अति लघुकथा
अति लघुकथा
एकदाचा हा प्रसंग, माझ्या नवीन नोकरीच्या काळातील आहे. भयानक जंगल परिसरात माझी कर्मभूमी होती. मी एकदा सकाळच्या वेळेस शौच करण्याकरिता नाल्यावर चाललो होतो. तेव्हा गावात शौचालये नव्हती. बाहेरच जावे लागे. अगदी बाजूनेच खेकसण्याचा आवाज आला. तो आवाज माझ्या परिचयाचा नव्हता. मी पुढे चालत राहिलो. दोनशे फूट अंतर पार करताच बापरे बाप..! मोठं अस्वल..!! ते दिसताक्षणीच मला धडकी भरली. कसलाही
विलंब करता मी ताडकन माघारी फिरलो. अन्यथा काय बरेवाईट झाले असते...!!
