Neha Khedkar

Others

4  

Neha Khedkar

Others

आठवणींचा पसारा...!

आठवणींचा पसारा...!

5 mins
260


पसारा मूळात असतो कशाचा ? जीर्ण कागदाचा , पुसट आठवणीचा की अशा गोष्टींचा ज्या उपयोगी नाही आणि टाकूनही द्यायची इच्छा होत नाही अशा गोष्टींचा...!

अशीच काहीशी दशा मुंबईत राहणाऱ्या नंदिताची होती . मनाने हळव्या असलेल्या नंदिताने तिच्या आठवणींचा पसारा छोट्याशा घरात राहून देखील आजही जपून ठेवला होता. कालांतराने पुसट झालेल्या गोष्टींची तिला आठवण आली की त्या पसऱ्यात स्वतःला रमून घ्यायची . पण तिच्या त्या पसाऱ्यावर सतत नवरा आणि मोठ्या झालेल्या तिच्या लेकीची नजर असायची . काही ना काही कारण काढून दोघेजण तिला तो पसारा तू कधी टाकून देणार म्हणून चिडवायचे . आणि नंदिता सुद्धा तितक्याच प्रेमाने त्यांनी उत्तर देऊन वेळ साधून घ्यायची .

" आपल्या ह्या छोट्याशा घरात किती जुन्या वस्तूंचा पसारा आहे ना आपल्या घरात, आई ..? घरात सगळीकडे , माळ्यावर अर्ध्याच्यावर तुझाच पसारा दिसतो आहे..."

स्वच्छतेचा किडा असलेल्या ओजस्वीने नंदिताने काढलेला पसारा बघून म्हणले. बाप लेक दाराशी येऊन नेहमीचे त्यांचे टिंगल करण्याचे काम करीत होते .आज असा टोमणा देण्यात आज लेकीने बापाची जागा घेतली होती..

" सज्जावर, मागच्या खोलीत , आणि आता गॅलरीत बनवलेल्या नवीन कपाटात सुद्धा बॅग भरुन समान नेऊन ठेवल आहे.. काय ठेवलंय त्या बॅगमध्ये , कपाटात आणि आणखी कुठे कुठे...? किती जुन्या गोष्टी अजूनही सांभाळून ठेवते गं..?"

ओजस्वीची बडबड सुरूच होती. मुंबईत इंजिनीरिंग करून ती आता बंगलोरला पोस्ट ग्रॅज्युएशन ती करायला गेली होती. नवरात्रीची सुट्टी म्हणून दहा दिवस घरी आली होती. त्यात बरेच वर्षपासून रंगकाम झालं नव्हतं म्हणून नंदिताने घरी रंगोटीचे काम काढले होते. तरी लेकीच्या धास्तीने जुने ड्रेस, प्लास्टिकचे डब्बे, जुनी सांभाळून ठेवलेली वर्तमानपत्र अशी कितीतरी गोष्टीची विल्हेवाट तिने आधीच लावली होती.

मात्र लहानपणापासून जपलेली ती पुस्तक तिच्याकडून टाकून देणं होईना..! घरात पहिलीच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्या करणाने तिच्या वडिलांनी तिची वाचनाची आवड बघता विविध विषयावर असलेली अनेक पुस्तकं तिला आणून दिली होती .

पुस्तकं ' जुनी ' झाली तरी त्यातून मिळालेलं अघाड ज्ञान, बाबाची माया कुठे जुनी होते बरं..! आणि रंगाच्या कामाने बाहेर निघालेली पुस्तकं म्हणजे " पसारा " का..? त्यातली काही जीर्ण झाली होती पण फेकवतही नव्हती आणि ठेऊन द्यावीशी वाटत नव्हती. अशा तिच्या गोष्टी नवरा आणि मुलीसाठी ' जुन्या पसऱ्या ' तील गोष्टी होत्या....

नेमक काय काय होतं त्या पसाऱ्यात ? ह्याच्या शोधात नंदिता रमून गेली...


कॉलेज मध्ये असतांना घेतलेली तिच्या आवडत्या लेखकांचे पुस्तकं, जिवलग मैत्रिणीने दिलेले शुभेच्छापत्र, लपून लपून लिहलेल्या चारोळ्यांची वही, तिने बनवलेलं पहिलं वहिलं चित्र, तिच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या चारोळ्या आलेल्या वर्तमानपत्राचे कटिंग, बाबांनी दिलेला पहिला शाईचा पेन, वाढदिवसाला मिळालेलं पहिलं टायटनचे घड्याळ, शाळा कॉलेजचे स्पर्धा जिंकल्याचे फोटो, आई बाबा, भावंड, इतर नातेवाईक जिवलग मैत्रिणी...तिचं सारं जीवनच होत त्या बॅग मध्ये ठेवलेलं...ते कसं काय फेकून द्यायचं..?

जीवनातील प्रत्येक टप्पावर आठवणीची पुंजी म्हणून तिने तिच्यासाठी साचवलेल सुंदर जीवन... कॉलेजच्या आणि शाळेच्या प्रत्येक सहलीची आठवण म्हणून ठेवलेले ते फोटो... त्या फोटोत चेहरऱ्यावर असलेला निरागस तो आनंद... कितीतरी वेगवेगळ्या स्पर्धेत मिळालेली प्रशस्तीपत्रे...१०वी १२वी पासून दिलेल्या सगळ्या परीक्षेचे ओळखपत्र...नवा संसार थाटतांना माधवीच्या जपलेल्या माहेरहून आणलेल्या ह्या सगळ्या गोष्टी... संसार वाढत गेला तसा त्यात कडू गोड आठवणीचा भरही होत गेला . वेळ सरता सरता त्यागोष्टी घरात आपली जागा रोवून होत्या. तर हा सगळा नंदिताचा "पसारा " मनिभावें जपला होता तिने...

"दिल्या घरी तू सुखी रहा " अशी पाठराखण करणाऱ्या आईने लग्नानंतर माधवीच्या आठवणीचा साठा असलेल्या तिच्या सगळ्या वस्तू तिला सुपूर्त केल्या होत्या. कारण, तिच्या आईला सुद्धा हाच छंद होता ... तिचा खरा आनंद तिने साठवलेल्या पसाऱ्यातच..! तरीही सासरी जातांना धाकट्या भावाने त्याच्या साठवलेल्या पैशातून घेतलेला छान पेन आणि डायरी...आजही खूप महत्वाची वाटते. ते आठवून डोळे अजूनही भरुन येतात. आज चांगल्या हुद्यावर कामाला असलेल्या भावाने कितीतरी छान छान भेट वस्तू दिले असले तरी, ती पहिली भेट लाखमोलाची वाटते...नंदिता आठवणीत रमून गेली.

त्या "पसाऱ्यात " अजून बरंच काही होते... प्रिया ,श्रद्धा, हर्षू, पल्लू ...ह्या मैत्रिणीसोबत दंगा करत काढलेले अनेक फोटो... आज त्या फारशा संपर्कात नाही ,पण तिच्या मनाच्या कप्प्यात आजही आहेत...फेसबुकने त्यांना भेटवल सुद्धा... पण ते तात्पुरतच..मध्यांतरी एक दोघी भेटायला आल्या पण होत्या...पण आपल्या संसारातून कुठं वेळ आपल्याला... अनामिश नेत्रांनी ती फक्त त्या फोटोंना न्हाहाळत होती...मात्र सगळ्या भावना डोळ्यातुन प्रसरत होत्या...


काहीशा आठवणी मन जाग् करणारं, हसवणार , रडवणार... ह्या मला कलाटणी देण्याऱ्या सगळ्या गोष्टी खरचं पसारा आहे का...? 


जीवनात असे अनेक क्षण येतात ज्यांना थांबून ठेवणं आपल्या हातात नसतं. ते नकळत आपल्या जगण्याच कारण बनून जातात अगदी कसलाही आवाज न करता. त्यात कुठलीच अपेक्षा नसते. ते क्षण फक्त तुमचे असतात इतकच..! अशा न बोलता अर्ध्यावर हात सुटलेल्या क्षणांचा पसारा सगळ्यांच्याच जीवनात असते ना..!

गॅलरीतला पसारा नंदिता खाली वर करत होती. खरचं काय उरलं ह्या जुन्या वस्तूत...ओजस्वीच बरोबर म्हणते आहे..काढून टाकावं का हे सगळं आता ..? जीवनाच्या वाटेवर आपण खूप पुढे निघून आलो आहोत. सगळ्यांचे जीवन भरदाव पळत आहे. जीवनाचा साथीदार जवळचा मित्रच आहे. समजून घेणारी जिवाभावाची मैत्रीण असलेली लेक आहे . जीवनाची गाडी अगदी सुरळीत चालली आहे..

हे असं सगळं असलं तरी नंदिताच मन अजूनही त्या जुन्या वस्तूंच्या पसाऱ्यातच रमत..! वस्तू कितीही जुनाट झाल्या तरी त्यांचा सुवास अजूनही हवाच वाटतो...

नवऱ्याला चोरून लिहलेली प्रेमपत्र, एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू ... नव्या संसारात आलेले कठीण प्रसंग...त्यात दोघांनी एकमेकांना दिलेली साथ...अशातच ओजस्वीचेे जीवनात आगमन... तिचे खुद्कन हसवणारे क्षण... तिचे टिपलेलं प्रत्येक क्षण...अजून किती तरी वस्तू...!

आज ह्या वस्तू केवळ आठवणी म्हणून होत्या. मग त्याला फेकून द्यायचं का..? नंदिताला हे सगळे बघता कासाविस होऊ लागले. नुसत्या विचारानेच तिला गहिवरून आले. आपल्या जवळच काहीतरी निसटून जातंय हे तिला जाणवलं...तिच्या डोळ्यातून गंगा जमूना वाहू बघत होत्या... हो , आज हे सगळं टाकून द्यायचं...ह्या वस्तू आज नाही उद्या मोडीतच जाणार.. पण त्या वस्तूंपासून मिळालेला आनंद कोणीही माझ्या मनात कायमच असेल , हे खरे...! हे तिला तिच्या अंतर मनानेच हळूच सांगितले ,आणि तिला ते पटलेही..!

हे सगळं करतांना नंदिता त्या पसाऱ्यात अजूनच गुरफुरली गेली. एक एक करून सगळ्या वस्तू बाजूला सारत गेली. पण त्यात तेवढीच रमून जात होती... अशी नंदिताची अवस्था बघता ओजस्वीने येऊन पट्कन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला सावरत हळूच म्हणाली " तुला हवं ते कर . आमचं बोलणं असं मनाला लाऊन नको गं घेऊस . तुझा आठवणींचा पसारा हवा तितके दिवस तू जपून ठेव .."  असे शब्द कानी पडताच नंदिताच्या गालावरची खळी एकदम उमलली . कारण, तिचा हा पसारा कोणीच तिच्यापासून हिरावून घेऊ अशक्य होते ,हेच खरे..!


Rate this content
Log in