Meghana Suryawanshi

Others Children

4.0  

Meghana Suryawanshi

Others Children

जतन

जतन

4 mins
222


      रिया इयत्ता सहावीत शिकत होती. शाळेची उन्हाळी वर्गाची परीक्षा संपली. रिया खुप खुश होती. नंतरचे वर्ग दोन महिन्यांनी सुरू होणार होते. तिने बाबांकडे फिरायला जायचा हट्ट धरला. बाबांना ही कंपनीला दोन दिवस सुट्टी होती. आई आणि बाबांनी दोघांनीही फिरायला जायची हमी भरली.


   रिया - बाबा आज आपण मस्तपैकी खुप मस्ती करू. इथून दुरवर एक खूप मोठी बाग आहे तिकडे जाऊ. तिथे आसपास एकदम सुंदर निसर्ग आहे पाहण्यासाठी. आज पुर्ण दिवस फक्त फिरायचे. 

  रियाचे बाबा - हा खुप दिवसांनी फिरायला मिळत आहे आज. पण ; आजची सहल वेगळ्या पद्धतीची असेल. आज सहल निसर्गाची नाही तर त्याच्या पाठीमागे असणाऱ्या इतिहासाची असेल! 

 रिया - म्हणजे? आई मला तसा खुपच कंटाळा येईल. मला इतिहास विषय बिलकुल आवडत नाही. त्यातील ते मोठे शब्द, प्रत्येकाची नावे आणि सनावळ्या बिलकुल लक्षात रहात नाही. 

 रियाची आई - बाळा मला तुझ्या बाबांची संकल्पना बरोबर वाटते आणि आवडली देखील. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान फक्त पुस्तकातील पाने वाचून मिळवण्यापेक्षा ती गोष्ट प्रत्यक्षात जगून आणि त्या संबंधीत गोष्टींचे ज्ञान घेऊन मिळते. आणि बघ एक दिवस तुला ही इतिहास खुपच आवडेल.

रियाचे बाबा - हा रिया. आज आपण एका ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयास भेट देणार आहोत. जिथे तुला पुरातन काळातील वस्तूंची ओळख होईल. त्यावेळच्या परंपरा आणि आताचा काळ यांच्यातील फरक समजून घेता येईल. चला आवरा पटकन. 

     रिया आणि तिचे कुटुंबीय ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयास पोहोचतात. ऐतिहासिक भव्यदिव्य प्रवेशद्वार, आत प्रवेश केल्यावर प्रत्येक भिंतीत जिवंत इतिहास दिसेल इतके छान कोरीवकाम, खुप सारी आणि वेगवेगळ्या इतिहासकालीन गोष्टींचा संग्रह असलेली वेगवेगळी दालने, असे भव्य संग्रहालय होतं ते! रिया ते पाहून भारावून गेली आणि तिच्या मनात एक कुतुहल निर्माण झाले. प्रत्येक गोष्ट समजून घेणे तिला आवडू लागले. ते एका दालनात गेले जिथे एका कपाटात जुन्या नाण्यांचा संग्रह होता.

 

रिया - बाबा ही नाणी खूपच वेगळी आहेत. काही नाण्यांवरील अक्षरे तर स्पष्ट दिसत ही नाहीत.

रियाचे बाबा - हा रिया, ही नाणी तांब्याची आहेत. माणसाने सर्वप्रथम तांबे धातू वापरण्यास सुरूवात केली होती. या वरील अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत कारण खुप वर्ष उलटून गेली आहेत. वातावरणातील होणाऱ्या काही रासायनिक प्रक्रियांमुळे असे बदल होतात हं. ते मी तुला समजावून सांगेन नंतर.

रिया - हा मग ही नाणी अशी बंद कपाटात ठेवण्याची गरज काय? आणि ही नाणी आपण आता का वापरत नाही?

रियाचे बाबा - ही नाणी अशी संग्रह करून ठेवली आहेत कारण, ही बहुमूल्य आहेत. रिया, एखाद्या गोष्टीचा इतिहास काळाच्या ओघात मिटून जातो. त्याकडे लक्ष दिले जात नाही. आणि कधीतरी तो इतिहास जाणून घेण्याची खूप गरज भासते. मग त्या काळात पोहचण्यासाठी इतिहासकारांना असे वस्तू भेटले तरी खूप काही उलगडा होतो.

रियाचे बाबा - ही नाणी सर्वप्रथम लॅब मध्ये पाहिली जातात. अगदी बारकाईने निरीक्षण करून ती नाणी कोणत्या काळातील असावीत याचा अंदाज लावला जातो. त्या संदर्भाने इतर गोष्टींचा ही माग काढला जातो आणि मोठ मोठ्या ग्रंथातून त्या इतिहासाची ओळख होते.

रिया - पण मग आपण का वापरत नाही आता ही नाणी? बाजारात एका पुस्तकाच्या खूप सार्‍या प्रती असतात, तशा या नाण्यांच्या नाहीत काय?

रियाची आई - बाळा, ही ऐतिहासिक नाणी आहेत. खूप काळ उलटून गेला आहे. त्या काळात खूप सारे राजे, शासक बदललेले असणार. प्रत्येकाची स्वतःची वेगळी नाणी होती. नवीन शासक नवीन नाणी! मग जुनी नाणी तयार करणे बंद केले जायचे. त्यामुळे ही नाणी आत्ताच्या काळात जास्त नाहीत.

रिया - मग आई एवढी जुनी नाणी कोणास मिळाली असतील? 

रियाचे बाबा - बाळ, काही लोक म्हणजे मोठे सरकारी चाकर किंवा राजघराण्यातील वंशज ही पिढीजात नाणी जतन करून ठेवतात आणि ते सामान्य लोकांस ही पाहता यावे म्हणून संग्रहालयास भेट देतात. कधीकधी या नाण्यांचा लिलावही होतो. मोठी रक्कम मिळते. 

रिया - अरे वा! म्हणजे जी नाणी चालत नाही त्यास एवढी मोठी रक्कम! मी देखील मोठी झाल्यावर अशी नाणी साठवणार आणि लिलावात विकणार. 

रियाचे बाबा - रिया,प्रश्न पैशाचा नाही. तसं मला ही लिलाव करणे पटत नाही. एक आवड म्हणून आपण नक्कीच नाणी साठवू शकतो. पण ती लिलावात विकणे म्हणजे इतिहास दुर करण्यासारखे आहे. 

रियाचे बाबा - या नाण्यांस मोठी किंमत फक्त ती किती जुनी आहेत यावरून नाही मिळत. तर ती कोणत्या काळातील, वंशातील, त्यामागील तगडा इतिहास यावरून प्राप्त होते. 

    मग आपण नाण्यांच्या रूपात इतिहास विकल्यासारखे नाही का होत? 

    बाळा तू नक्की नाण्यांची साठवण कर. हवे तर सामान्य जनतेस पहाता यावी म्हणून संग्रहालयास भेट कर. पण लिलाव करू नको हं. 


रिया - हा बाबा, पटले मला तुमचे विचार. अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. मी आता नाण्यांचीच नाही तर कोणत्याही इतिहासकालीन वस्तूंची हेळसांड करणार नाही आणि इतरांना ही करून देणार नाही. आज खऱ्या अर्थाने मी इतिहास अनुभवला आहे. मी इतिहास एक विषय म्हणून शिकत होते. पण आज समजले इतिहास आहे म्हणून आपण आहोत. इतिहास फक्त विषय नाही तर सगळ्यांना एकत्र जोडणारा दुवा आहे. 


रिया - बाबा, आता इथून पुढे मला ऐतिहासिक गोष्टींची सहल करण्यास खूप आवडेल. 

रियाची आई - हा रिया, नक्कीच दरवर्षी आपण असे फिरायला जाऊ. 

   बरं चला आता पुढील दालन पाहू. का आज पूर्ण दिवस याच दालनात घालवायचा आहे. आणि ते सर्वजण पुढील दालनात जातात. जिथे तलवारी, भाला अशा शस्त्रांचा संग्रह आहे. 


Rate this content
Log in