STORYMIRROR

Neha Khedkar

Fantasy Others

3  

Neha Khedkar

Fantasy Others

सफरनामा माऊंट अबू चा

सफरनामा माऊंट अबू चा

2 mins
200


सुट्टी म्हंटल की भटकंती आलीच. भटकंती म्हटलं तर सध्या अस्तित्वात असलेल्या अनियमित पाऊस आणि ऊन अशा विचित्र वातावरणापासून दूर निघून कुठेतरी थंड हवेचे ठिकाण शोधणे गरजेचे. मग काय ठिकाण ठरले , २०२० पासून मनात होतेच परंतु अचानक पणे डोकावणाऱ्या रोगाने त्यावेळच्या प्लॅनिंगचा बट्टा बोळच केला.

 पण फिरायला जायचं असेल तर नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आणि सर्वार्थाने ती जबाबदारी आमच्या जिजाजींनी घेतली. 

मुलींच्या शाळेचे वेळापत्रकानुसार तारीख ठरली, ह्या दिवसात सूर्य देवता खूप तापट असतात त्यात कोरोना आपले डोके परत वर काढायला सज्ज असताना, एक वेळ जायचं ठरल्यावर कायको डरनेका..!  

मग काय विचारता, लागलीच हॉटेलची बुकिंग सुद्धा झटपट झाली. त्यांची स्वारी मुंबा देवी वरुन तर आमची अमदाबाद वरुन निघाली. आमची गाडी आणि त्यांची आगगाडी " अबू रोड" येथे ठरल्या प्रमाणे मिळाली. स्टेशनवर गाठी भेटी झाल्या आणि आमचा प्रवास राजस्थान राज्यातील अरावलीच्या पर्वत रांगांमध्ये १७२२ मीटर उंच असलेल्या "अबु

र्दांचाल" म्हणजेच" माऊंट अबू" कडे सुरू झाला.


 उंच उंच पर्वत रांगांमध्ये मोहून टाकणारे सौंदर्य भारावून घेणारे होते. विशेष म्हणजे तिथे काश्मीर मध्ये दिसणारी उंच उंच झाडे आणि दक्षिणेस प्रामुख्याने दिसणारी बांबूची झाडे अशी दोन्हींही बऱ्याच प्रमाणात नजरेस पडली. विविध रंगांची फुले आणि विशेष म्हणजे जागो जागी आधळलेल्या विविध रंगी गुलाबाच्या फुलांनी माझे मन भरून आले. तिथे असलेली पायवाट ' चहड उतारावर ' असल्याने पोटात गोळा कधीही येतो आणि पोटात गर्कन फिरकी घेतो कळतंच नाही...!


 गुरु शिखर, नक्की लेक, दिलवाडा जैन मंदिर अशी बघण्यासारखी ठिकाणे बरीच आहेत. जागा उथळ असे असून सुद्धा स्वच्छ्ता आणि जागेचे नियोजन उत्तम रित्या केले आहे. कुठेही कचऱ्याचा ढीग आढळला नाही. शांतता आणि सुव्यवस्था आणि देखण्या जोगे नैसर्गिक सौंदर्य डोळे टिपून घेतात. तेव्हा प्रसन्न असलेल्या सूर्य देवते पासून जरा निवांत क्षण वेचायचे असतील तर दोन तीन दिवसांसाठी नक्कीच जाऊ शकता...."अबुर्दांचाल" 



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy