चॉकलेट
चॉकलेट
नेहमप्रमाणेच पसारा आवरून न ठेवल्याने तिच्या चिऊला खूप रागावले.
"अगं आवरते ना.." असे म्हणून सुद्धा तिचे काही एक ऐकून घेतले नाही.
तिच्या आवाजाने घरात एकच शांतता पसरली.
चिऊ तिच्या क्लास ला निघून गेली.
कामाचा ताण खूप वाढल्याने तिची चिडचिड झाली. ती घरातून काही कामानिमित्त बाहेर पडली.
येतांना मात्र स्वतःवरच रागे भरणं झाले तिचे...
श्या... आपल्या कामाचं प्रेशर आहे तर चिऊच्या अभ्यासाचे पण आहे ना तिला..!
रोज तर सगळं आवरुन ठेवतेच ती.
अगदी घराबाहेर पडताना चेक करते काही राहिलं का म्हणून...
आजच नाही केलं तर कित
ी रागावले आपण तिला...
चुकलच आपलं... सॉरी तर बनता है ना...!
काही वेळात चिऊ घरी आली... आणि हळूच मागून येऊन तिला बिलगली...
सॉरी ना आई... उद्या पासून रोज आवरून ठेवेन मी माझं सामान. नक्की... पण अशी रागावू नकोस ना... तू रागावली की माझा दिवस चांगला जात नाही..
हम्म... सॉरी मी पण...
तुझी परीक्षा सुरू आहे, अभ्यासाचं टेन्शन आलंय तुला... मीच समजून घ्यायला हवं होतं...
तिने चिऊला घट्ट मिठीत घेतले...
बस् बस्... जास्त सेंटी बनू नकोस...
चल..."कुछ मिठा हो जाए..."
हो... नक्कीच...
पर्स मधून तिचे आणि चिऊ चे आवडते 🍫 चॉकलेट काढले आणि दोघींनी मिळून फस्त केले...