चहाची आठवण।।।
चहाची आठवण।।।


मी एका नवीन कंपनी मध्ये नोकरीसाठी लागलो. बेसिक लेवल प्रशिक्षण हे पुण्यात झाले. तसा तो एप्रिल महिना होता नुकताच मार्च एन्ड झाला होता नवीन वर्षात प्रवेश ही झाला होता. नवीन वरश्याची सुरुवात करताना प्रत्येक वर्षी एक वार्षिक कार्यकारिणी (मीटिंग)ठेवली जाते. दरवर्षी ती वेगवेगळ्या ठिकाणी असते तर नेमका जॉईन झालेल्या वर्षी ती मिटिंग होती हैद्राबादला. हैद्राबाद या आधी मी कॉलेज मधून इंडस्ट्री व्हिजिट साठी गेलो होतो तेवढाच.
नवीन कंपनीत चौथा दिवस तसे जादा कोणी ओळखीचे न्हवते. पण माज्या सोबत जगदीश नावाचा मित्र होता, त्याच दिवशी आम्ही दोघांनी कंपनी जॉईन केली होती त्यामुळे आम्ही दोघे त्यातल्यात्यात जवळचे. दोघांनी ठरविले की सोबत पुणे ते हैदराबाद प्रवास करू कारण बाकी टीम ने नियोजनानुसार विमान तिकीट काढून ठेवली होती. आम्हाला जॉईन करून कुठे तीन चार दिवस झाले होते तर आम्ही दोघे ट्रॅव्हल्स चे तिकीट बुक करून जायचे ठरविले.
आदल्या दिवशी संध्याकाळी पुणे वरून निघालो आणि पहाटे पहाटे हैदराबाद मध्ये लकडीका पूल जवळ उतरलो. आमची मीटिंग होती ती लिओनिया रिसोर्ट आणि हे हैदराबाद पासून बाहेर ५०किमी होते याची आम्हा दोघाना काहीच कल्पना नव्हती. जसे ट्रॅव्हल्स मधून उतरलो तेव्हा रिक्षा वाल्या काकाला विचारले तर त्यांनी आम्हाला ५००रु लागतील असे सांगितले. एकतर ते हैदराबाद तिथे धड हिंदी येते ना इंग्लिश आणि आमची भाषा त्यांना समजत न्हवती त्याची भाषा आम्हला समजत नव्हती. मग लक्ष्यात आले माझी एक मैत्रीण जीला तेलगू भाषा येते तिला सगळे फोनवर समजावून सांगितले आणि तो फोन रिक्षा ड्राइव्हर कडे दिला.
तिने त्याला सगळे समजावून सांगितले आणि डील २५०रु फिक्स केली. जसे आम्ही पुढे जायला लागलो तसे त्याला ही काही समजेनासे झाले आम्हीही चक्
रावले खूप वेळ झाला अजून हॉटेल काही यायला तयार नाही. मग मी परत फोन लावून मैत्रिणी ला सांगायचो ती सगळे तेलगू मध्ये रिक्षावाल्या काकाला सांगणार असे करत करत खूप वेळानी आम्ही त्या हॉटेल वर पोहचलो.
जसे पोहचलो तर ते एक मोठे रिसॉर्ट होते आणि मेन गेट पासून आत मध्ये जायला इलेक्ट्रॉनिक बस होत्या. त्यामध्ये बसून अम्ही दोघे निघून गेलो. हॉटेल मध्ये पोहचता पोहचता दुपार झाली होती त्या गरमी मूळे खूप परेशान झालो होतो आणि सकाळ पासून काहीच खाल्ले न्हवते. हॉटेल मध्ये पहिला रूम ची चावी घेतली, कंपनीने एका रूम मध्ये दोघे आसे राहण्याचे नियोजन केले होते कारण मीटिंग ही तीन दिवसांची होती. दोघे एकाच रूम मध्ये थांबलो गेल्या नंतर फ्रेश होऊन पहिला चहा पिण्याची दोघाना हुक्की अली आणि मी फोन करून ऑर्डर केला. १५ मी नंतर रूम सर्विस बॉय मस्त ट्रे मधून दोन कप दोन बशी आणि चहाचा थर्मास घेऊन समोर चहा ओतून कप टेबलावर ठेवला. मी आपला बॅग मधून कपडे काढून वॉर्डरुफ मध्ये ठेवत होतो. रूम बॉय चहा ओतून तिथेच थांबला होता माझी वाट बघत. माझे लक्ष गेले आणि त्याला विचारले तर तो बोला सर चहाचे बिल पे करावे लागेल. तुमच्या कंपनीने संध्याकाळ पासून बाकी सगळे बुक केला आहे. मी म्हंटलं काही हरकत नाही त्याने बिल माझ्या हातात दिले बिल बघून मी हादरलोच दोन चहाचे बिल होते फक्त ५६० रुपये अधिक टॅक्स मिळून ६२० रुपये. नवीन नवीन नोकरीला लागल्या मुळे तेव्हा ही रक्कम आमच्यासाठी थोडी जदाचा होती. जगदीश आणि मी एकमेकांन कडे बघून हसायला लागलो आणि गप्पागुमान चहाचे पैसे दिले. जसा तो निघून गेला आम्ही दोघे पोट धरून हसायला लागलो खूप हसलो. चहाचा मस्त आस्वाद घेतला फ्रेश झालो. आणि हा चहा आणि ते रिसॉर्ट कधीच विसरू शकत नाही.
असा हा आठवणीतील चहा चा किस्सा.