बाबांनी केलेले कौतुक...!
बाबांनी केलेले कौतुक...!
लहानपणी निशाला कितीही मार्क मिळाले तरी निकालाच्या दिवशी तिचे बाबा पेढ्याचा डब्बा घरी आणत. त्यामुळे बाबाने केलेलं कौतुक तिला नेहमीच जगावेगळा आनंद देऊन जात असे... कॉलेजमधून आल्यावर निशाजवळ बराच वेळ असायचा, म्हणून काही तरी नवीन शिकण्यासाठी संस्कृत विशारदचा कोर्स करण्याची इच्छा बाबजवळ व्यक्त केली...
"अगं, होईल का इतकं म्हणून " आईची काजळी ...
"तिला जमेल नक्की..." म्हणून बाबांनी पळवून लावली...
मग काय... निशाला आता शिकण्यासाठी नवीन उमेद मिळाला... सकाळी कॉलेज करून संध्याकाळी संस्कृत शिकण्यासाठी तिची तारेवरची कसरत सुरू झाली...कधी कधी कंटाळा यायचा ...तेव्हा बाबा म्हणायचे,
"आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग वेळीच केला तर त्याचं फळ भविष्यात निश्चितच मिळतं..."
निशाचे दोन्ही परीक्षेत डिस्टिंग्शन बघून बाबांनी आजही स्वतःच्या हाताने तिला पेढा भरवून लहानपणीसारखेच तिचे भरभरून कौतुक केलेले बघून तिला खूप भरून आले...