अनुकरण
अनुकरण
आजच्या काळ्यात कोण कसा वागतो, कसा राहतो,त्याचे राहणीमान कोणच्या स्तराचे आहे, त्याची आवक किती आणी त्याचे स्त्रोत काय या कडे आजुबाजुनच्या समाजत राहणारांचे अगदी अचुक लक्ष्य नेहमीच असते. आपाण त्या मानाने किती उंच किंवा खालच्या स्तराचे आहो याचे सारखे अवलोकन आपले नातेवाईक दोस्त-मित्र. शेजारी आणी संर्पकात येणारे सगळे करत असतात.चांगल्या बाबींचे किवा ग़ोष्टिचे अनुकरण करने काही वाईट नसते. अनुकरणामुळे आपल्या काहीं चांगले गवसत असेल आणी त्याचा भार जर आपण आर्थीक दृष्ट्या वहन करण्यास समर्थ असल्यास अनुकरण करने चुकीचे नाही. पण दुसरा काय करित आहे, त्याची नुसती नक्कल करने हे कशे आपल्याला महागडे पडु शक्ते याची प्रचीती या घटने मुळे तुम्हा पाठकांना येईल.आपन आपले नेहमी झाकुन,व दुस-याचे नेहमी वाकुन बघतो.ते किती वाईट असते आची जाण आपण ठेवली पहिजे.
एका नगरात एक श्रीमंत परिवार राहत होता. समाजात त्याची व परिवाराच्या सदस्यांची चांगली पकड व किंमत होती. त्यांना आपल्या श्रीमंतीचा अभिमान पण होता जसा सर्व बहुतेक कमी-जास्त सर्व श्रीमंत लोकांना असतो. तसा त्या परिवाराला पण असने स्वाभाविक होते. दुर्दैवाने त्याचा शेजारी फार गरिब होता. कसे तरी आपले दिवस काढ्त होता. त्याचा परिवार आपण का इतके गरिब आणी आपला शेजारी हा किती श्रीमंत याची खंत त्यांना सारखी वाटत असयाची. पंच पकवान्न तर सोडा कधी काळी गोड-धोड पण त्यांच्या नशिबी पडत नसे. फक्त पंच पकवानाचा सुगंध शेजारयाच्या घरुन घेण्याचे त्यांचे सौभाग्य होते.बराच काळ त्यांनी हा सुगंध घेवुन काढल होता.गरिब माण्साच्या मनात नेहमी आपली परिस्थिति कशी सुधरेल याची चिंता लागलेली असते. त्या नगरात एका टोकाला माता लक्ष्मीचे मंदिर तर दुसरया टोकाला माता अवदसाचे मंदिर होते. हा गरिब माणुस माता लक्ष्मीचे मंदिरात कित्येक वर्षापासुन जात होता. तरि माता लक्ष्मी त्याच्या वर प्रसन्न झाली नाही.नगरातील सर्वच लोकांची भिड या माता लक्ष्मी मंदिरात असायची.तीथे या गरिब माणसाला मातेचे दर्शन पण चांगले होत नसे.मंदिरात नगरातील सर्वच लोकांचा लोंढा माता लक्ष्मी मंदिरात तुटुन पडायचा. त्यापैकी किती भकतांवर माता लक्ष्मीची कृपा होत होती. हे त्या भकतांनाच महित असणार. पण हा गरिब माणुस फार खचुन गेला होता. त्याने एक टोकाचा निर्णय घेतला. आता यापुढे मी माता लक्ष्मीच्या मंदिरात पाय ठेवणार नाही.
आपल्या निर्णयावर तो ठाम होता आणी शेवटी तो रोज नगराच्या दुस-या टोकाला असनारे माता अवदसाचे मंदिरात जावुन रोज निवांत बसायचा. घरी परतण्याच्या वेळेस माता अवदसाचे दर्शन घेवुन घरी परत जात असे. त्याची ही निरागस,स्वार्थहिन भक्तिमुळे माता अवदसा त्याच्या वर प्रसन्न झाली.आणी एक दिवस दर्शन करतांना ती त्या गरिब माणसाच्या समोर प्रगट झाली. ती त्याला महणाली हे भक्ता मी तुझ्या भक्ति मुळे तुझ्या वर प्रसन्न झाली आहे. हे माझ्या लाडक्या पुत्रा तुला काय माझ्या पासुन हव असेल ते तु बिना संकोच करत मला माग. माता आता आपल्यावर प्रसन्न झाली आणी आपल्या ती काही मागण्यास म्हणतं आहे या वर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने मातेला काहीही मागितले नाही. फक्त मातेला एक प्राथना केली कि हे माते अवदसा तु माझ्या घरुन निघुन जा !.माझ्या वर इतकी कृपा कर. माता त्याच्या घरून निघुन गेली.
बघता –बघता गरिब माणसाची परिस्थिती दिवसा-दर दिवसा सुधरत गेली. काहि काळ्यातच तो श्रीमंत होवु लागला .हळू-हळू त्याची चांगलीच भर-भराट होवु लागली होती. समाजात त्याची किंमत व प्रतिष्ठा वाढत चालली होती. हे पाहुन शेजारी दुःखी होत होता. काना मागुन आली अन तिखट झाली म्हणुन त्याने त्याच्या श्रीमंतीचे रहस्य माहित केले.नगरातील लोकांनी त्याला सांगितले कि हा व्यक्ति नेहमी माता अवदासाच्या मंदिरात जात असयचा आता ही जात असतो. त्याने विचार केला की आपण पण याचे अनुकरण केले पाहिजे.म्हणजे आपण याच्या पेक्षाही श्रीमंत होऊ.आणी जी आपली जुनी किंमत आणी प्रतिष्ठा याच्या श्रीमंती मुळे कमी झाली आहे, ती पूर्ववत होईल. असा त्याचा समज झाला. तो रोज या गरिबाचा श्रीमंत झालेल्या माणसा सोबत जावु लागला. त्याचि भक्ति पाहुन एक दिवस माता अवदसा त्याच्या वर प्रसन्न झाली. तीने आपण तुझ्या भक्तिमुळे तुझ्या वर प्रसन्न झालो आहो असी आकाशवानी केली. ही आकशवानी ऐकुन हा स्वार्थी, लालची ,जळकटु माणसाने मातेला त्याच्या घरी येवुन वास्तव्य करावे अशी प्रार्थना केली. माता अवदसा लगेच त्याच्या घरी वास्तव्य करायला गेली. मातेच्या कृपने थोड्याच काळात त्याची आर्थिक परिस्थिति खुपच ढासळली. त्याचे घर दार, संपत्ती सर्व काही पनाला लागले होते .जी परिस्थिति एके काळी त्याच्या शेजा-याची होती त्यापेक्षा ही बिकट परिस्थितिला तो तोंड देत होता. त्याला व परिवाराला शेवटी भिक मागण्याची वेळ आली.
या कथेच्या माध्यमातुन आपण हे शिकायला पहिजे की आवश्यकते पेक्षा जास्त धनाची अपेक्षा करु नये.कोणा सोबत जळकुकडे पना करु नये.आणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही बाबीची सत्यता न जानता त्याचे विनाकार अनुकरण करु नये.
