Meghana suryawanshi

Abstract

4.0  

Meghana suryawanshi

Abstract

चौकटराजा

चौकटराजा

2 mins
248


        छे छे नाही! तुमच्या मनात जो चौकटराजा आला तो नाही. तो चौकटराजा जो भांड्यात लावलेल्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या एका अंब्याकडे पाहून त्याला खुप आंनद होई. हा पण मी नाही म्हणले ते फक्त एका चित्रपटापुरते. आठवलं का काही?

     ती चौकट मग दाराची असो वा आयुष्यातील बंधनांची. चारच बाजू पण सगळे मानसिक विश्व सामावून घ्यायची ताकद. फक्त चेंगराचेंगरी! शालेय विश्वात आवडत नसणारा भुमिती कधी आयुष्याची सोबत झाला कळालेच नाही. काही गोष्टींची आयुष्यासोबत तुलना न केलेलीच बरी आहे. जेव्हा भुमिती फक्त बिंदू आणि रेषा एवढीच माहिती होती तेव्हा खुप आवडत होता पण कधी खोलात जाऊ वाटले नाही. मग असे काय घडले? जेव्हा तो मोठे मोठे आकार घेत गेला आणि आवडत नसताना ही आपले आयुष्य त्याला देऊन बसलो. स्वतःच स्वतःला एका चौकटीत बंद करून घेतले. आणि त्या चोकटीची एकमालकी असणारे आपण झालो चौकटराजा!

      असा राजा ज्याला बाहेरच्या विश्वात रमायचे आहे, गगनभेदी होण्याची स्वप्ने तो पाहतो. पण त्याला हेच माहीत नाही चौकटीला दरवाजाच नाही. बिना दरवाजा असलेल्या चौकटीचे कुलूप तो येड्यासारखा लावायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला असं ही वाटतं की सगळ्यांनी पण चौकटीतच रहावे. तो हे पण पाहतोय बर का पिंजर्‍यात नसलेले पक्षी कसे मस्त गगनविहार करीत आहेत. तो त्यांना खुनशी वृत्ती ने पाहत एकच म्हणतो, मला पण पंख असते तर! आधी त्यानेच स्वतःला चौकटीत उभा करून करून घेतलेले असते मग काही काळानंतर बाकीचे लोक येतात आणि दरवाजा बसवून जातात. सुरूवातीला तो खुप घाबरतो. घाबरून तो एकसारखा ओरडतो. दरवाजा कोणच उघडत नाही. तेच त्याचे विश्व बनून जाते. काहीजण येतात दरवाजा काढून जातात पण राजा इतका सुन्न झालेला असतो की बस्स त्याच्यात त्राणच राहत नाही बाहेर पडायला. आणि एकाकी पडलेला राजा दुसर्‍याला ही आत ओढवून घेतो सोबतीसाठी. 

      कधी कळेल त्या राजाला? चौकटीला आता दरवाजाच राहिला नाही. तो अजूनही राजाच आहे पण चौकटीचा नाही खुल्या विश्वाचा! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract