Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

अलक लेखन

अलक लेखन

1 min
250


     तशी तीन मुलीत आई-वडिलांचा ती मुलगाच होती लग्न झाल्यावर आई वडिलांना सांभाळत होती. शेजारीच फ्लॅट घेऊन. तिचा जॉब, दोन वर्षाचा मुलगा, नवरा बाहेरगावी, सासू सासरे गावी, यामुळे आईकडेच असायची. फारशी सुट्टी मिळत नसायची तिला. त्यामुळे माहेरच्या प्रत्येक सणावारात तिचा भाग असायचाच. तशातच किरकोळ आजारपणामुळे आई गेली. त्यानंतरही वडिलांना सात वर्ष सांभाळले त्यांच्या सणावारासहित. शेजारीच लहान काका, काकू राहत होते. वडिलांनंतर अडीच महिन्याने, हार्ट अटॅकनी काका ही गेले.


आता मात्र गौरी, गणपती करण्याविषयी सासूने तिला सुनावले. गावाकडच्या लक्ष्म्या तिने घरी आणल्या आणि दोन्ही मिळून बसवू असे ठरवू लागली. पण नवऱ्यापुढे तिचे काहीच चालले नाही. काकूच्याही दोन्ही मुलींचे लग्न झाले होते, त्यात काकूची अशी अवस्था, तरी तिला माहेरच्या लक्ष्म्या काकूकडे द्याव्या लागल्या, ज्यांच ती आजपर्यंत करत आली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract