Neha Khedkar

Abstract Others

1.8  

Neha Khedkar

Abstract Others

बहुरंगी..!

बहुरंगी..!

2 mins
371


रंग माझा वेगळा म्हणत प्रत्येक रंगाला एक विशिष्ट प्रकारचे महत्त्व दिले आहे. माणूस आणि रंग यात खूप जवळचे नाते आहे. निसर्गाच्या कुशीत जसे अनेक रंग रंगीबेरंगी बनतात. तसेच त्याला एक वेगळा रुबाबपण आहे. एका रंगात दुसरा रंग एकत्र होऊन तिसऱ्या नवीन रंगाची निर्मिती केली जाते... 

रंगाचे दोन प्रकार - फिका आणि गडद...


गडद रंग डोळ्यांना आल्हाददायक असतात. ते कुठेही पटकन उठून दिसतात. याउलट फिके मंद रंग मनाला शांत करतात, खुणावतात, मोहवतात! त्यांची सुंदरता मनाला भुरळ घालते. रंग आणि भावना यांचं नातं घनिष्ठ..!


आपण वहीत लिहिताना सहसा दोन रंगाचा वापर करतो, पांढरा आणि काळा... पांढर्‍यावर काळं होतं आणि मग ते मनभर पसरतं. 

भडक रंग नजरेत बाष्पता निर्माण करतात. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते यामागे एक आख्यायिका आहे.


राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हादाला विष्णु भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला असे वर्णन आढळून येते..


शुभ रंग आणि अशुभ रंग असंही रंगाचे वर्गीकरण केले आहे. शुभ रंग कार्याला अर्थपूर्ण लावतात तर अशुभ रंग काळा म्हणून ओळखला जातो. तसेच माणसाच्या स्वभावांनाही रंग असतात. कधी ते भडक असतात, कधी मवाळ, कधी मृदु मुलायम तर कधी दुष्ट खुनशी. त्यांच्या रंगानुसार त्यांचं वर्तन असतं. 


बदलत्या ऋतुप्रमाणे निसर्गातल्या अनेक रंगछटा माणसाला निसर्गाच्या अधिक जवळ नेतात. त्याला इतरांवर प्रेम करायला लावतात. निसर्गात वाढणारी अनेक फुलझाडं, वृक्ष-वेली, त्यांची फुटणारी पालवी, त्यांची सुकलेली पानं. असे अनेक बदलते सगळ्यांचे रंग वेगळे, छटा आगळ्या! ही किमया मनाला थक्क करते. आकाशातला उडता चमत्कार म्हणजे पक्षी. त्यांच्या पिसांचे रंग पाहताना परमेश्वराने त्यांना दिलेल्या जादुई किमयेची कमाल जाणवते. पक्षी पाहताना आकाशातील निळाई खुणावते. काळे-पांढरे ढग त्या निळ्या चादरीवर नक्षीदार होऊन सरकतात. सूर्यास्त आणि सूर्योदय होताना क्षितिजावरची ती रंगांची पखरण विलोभनीय असते. संध्याकाळी जांभळ्या काळोखात उडणारी बगळ्यांची माळ लक्ष वेधून घेते.


असे विज्ञानाने कितीही दाखले दिले तरी इंद्रधनुची सप्तरंगी रंगांची कमान डोळ्यांसाठी नेहमी मेजवानीच असते. मुळात आपल्यापाशी डोळे असायला हवे आणि डोळ्यांपाशी नजर हवी. बाकी सगळं निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. त्यालाच आपल्याला सांभाळ करणे आपले कर्तव्य आहे...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract