Seema Kulkarni

Abstract

2  

Seema Kulkarni

Abstract

बालपणाचे गोडवे गावे की वृद्धपण

बालपणाचे गोडवे गावे की वृद्धपण

3 mins
51


आयुष्य म्हणजे एक रंगमंच आहे.आणि आपण म्हणजे त्यावर नाचणाऱ्या कठपुटल्या आहोत. ज्याची दोरी त्याच्या हातात असते.आपला या रंगमंचावरील प्रवेश निश्चित होतो आणि रंगमंचावरील पडदा उघडला जातो. आणि माणसाच्या तीन अंकी प्रवेशाने नाटक सुरू होते. पहिला अंक म्हणजे बालपण, दुसरा तारूण्य आणि शेवटचा अंक म्हणजे वार्धक्य. ज्याने ही भूमिका शेवटपर्यंत निभावली त्याने हा रंगमंच जिंकला.


सुरुवातच या नाटकाची बालपणाने होते. जे निर्व्याज, निरागस व निर्लेप असते. कोणत्याही व्यवहाराचा लवलेशही नसतो. बालपणा इतके गोड काहीच असू शकत नाही. म्हणूनच जे बालरूप युगानुयुगे पाहण्यासाठी स्वतः देवही तरसले, त्या बाल रूपात जन्म घेण्याचा मोह त्यांना स्वतःलाही आवरला नाही. कोणाचेही बालपण स्वतःच्या दृष्टीने मोहक असेच असते. जोपर्यंत बालपण बाळरूपात असते तोपर्यंत बाललीलांनी प्रत्येक क्षण मोहून जातो. रडणे ,हसणे, खेळणे  सगळेच इंटरेस्टींग असते. तासनतास त्याला आवरताना, त्याच्याशी खेळताना दिवस पुरत नाही. रांगण्यातला तो आनंद, चालतानाचे ते पहिलं पाऊल , बोलतानाचा तो पहिला शब्द अगदी ठळकपणे लक्षात राहतो. बोलायला आल्यानंतरचे ते बोबडे बोल ,त्यांना वाक्यात मांडण्याचा प्रयत्न ,अमुक एक गोष्ट हवी म्हणून आलेले रडू आणि आपण घातलेली समजूत. आपल्याला फक्त आनंद देते.चालता आल्यावर सर्व घरभर फिरणे, पसारा करणे , खेळण्यांसाठी हट्ट करणे , त्यात रमून जाणे याचा कितीही त्रास वाटला तरी ते हवंहवंसं असं वाटतं. थोडसं अजून मोठे झाल्यावर समवयस्क मित्रांमध्ये मिसळणे, खेळणे. शाळेच्या पहिल्या दिवसाचे ते लोभस रुप ,सगळेच सुंदर असतं. ती मस्ती , तो खोडकरपणा सगळच गोड असतं. असं हे बालपण प्रत्येकाच्या वाट्याला येतेच. हे बालपण कोणालाही गोडच वाटेल. कितीही मोठे झालो तरी बालपणीच्या आठवणी कधीही मनःपटलावरून पुसल्या जात नाही. पण जेव्हा या मोठेपणाच्या झळा लागतात तेव्हा बालपणातला निरागसपणा संपून जातो.


आणि प्रत्येक मनुष्य जन्माला या तीनही अवस्था अटळ आहेत. जो आज वृद्ध आहे तो कधीतरी बाल होता , तरुण होता. जो आज बाल आणि तरुण आहे तो कधी ना कधी वृद्ध होणारच. अवस्था त्याच फक्त वेळ बदललेली असते.


हे जर भोगणे क्रमप्राप्त असेल प्रत्येक जीवाला तर वृद्धावस्थेस बोल का लावावे? साठीनंतर बुद्धी नाठी असते असे म्हणतात म्हणजेच बुद्धि ठिक रहात नाही. मेंदू वरचा कंट्रोल सुटून जातो. बालपण आणि वृद्धावस्था या दोन्ही अवस्था सारख्याच समजल्या जातात. वृद्धावस्था ही बालपणाचीच विकसित अशी अवस्था असते. प्रत्येक अवयवाची शारीरिक क्षमता हळूहळू कमी होणे ,बारीक सारीक शारीरिक कुरबुरी सुरू होणे, दुसऱ्याच्या आधाराची गरज वाटणे, जास्त शारीरिक श्रम न होणे. ही खऱ्या अर्थाने वार्धक्य़ाची सुरुवात होते असे म्हणावे लागेल. 


बालपणी चार पायाने माणूस सांगतो तर वृद्धपणी तीन पायांने अर्थात काठीच्या आधाराने. वृद्धपणी प्रत्येक गोष्टीचे विस्मरण होते परत परत ती गोष्ट सांगावी लागते. आणि बालपणी स्मरणात ठेवावी अशी गोष्टच नसते. बालपणात आधाराशिवाय एकही गोष्ट करू शकत नाही. चढताना, उतरताना, पडल्यावर उठताना सांभाळून घेण्याची गरज पडते. तसेच वृद्धपणी ही भरभक्कम आधाराशिवाय माणूस चालू शकत नाही. वृद्धत्वा मध्ये शरीरातील ताकद कमी होते, बालपणी अजून शरीरामध्ये आलेलीच नसते. बालपणी तोंडात दात नसतात म्हणून अन्न चावले जात नाही, सांडून जाते, स्वच्छता राहत नाही.


वृद्धपणी तोंडात दात रहात नाहीत म्हणून चावून खाता येत नाही. शरीर थकलेले असते त्यामुळे शारीरिक कमजोरी जाणवते. बालपण हे स्वतःच्याच विश्वात रमणारे असते तर वार्धक्य ही असेच असते. आपली तब्येत ,आपले रुटीन ,आपल्याला झेपेल तेवढेच . असे असते.

बालपण ही शांतता असते , आयुष्यातील संघर्षाच्या आधीची. आणि वार्धक्य हे संघर्षानंतर ची शांतता असते.


वृद्धपण ही बालपणाच्या सर्व अवस्था भोगतोच. पण ते बालपणा सारखे सुखावह निश्चितच नसते. अवस्था दोन्ही सारख्या फक्त वेळ बदललेली असते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract