Chandanlal Bisen

Thriller

4.0  

Chandanlal Bisen

Thriller

अविस्मरणीय कठीण प्रवास

अविस्मरणीय कठीण प्रवास

2 mins
194


एक गुरुजी होते. ते नुकतेच गुरुजी झाले होते. त्यांची नवीन नियुक्ती तालुक्याच्या ठिकाणाहून पस्तीस कि.मी. अंतरावरील एका लहानशा गावात झाली होती. एक लहानसं आदिवासी बहुल गाव होते. ते गाव एका धरणाच्या सानिध्यात, हिंस्त्र प्राणी असलेल्या भयानक जंगलाला लागून होते. मार्गी अनेक ओढे- ओहोळ चढाव-उतार नागवळणीची कच्ची रुंद वाट होती. दिवसा सुध्दा त्या वाटेने काळोख दृश्य वाटायचा. त्या मार्गी तेव्हा शासकीय वाहनांची अजिबात सुविधा किंवा कोणतीही रेलचेल नव्हती. एकदा गुरुजी गावाला गेले. गावावरून ट्रेनने नवेगाव/बांध पर्यंत, पत्नी बरोबर प्रवास केला. सामानाचे मोठे थैले घेतले. जिथे सायकल ठेवली होती, त्या घराकडे निघाले.सायकलनी बावीस किमी चा प्रवास करायचा होता. सायकल घेतली. ती पंक्चर असल्याचे दिसून आले. त्या घरी वारंवार सायकल ठेवण्यात येत होती. म्हणून कदाचित अद्दल व्हावी म्हणून, जाणूनबुजून हवा काढण्यात आली असेल! पत्नी पहिल्यांदाच शोबत आली होती.


लग्न नुकतेच झाले होते. पंक्चर सायकल दुरुस्त करण्यात आली. सायकलला वजनदार मोठे थैले टांगले. पत्नी समोरच्या दड्यावर बसली. प्रवास सुरु केला. बारा किमी पर्यंत दगड-मुरुमाचे रोड होते. सायकलचे पैंडल मारत, अंतर कापत, धाबेपौनी गाव आले. आता दहा किमी चे अंतर उर्वरित होते. आता पुढे भयानक जंगल.. खोलखोल नाले-धोड्या.. चढाव-उतार.. झिकझ्याक नागवळणी मोड असणारी, माती असलेला रस्ता.. पावसाळ्याचे दिवस .. हिंस्त्र प्राण्यांचा वावर.. झाडांच्या सावलीचा काळोख..


पत्नीकरिता तर ते अति भयानक दृश्य होते. त्यांच्या आयुष्तील पहिलाच प्रसंग होता. गुरुजींना सवय झाली होती, त्या रस्त्याची..! कच्च्या रस्त्याचा प्रवास सुरु झाला. गाव तीन किमी असलेल्या पूर्वी, कणारी चिकट मातीची वाट लागली. पाऊस काही तासापूर्वी पडला होता. त्यामुळे जमीन चांगलीच नरमलेली होती. माती सायकलला लपेटा पकडत होती. कशीबशी थोडी पुढे गेली. आता सायकल पुढे सरकत नव्हती. चक्यांमध्ये चांगलीच माती ठुसून भरली होती. त्यामूळे दोन्ही चक्के जाम झाले होते. आता सायकल ना मागे, ना पुढे.. गुरुजी- म्याडमच्या चपलांनी सुद्धा चिकट मातीचा लपेटा पकडला होता. सायकल बाजूला स्टँडवर लावण्यात आली. तिला लॉक करण्यात आले. चपला पण तिथेच काढून ठेवण्यात आले. सायकलला टांगलेले थैले हाती घेतले व दोघेही विना चपलाने पायी चालू लागले, गावाच्या दिशेने..!


हाती जड थैले असल्यामुळे दमही लागत होता. अध्येमध्ये हुश-हुश करत कसेबसे तरी आपल्या खोलीवर पोहचलेत.  सूर्यास्त होत आला होता. घरमालकाच्या येथील विचारू लागले. गुरुजी तुम्ही पायीचकाजी..!! अन् तुमची सायकलजी? मोठया आश्चर्याने पाहू लागलेत. आम्हाला बघताच शेजारी सुद्धा भिरभिर गोळा झालेत. ते सुद्धा विचारू लागलेत. गुरुजी, मॅडमला पायीच आणल्या काजी? गुरुजी म्हणाले, काय करणार मग..! तुमच्या गावाला येण्यासाठी रोडगिड आहेत का बरोबर? त्यांना सर्व वास्तविकता सांगण्यात आली. त्या मार्बदी धोडीवर सायकल व चपला ठेवल्यात म्हणून..! दुसऱ्या दिवसी घर मालकाचा युवा मुलगा सायकल आणण्यास गेला. तो ताकतीने दणकट होता. त्यांनी ती सायकल खांद्यावर उचलून आणली. असा गुरुजींचा, 'अविस्मरणीय कठीण प्रवास'


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller