Neha Khedkar

Fantasy

3  

Neha Khedkar

Fantasy

आठवण लग्नाच्या शालूची..!

आठवण लग्नाच्या शालूची..!

2 mins
269


"इथे ऑनलाइन साडी मिळेल..!"

अशी जाहिरात तिने फेसबुकवर वाचली आणि

मनात "खुशीके लड्डू " फुटले..!

प्रसंग होताच तिच्या लग्नाच्या वाढदिवसाचा.. परंतु

दुकानात जाऊन खरेदी करताना

जी मजा येते ती ऑनलाइन कुठे..!

म्हणून तिने फोन बंद केला..

नकळत तिची पावले तिच्या कपाटाकडे वळली..

कापडाच्या दुसऱ्या बाजूने ठेवलेल्या

तिच्या सगळ्या साड्यांवर

तिची नजर भिरभिरली...

ही त्याने दिलेली पहिली साडी,

ही पहिल्या मंगळागौरची,

ही दिवाळीची..

ही सासूबाईने दिलेली..

ही आईची...

अश्या विशेषण असलेल्या

प्रत्येक साडीच्या आठवणी ताज्या झाल्या..!

साडी म्हणजे तिचे जीव की प्राण..

लाल, पिवळा, हिरवा, निळा,

आकाशी , बदामी, केशरी, राखडी

अश्या वैविध्यपूर्ण रंगाच्या साड्यांचे तिचे कलेक्शन..

सोबतच कलकत्ता कॉट, शिफॉन, सिंथेटिक, सिल्क, जॉर्जेट,

कांजीवरम, काठपदर, खादी, काश्मिरी, गुजराती..

असे अनेक प्रकार...!

दुकानात गेल्यावर साड्यांची खरेदी करताना

कसे दोन तीन तास तर सहजपणे जातात..

हे तिला आठवून क्षणभर बरे वाटले..

प्रत्येक साडी निवड अगदी विचारपूर्वक केलेली..

लॉक डाउन मुळे ह्या वर्षी देखील

लग्नाच्या वाढदिवस घरीच साजरा होईल

ह्याची दाट शक्यता नाकारता येणार नव्हती..

परंतु छोट्या छोट्या गोष्टीत

आनंद शोधण्यासाठी धडपड करणारी

मोना जराही नाराज झाली नाही...

यंदा काय नवीन करायचे आणि

नवरोबा कडून काय नवीन करून घ्यायचे

ह्याच विचारात ती पूर्णपणे गुंतलेली..!

साड्यांची उलथापालथ करतांना

अगदी खालच्या कप्प्यात असलेला,

छान घडी करून साडी कव्हरमध्ये

ठेवलेला,

अगणित आठवणींनी गच्च भरलेला

तिचा "लग्नाचा शालू" हाती लागला..

गुलाबीसर रंग..

त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले..

पूर्ण साडीत बारीक फुलांचे बुट्टे..

आणि मोठा काठ पदर...

१४ वर्ष जुना पण तितकाच सुंदर..

आकर्षक..

त्यात असलेल्या रेशीम धागा

आठवणीची सर बांधून बसला होता जणू..

मन कावरं बांवर झालं..

डोळेझाक करूनही त्यात साचलेलं पाणी

टचकन खाली पडलं..

साड्यांचा कितीही मोठा ढीग असला तरी

लग्नाच्या साडीची सर कशालाच नाही..

हे तिला चांगलेच ठाऊक होते..

हात फिरवताच मायेचे कोमल स्पर्श

तिला भास करून गेले..

नवीन साड्यांच्या गर्दीत

जणू तो शालू मागे पडला होता...

हो शालू.. तोच

खरेदी करताना हळूच

बोट ठेऊन त्यानेच निवडून दिला होता..

मला आवडला ना..? म्हणून

माला इशारा करूनच विचारले होते..

तोच शालू ज्यावर

त्याने लग्नाआधी पाठवलेलं

नेकलेस घातलं होतं..

वाहिनीचा कंबरपट्टा,

आजीची बोर माळ,

आईची बिंदी,

आणि सौभाग्य कांक्षीनी होतांना

घालतात त्या हिरव्यागार काचेच्या बांगड्यांचा चुडा...!

सप्तपदी झाल्यावर ह्यावरच

त्याने आपल्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्रही..!

"अंतरपाट मध्ये नसता तर

तुला लागलीच मिठीत घेतले असते मी.."

असे नवरोबाने दिलेले रोमँटिक कॉम्प्लिमेंट..!

आणि ते ऐकून लाजेने चुरचुर झालेली मी...!

हम्म..मग ठरलं तर..

यंदा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी

हीच साडी नेसून परत एकदा

नवरोबाची विकेट द्यायची..

आणि त्याच आठवणीची कॅसेट

परत एकदा रिवाईंड करून बघायची..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy