Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Neha Khedkar

Inspirational Others


2  

Neha Khedkar

Inspirational Others


कचरा...

कचरा...

2 mins 367 2 mins 367

गण्या नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना घेऊन चरायला निघाला. फार काही नाही तर वाटेत लोकांनी टाकलेलं अन्न गुरे खात खात पुढे सरकत होती. कोणी हंबरडा फोडून बोलायचा प्रयत्न करीत होती. काही अंतरावर एका पाण्याचा दूषित प्रभावाचा नाला त्याला लागला. गुरांना पाणी प्यायला सोडून तो जरा विश्रांती घेत कडेला उभा होता. त्याची नजर सहजच कचऱ्याने भरलेल्या ठिकाणी गेली. सांडपाण्यासोबत प्लास्टिक तर भरभरून वाहत होते. तो सगळा प्रकार बघून त्याने ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कम्प्लेंट केली. आणि त्याला योग्य महिती जाणून घेण्यासाठी त्याने एका तासात पूर्ण गावाला जमा केले...


सगळे गावकरी माहिती जाणून घ्यायला उत्सुकतेने अधिकाऱ्याची वाट बघत होते. त्यांची रोजीरोटी असलेल्या गुरांना वाचविण्यासाठी काय हवं ते करायला ते तत्पर होते...


तेवढ्यात हातात पेपरचा गठ्ठा घेऊन अधिकारी आले. सरपंचांनी ओळख करून दिली आणि महत्त्वाचे महितीपत्रक

घेऊन त्यांनी वाचायला सुरुवात केली...


घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार आता ग्रामपंचायत स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी क्लस्टर निर्माण केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. सध्या ग्रामपंचायत स्तरावर प्रकल्प अहवाल तयार केले जात आहेत. त्यानंतर क्लस्टर तयार करण्यासाठी पंचायत समितीस प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत.


या प्रकल्पात कचरा संकलन करताना अविघटनशील प्लास्टिक कचरा वेगळा करावा लागणार आहे. त्यानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. मोठ्या ग्रामपंचायती आसपासच्या लहान ग्रामपंचायतींकडून कचरा संकलन करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. यासाठी क्लस्टर कोठे तयार करायचे, यामध्ये किती गावे घ्यायची, कचरा संकलन कसे करायचे, जमा होणारा कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने करायची, यासाठी एकूण किती खर्च अपेक्षित आहे याचा विचार करून संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.


शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने ही समस्या गंभीर बनली आहे. गावातील रस्त्यात कचरा पडलेला दिसतो. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. कचरा रस्त्याच्या कडेला कुठेही टाकून दिला जातो. यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात असतो. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


गावकऱ्यांनी स्वतःची चूक मान्य करीत अधिकाऱ्यासोबत आपल्या मनातील प्रश्न विचारून कचरा व्यवस्थापन योग्य रीतीने करायला सुरुवात केली...


Rate this content
Log in

More marathi story from Neha Khedkar

Similar marathi story from Inspirational