Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

अशीही एक गुलामगिरी

अशीही एक गुलामगिरी

4 mins
208


कथा काल्पनिक आहे. प्रयत्न कितपत योग्य जमला आहे माहित नाही. काही चुकीचे वाटत असल्यास क्षमा असावी. गुलामगिरी म्हणजे दुःख, वेदना, आणि त्यातून केविलवाणी सुटण्याची धडपड मनुष्याची कायमच चालू असते. नियतीचा गुलाम तर असतो माणूस. वेळेनुसार, परिस्थिती नुसार दोरीचे बंध सोडले किंवा आवळले की माणूस सैरभैर होतो. तरीपण शाश्वताची ही गुलामगिरी सहनीय असो अथवा नसो त्यातून जाणे तरी नक्कीच असते. 


"दुनिया मे हम आये है तो जीना ही पडेगा,

जीवन है अगर जहर तो पी नाही पडेगा !"


पण त्याही पलीकडे जाऊन एक वेगळी, हवीहवीशी वाटणारी ही गुलामगिरी असते. त्याचीच ही कथा. तेजू तशी मध्यमवर्गीय कुटुंबातली. आई, बाबा, काका, काकू आणि त्यांचा मुलगा अशा एकत्र कुटुंबातली. आई, काकू मेसचे डबे बनवायच्या. बाबा एका प्रायव्हेट कंपनीत, काकाची चहाची टपरी. पण तेजू चे स्वाभिमानी कुटुंब म्हणून ओळखले जायचे. नुकतेच शिक्षण पूर्ण होऊन तिला मुंबईला जॉब ची ऑफर आली होती. पण तिथे राहण्याची काहीच सोय नव्हती. तेव्हा तिच्या आईला , स्वातीला आपली बाल मैत्रीण श्रद्धा ची आठवण झाली. जी मुंबईमध्ये एका गर्भश्रीमंत घरामध्ये लग्न करून गेली होती. ती जरी श्रीमंत कुटुंबात असली तरी तिचा प्रेमळ स्वभावात जराही बदल झाला नव्हता. अजूनही त्यांच्या मैत्रीची वीण तशीच घट्ट होती.


     यानिमित्ताने जिवाभावाच्या मैत्रिणी पुन्हा एकदा भेटल्या. स्वातीने श्रद्धाला तेजू विषयी सर्व सांगितले आणि अडचण ही सांगितली. आणि विनंती केली की, "तुझ्या ओळखीने तेजू ची राहण्याची सोय कर. हे तुमचे मुंबई शहर आम्हाला नवीन आहे" .तेव्हा श्रद्धाने हक्काने , आग्रहाने तेजुला स्वतःच्या घरी राहण्यासाठी सांगितले. स्वाभिमानी स्वातीला हे पटले नाही. पण मैत्रिणीच्या आग्रहापुढे आणि मुंबईच्या शहरी वातावरणामुळे तिने या गोष्टीला होकार दिला.


      श्रद्धा मावशीचा तो श्रीमंती थाट पाहून तेजू सुरुवातीला खूप बावरून गेली. पण हळूहळू तिला या घराची , मुंबईच्या वातावरणाची सवय झाली. रोज ऑफिस मध्ये एकटी जाऊ येऊ लागली. थोड्याच दिवसात तेजू ने त्या घराला आपल्या गोड स्वभावाने आपलेसे केले. मावशीचा मुलगा सारस याला पण ती पहिल्यांदाच भेटली होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सारसही तिचा छान पैकी मित्र झाला. त्याची पण स्वतःची कंपनी होती. रोज प्रत्येकाच्या आवडीची डिश बनवणे, प्रत्येकाची मर्जी सांभाळणे यामुळे तेजू त्या घरात सगळ्यांची लाडकी बनली. .श्रद्धा तर तेजुला आपल्या सुनेच्या रूपात पाहायला लागली.


     तिच्या या गोड स्वभावामुळे ती सगळ्यांचे मन जिंकून घेऊ लागली. त्यातच तिने सारसचेही मन जिंकून घेतले. सारसच्याही नकळत तिचा सहवास त्याला आवडू लागला. 


"मेरे मन का मौसम बदलने लगा है,

तेरे नाम से दिल धडकने लगा है,

तेरा प्यार सीने मे पलने लगा है "


अशी अवस्था झाली होती सारसची.आणि तेजू तर तिच्या भावनांची गुलाम होती. ती थोडीच तिच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकणार होती? कारण ते योग्य ही नव्हते आणि ती योग्य वेळ ही नव्हती. पण सारसला तिच्या डोळ्यात आपले प्रतिबिंब स्पष्टपणे दिसत होते.पण प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. ते कधी, कुठे, कोणावर जडेल, आपल्या हातात काहीच नसते. अंतर्मनाची ती हाक असते. याचा तंतोतंत प्रत्यय ती घेत होती.


      दोघांच्याही मनातले प्रेमभावनेचे दोर परस्परात अडकत होते. "हृदयी प्रीत जागते ,जाणता , अजाणता"असे. आणि त्यातूनच तेजुला प्रत्येक कामात मदत करणे, तिची काळजी करणे, कधी उशीर झाला तर तिला ऑफिसमध्ये घ्यायला जाणे, या गोष्टी सारस कडून नकळत होत होत्या. आणि तेजू तर त्या प्रेमभावनेच्या तालावर नाचत होती. सारस ला प्रत्येक गोष्टीत होकार देऊन ,पण कबूल मात्र होत नव्हती. हो, त्या प्रेमभावनेची शरणागत अवस्था तर होती.


       श्रीमंत-गरीब ही तफावत, तेजू चे स्वाभिमानी कुटुंब, उपकाराचे ओझे, या गोष्टीची जाणीव ठेवून तेजू गप्प बसत होती. पण तिचा होकार ऐकण्यासाठी सारसचे कान आतुर झाले होते. आधीच तेजू चे श्रद्धा च्या घरी राहणे ,स्वातीला पसंत नव्हते. आणि त्या मधेच श्रद्धाने तेजूला सारससाठी घातलेली मागणी. यामुळे तर स्वाती पूर्णपणे हतबल झाली. ती उघडपणे श्रद्धाला विरोध करू शकत नव्हती. म्हणूनच काय स्वातीने तेजुला कायमचे घरी आणले कधीही जॉब न करण्याच्या बोलीवर. हे संबंध स्वातीला कधीच मान्य नव्हते. कारण त्यांची आणि आपली बरोबरी कधीच होऊ शकणार नाही , याची पूर्ण जाणीव तिला होती.


      शेवटी स्वातीच्या हट्टापुढे श्रद्धाने हा विषय तात्पुरता सोडून दिला पण मनात एक चांगली आशा धरूनच. ती कधी ना कधी, तेजू चा हात ती आपणहून सारस च्या हातात देणार. सारस आणि तेजूच्या मनात प्रितीचे जे भावबंध उमटले होते, त्यातून कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित, कधी निराशा तर कधी आतूरता व्यक्त होत होती. पण आईच्या निर्णया पुढे जाण्याची तेजूची हिम्मत नव्हती. कारण तिची आई तिच्यासाठी सर्वस्व होती. आई साठी तिला तिच्या भावनांची ही किंमत नव्हती.


      खूप प्रयत्न करूनही, यश येईना म्हणून अखेर जड अंतकरणाने सारस ने कायमचे फॉरेनला जाण्याचा निर्णय घेतला. प्रेमभावनेच्या बंधात न अडकता. तेजू ही त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होती. पण शेवटी हरली. तो आपल्यापासून कायमचा दूर जातोय या कल्पनेने घाबरली. आपणही त्याच्या शिवाय जगू शकणार नाही ही जाणीव तिला पहिल्यांदाच झाली.आपल्या भावनांचे बंध तिने सैल केले. आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या गुलामगिरीत स्वतःला अडकून घेतले. आणि सारस ला जाण्यापासून थांबवले. मनातील भावनांचे बंध जाणून घेऊन त्या प्रेमाच्या शरणागत अवस्थेत लीन होण्यासाठी. त्या प्रेमाच्या भावनांचे कायमचे गुलाम होण्यासाठी. त्याच्या प्रेमाचा स्वीकार करूनच.


      अन् दोघेही अलगद अडकले त्या प्रेमपाशात कधीही दूर न जाण्यासाठी. 


"जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा,

अगर ना मिलते इस जीवन मे लेते जनम दुबारा"


दूर कुठे तरी गाण्याचे बोल कानावर पडत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract