा म्हटले आणी दार उघडणार होतो. ती ओरडली . दार उघडु नका. मग मी तीला जो-याने म्हणालो, अरे, जरा मेरी बंदुक तो लाना. आमच्या घरी कोणतीच बंदुक नव्हती. ती म्हनाली कोणची बंदुक . मी तीला म्हटले, अरे ती पाकिस्थान किंवा चायना युध्दा मधील, कोणची पन आन?. यांना सालांना गोळ्या घालतो. हे सगळ ते ऐकत होते. व ते लगेच धाव-पळीने, पळाले.एक चोर तर आपली चप्पल सोडुन पळाला. नंतर मी जवळच्या पोलिसस्टेशनला फोन केला. काही वेळेनंतर पुलिस पण आले.त्यांनी झालेला प्रकार बघितला. व मग पुलिस मुखियां म्हणाला साहेब तुम्हचे दरवाज्याचे फ्क्त नुकसान झाले आहे. चोरी झाली नाही. तुम्हची इच्छा असेल तर सकाळी येवुन एफ.आय.आर ची नोंद करा.मी श्र्वास घेत –घेत म्हटले , देव तारी त्याला कोण मारी. चला साहेब सकाळी बघु. त्यांचा निरोप घेतला.


    दुस-या दिवसी हा सर्व घडलेला प्रकार बघण्यासाठी परिचितांची झुंबड मचली होती. “आपलं झाकुन व दुस-याचे वाकुन” सगळ्यानी याची चौकशी केली.माझी श्रीमती सर्वांना चहा-पाणी देवुन- देवुन थकुन गेली होती. घरचे झाले थोडे अन व्यहांनी पाठवले घोडे, प्रत्येकांनी आपल्या परिने सुरक्षेतेसाठी उपाय सांगितले होते. एक जवळचा मित्र म्हणाला बर झाल, तु घरी होता. नाहीतर, जर नेहमी सारखा बाहेर गांवला गेले असता. तर फार नुकसान झाले असते. मी त्याला म्हणाले अरे, काल जर मी दरवाजा उघडला असता. तर जास्त नुकसान झाले असते. कारण ते दोघे=तिघे होते. ते मला काहीही करु शकले असते. अरे मग तु कसा वाचला. मी त्याला रात्री घडलेल्या बंदुकचा किस्सा सांगितला. तो खुप पोट धरुन हास्त होता.आता चोरांना माहित झाले आहे कि तुझ्या कडे बंदुक आहे. त्यामुळे ते आता तु घरी असतांना येनार नाही.पन तुझ्या अनुपस्थितित आले म्हणजे फार नुकसान करतील. मी त्यावर पण त्याला एक विलक्षण तोडगा सांगितला. जेव्हा मला कुठे गांवाला घर पूर्ण बंद करुन जायचे राहील. तेव्हा मी घरातील सर्व अलमा-या वैगरे उघड्या ठेवणार आहो. जेने करुन त्याला त्या उघडान्यासाठी त्रास होवु नये. या टेबलावर एक दहा हाजारांची नोटांची गड्डी व एक चिठ्ठी लिहुन ठेवणार आहे. त्यात,असा मजकुर राहिल.


  प्रिय चोर मित्रहो, तुमचे या घरात मनःपूर्वक स्वागत आहे.घरातील सर्व अलमा-या वैगरे आपल्या साठी उघड्या ठेवल्या आहे. तुम्हच्या सेवेसाठी. तुम्ही आरामशिर सर्व काही बगुन घ्यावे. तुम्हाला घरात शिरण्यासाठी जे परिश्रम लागले आहे आणी आत मध्ये होईल, यासाठी मी तुमचा दिलगीर आहो. तुम्हच्या मेहनतीचे पारिश्रामिक म्हणुन मला झेपना-या आर्थीक क्षमतेनुसार हे अधिकत्म दहा हजार रुपये तुमच्या साठी ठेवले आहे. हे आदाराने माझे तुम्हच्या वरचे प्रेम समजुन स्वीकार करावे. पाकघरात ,जर तुम्हाला भूक लागली ,तर खाण्याच्या व्स्तु ज्या डब्यात ठेवले आहे. त्यावर चिठ्ठ्या पण लावल्या आहे.कृपया आपला असंतुष्टा आत्मा व खाली पोटाची शांतता करुन नंतरच पलायन करावे. ही आपणांस कळकळीची विनंती. विनंतीला मान द्यावा.परंतु जातांना शक्य झाल्यास, दरवाजे-खिडक्या लावुन जावे.कुलुप लागत नसेल. तर नविन कुलप आनुन लावावे. आपल्या इतर चोर बधुंना सुचना करुन द्यावी. आम्ही या घरात हात साफ करुन चुकलो आलो आहो.इथे आता तुमच्या साठी काही उरले नाही. कृपया याची नोंद घ्यावी. असा नोटिस आपल्या चोर संघटनेच्या मुख्य फलकावर पूर्ण पत्यासह सर्वांना दिसेल अशा सुचना फलकावर लावावी अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. व आता अन्य ठिकाणी चोरीचा प्रयत्न करावा. हा माझा प्रस्ताव त्याला खूपच पसंद आला होता.व हसत- हसत तो म्हनाला.मी पण याचे अनुकरण करणार !


Rate this content
Log in

Similar marathi story from Action