अनाथांची माय हरविली..
अनाथांची माय हरविली..
हसतं खेळत जगायला शिका.स्वताच दुःख गोंजारत बसण्यापेक्षा दुसर्याच्या वेदना जाणा कुणी भुकेला आपल्या समोर आला तर त्याला दोन घास खायला द्या हे शब्द आहेत माई अर्थात सिंधूताई सपकाळ यांचे. काल माई गेल्या पुण्यात हडपसर येथील गॅलॅकसी रूगणालयात मंगळवारी रात्री आठ वाजुन दहा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वोटसप वर मॅसॅज पाहिला आधी खात्रीच नाही झाली.परवाच तर माननिय राष्ट्रपतींच्या हस्ते पदम पुरस्कार स्विकारताना नेहमीप्रमाणे आभाळभर दुख उदरात दडवून चेहेरयावरील नेहमीचे स्मितहास्य पाहिले होते मी......आणि आज त्या आपलयात नाहीत.मन खिन्न झालं त्या सारयाच लेंकरासाठी जी आज दुसर्यांदा खरया अर्थाने अनाथ झाली. बाप गेलयावर आभाळ हरवत पण आई गेली तर जमीनच सरकते पायाखालची कारण या जगात आईशिवाय कोणिच पोटाशी धरत नाही आईच्या हात च्या भाकरीच्या घासाला जी चव असते ती जगातील पंच पक्वान्नाला ही नाही. सिंधूताई तर एक दोन नाही मी हजार मुलांची आई आहे अस अभिमानाने सांगत ऊकीरडयावर टाकलेली, रस्त्यावर भीक मागणारी नकोशी असणारी कीतीतरी मुलांच्या डोक्यावर माईंनी छत्र धरलं त्यांच शिक्षण लग्न केली त्यांचा सांभाळ करून निवारा दिला त्यासाठी या माऊलीने समाजापुढे पदर पसरला.अगदी अमेरीकेला जाऊनही आपल्या मुलांची व्यथा मांडली गरीब अनाथ पोर ज्यांनी जन्मदाते पाहिलेही नाहित त्यांची आईबापाची भूमिका माईंनी बाईं शेवटपर्यंत निभावत आल्या दुखण खुपन,आजार जेवण अभ्यास सारयाच गोष्टींकडे या वयातही जातीन लक्ष दिलं एखाद्या मुलाला दधाखाणयात ऍडमिट करून,काही सर्जरी वगैरे करावी लागलयास माई स्वता दवाखाणयात थांबत जशी जन्मदाती आई पोटच्या पोरांच्या साठी व्यथित कावरीबावरी होते तशी माईंची अवस्था असे.अशी हि माऊली अनाथ मुलापेक्षा जास्त आपलया जन्मदात्या पोटच्या पोरीवरील माया नैसर्गिक रित्यासुदधा दिसायला नको म्हणून पोटच्या पोरीला पुण्यातील दगडूशेट गणपती ट्रस्ट च्या हवाली करणारी हि माऊली फक्त सिंधुमाईच असू् शकते.सिंधूताई नेहमी त्यांच्या आयुष्यातील दुःखद प्रसंग ही हसत खेळत, शेरशायरी,कविता व यमक जुळवून सांगत पंरतु त्या मागे कीती भयंकर वेदनांचा झरा झिरपत आहे हे त्याच जाणो.अगदी दहा बारा वर्षात लग्न झालेले.नवरा वयाने दुप्पट, त्यात तापट स्वभावाचा शिक्षण वगैरे प्रश्न नाही माहेरी असताना शाळेपेक्षा गुरांमागेच जास्त जावे लागत. थोडीफार अक्षरओळख होती त्यावर मग सासरी दिसेल तो कागद वाचुन काढायला सुरवात केली अगदी किराना सामनाच्या पुंडयाचे कागद वाचताना पाहून कित्येकदा सासरी मारहाण व्हायची.एका प्रसंगात तर मारा च्या भीतीने कागदच खाऊन टाकलेलया आठवणी त्या सांगत. गरोदर असतांना त्यांना मारहान करून घराबाहेरील गोठयात ठेवले तीथेच बेशुद्ध अवस्थेत त्यांचे बाळंतपण झाले शुद्धी वर आल्यावर बाजुला बाळं आणि वर पाहीले तर गाय ऊभी होती मध्ये आणि चारही बाजूंनी गुरानी अडोसा धरला होता माई म्हणत मानसांनी मारलं पण गुरांनी तारल त्या गाईतलया आईने माझ्यावर पांघरून धरले.ही आठवण ऐकताना अंगावर शहारे न येतील तो मनुष्यच नाहीं. पुढे सासरच्या घरांत जाण्याचा प्रश्न नव्हता माहेरी ही आधार नाही मिळाला सिंधूताई बाळाला पदरात दडवून भीक मागुण जगू लागल्या.आपल्यासाठी नाही बाळाला दुध मिळण्यासाठी तरी पोट भरण गरजेच होत. कधी भीक मिळायची कधी नाही एक दिवसाचा तो प्रसंग दिवसभर कांहीही खायला नाही मिळालं मग रात्री स्मशानात रहाव लागलं तिथ प्रेतासाठी ठेवलेल्या शीधया च्या पीठाची भाकरी त्यांनी जळणारा सरणारच्या लाकडावर तीन दगडांची चुल मांडून बनवून खालली काय ती पीढा?आपणास कल्पना सुद्धा अंगावर काटा आणणारी आहे.अशा या माऊलीने पुढ रेल्वे स्टेशन वरील भिखारयांच्या आधाराने कित्येक दिवस काढले त्यावेळी जाणिव झाली कि दुःखी मी एकटी नाही कितीतरी हाल अपेष्टा वेदना, दुःख या जगात आहे कितीतरी अनाथ लेकर मायेच्या ऊभारयासाठी भूकेली आहेत.त्यांना गरज आहे अन्न वस्र निवारयाची हि पोरकी लेकर आपण साभाळायला हवी आणि तिथेच त्यांचा नवा जन्म झाला.ऐकेक करता करता हजारीमो अनाथांची ती माय झाली.अलीकडेच अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने त्यांचा उत्कृष्ट बायोपिक साकारला. त्याद्वारे जगाला हि माय परिचित झाली. कितीतरी पुरस्काराने त्यांना नावाजणयात आले. डॉक्टरेट मिळाली. आणि अलीकडचा सर्वोच्च मानाचा पदम पुरस्कार. अशा या ऊदार, मायाळू,अनाथांची छत्रछाया असणारी माय सिंधूताई सपकाळ यांच्या जाणयान खरया अर्थाने ती हजारो अनाथ बालक दुसर्यांदा आनाथ झाली अस महणल तर वावग ठरणार नाहीं.शासनानं माईंची असं स्मारक उभारले पाहिजे जिथून समाजसेवा, देशसेवा,अनाथांची सेवा करण्याचं बळ व प्रेरणा सदैव जागृत होईल.आईच्या प्रेमापुढे जग नतमस्तक होईल. अशा या थोर माईस भावपूर्ण आदरांजली.
