Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

SAMPADA DESHPANDE

Thriller


4.3  

SAMPADA DESHPANDE

Thriller


अज्ञात बेटावर ५

अज्ञात बेटावर ५

2 mins 223 2 mins 223

प्रकरण ५

प्रोफेसर सगळ्यांच्या आधीच परत गेले होते. थकल्याचे कारण सांगून ते तंबूत जाऊन झोपले होते. इकडे सगळे हताश मनाने परत आले.  त्या दोन नावाड्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून सगळ्यांना चहा करून दिला. सोबत आणलेले ब्रेड सगळ्यांनी कसेबसे घशाखाली उतरवले. मग ते आडवे झाले. झोप येणार नव्हतीच. समीर तर रितूच्या काळजीने वेडा झाला होता. राजेंद्र प्रथम झोपला तुषारने जागे राहायचे ठरले. मग तीन तासांनी तो राजेंद्रला उठवणार होता. सगळे झोपले . तुषार सावधपणे सगळीकडे पाहत होता. तीन तास झाले तो राजेंद्रला उठवायला जाणार इतक्यात वीर त्याच्याजवळ ओरडत आला," ऐकलंत तुम्ही ? रितूचा हाक मारल्याचा आवाज येतोय जंगलातून. ती मला बोलावते आहे. तिला मदतीची गरज आहे ." इतक्यात राजेन्द्रही उठून आला. ," वीर कोणी हाक मारत नाहीये तुला भास झालाय. आम्हला काहीच ऐकू येत नाहीये." राजेंद्र त्याला समजावत म्हणाला. " अरे! ती सतत हाक मारतेय. तुम्हला कळत कसं नाही? " वीर वेडापिसा होऊन म्हणाला. त्याला समजावण्यात अर्थ नाही हे समजल्यावर तुषार म्हणाला," थांब ! मी टॉर्च घेऊन येतो आपण एकत्र जाऊ बघायला. तसंही आता जंगलात जाण्यात धोकाच आहे . एखादा प्राणी हल्ला करायचा. तरीही जाऊ आपण " असे बोलून राजेंद्रला सूचना देण्यासाठी तुषार वळला. तेवढ्यात वीर ," आलो! आलो !" असे ओरडत जंगलाच्या दिशेने पळाला. या दोघांना काय करावे ते सुचेना. मग राजेंद्र म्हणाला," तुषार तू झोप जरावेळ तू दमला आहेस. मी या दोन नावाड्यांना घेऊन जातो. वीर फार लांब गेला नसेल." तुषारने खूप समजावूनही राजेंद्रने त्याला आराम करायला सांगितले व तो दोन नावाड्यांना घेऊन जंगलाच्या दिशेने गेला. बराच वेळ शोधूनही त्यांना वीर आणि रितूचा ठावठिकाणा सापडला नाही निराश होऊन ते परत कॅम्पवर आले.  दुसऱ्या दिवशी उजाडताच परत सगळ्यांनी वीरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाऊलखुणांचा शोध घेत ते परत त्या मोकळ्या जागेवर येऊन पोहोचले जिथे त्यांना रितूची किंकाळी ऐकू आली होती. वीरच्या पावलांचे ठसे तिथपर्यंत येत होते. आणि त्या जागीच नाहीसे होत होते. तुषार आणि राजेंद्रने परस्पर सहमतीने मदत मागवण्याचा निर्णय घेतला कारण असेच जर लोक नाहीसे व्हायला लागले तर हे मिशन ताबडतोब थांबवणे भाग होते. २४ तासात दोन जण नाहीसे झाले होते. त्यांचा कोणताही मागमूस सापडत नव्हता. प्रोफेसर हे मानणार नाहीत यांची तुषारला खात्री होती. पण कोणाच्याही जीवाशी तो त्यांना खेळून देणार नव्हता. ती एका मोठ्या संकटाची सुरवात होती.

क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Thriller