Chandanlal Bisen

Children

4.0  

Chandanlal Bisen

Children

असा ध्येयवादी चंदू..!

असा ध्येयवादी चंदू..!

2 mins
169


एक होता चंदू. चंदू अतिसामान्य कुटुंबात जन्माला आला होता. चंदू स्वभावाने शांत व सात्विक विचाराचा होता. अतिकष्टाळूपणा, जिद्द, चिकाटी, धैर्य, अनेक कलागुण, अंगी होते. कोणतेही कार्य जीव ओतून करायचा. त्यामुळे प्रत्येक कामात उत्कृष्टतता असायची. हलाखीच्या दयनीय परिस्थतीमुळे सर्वप्रकारे कामे करावी लागली. चंदूच्या वाट्याला आलेले कोणतेही काम असो, आवडीने करायचा. अन् गिनत कटू प्रसंग जीवनात येत राहिलेत. खडतर प्रवास अविरत सुरू होता. जीवनातील एक वळणात्मक प्रसंग प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कसेबसे तरी पूर्ण केल्यानंतर आला. तेंव्हा खाजगी डी.एड. नुकतेच तालुक्याच्या ठिकाणी उघडले होते.


त्यावर्षी खूप मोठा दुष्काळ पडला होता. शेतीत धान्य पिकले नव्हते. कसेबसे एक एक दिवस कंठीत होत होते.डी.एड. करण्याचे भूत चंदू डोक्यात शिरले होते. चंदूने चंगच बांधला होता डी.एड. करण्याचा..; पण दुर्बल परिस्थिती आड येत होती. त्यांनी, घरच्यांकडे मला डी.एड. करायचे म्हणून, विचार बोलून दाखविला. घरच्यांचा स्पष्ट नकार होता. चंदूची समजूत घालायचे की, यावर्षी दुष्काळ पडला आहे, पुढच्या वर्षी डी.एड.ला नाव घालू. असे अनेक दिवस साधकबाधक चर्चा होत राहिल्या; पण मार्ग काही निघत नव्हता. घरच्यांचा ठाम नकारच मिळत होता; पण एकाकी हार मानणारा चंदू नव्हता. जिद्दी व निर्धारी होता. त्याला काही करून डी.एड. करायचाच होता; पण परिस्थिती बेताची, ही आडवी येणार होती. तरीपण डी.एड. करायचंच होतं. डी.एड. करण्याचा संकल्प ठाम होता.


मग वडिलांच्या मित्रांकडे गेला, वडिलांना समजावतील म्हणून..! चंदूच्या बाजूने ह्या वडिलांच्या मित्रांनी, घरच्यांची समजूत घातली. तेव्हा कुठे घरचे लोकं होकार भरलेत. चंदुनी तालुक्यातील ठिकांनी डी.एड. ला प्रवेश घेतला. डी.एड. कसेबसेतरी पूर्ण झाले. व लगेच दीड वर्षानंतर गुरुजीची नोकरी मोठ्या प्रयत्नातून मिळाली. चंदू गुरुजी झाला. चंदूच्या आयुष्यात सूर्य उगवला. जशी ऋतू वर्षा झाल्यानंतर नभी इंद्रधनुष्य सात रंगांसह आकर्षक दिसतो, त्याप्रमाणे चंदूच्या आयुष्यात अनेक रंगांच्या छटायुक्त इंद्रधनुष्य शोभायमान झाला होता. आनंद गगनात मावेनासा झाला होता. चंदू त्या गावातील झालेला पहिला शिक्षक होता. त्यांनी पुढे आपल्या कर्म क्षेत्रात अत्युत्कृष्ट कार्य करून आपल्या कर्मभूमींचे नाव ताऱ्यागत प्रसिद्धी झोतात आणले. जीवन प्रवास अत्यंत खडतर, तरी अहोरात्र परिश्रमातून, अनेकरित्या यशाची शृंखला कायम ठेवली. असा हा ध्येयवादी चंदू..!!


बोध- खडतर मार्गच यशाचा शिल्पकार असतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children