Deepali Aradhye

Abstract Inspirational

2  

Deepali Aradhye

Abstract Inspirational

आपण

आपण

1 min
147


"आपण" - हा शब्द मला फार आवडतो. शांत, निवांत असताना या शब्दाबद्दल विचार करताना त्याचा अर्थ फारच विस्तारत गेला माझ्यासाठी. "आपण" - फक्त मी आणि माझा परिवार नाही केवळ. किंवा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक एवढंच हे वर्तुळ सीमित नाही. 


 "आपण" ही माझी वैश्विक भावनाही नाही.... पण, माझ्या विश्वाशी निश्चितच नाळ जोडलेली आहे. माझ्या विश्वात भावना आहेत, विचार आहेत, आचारांची मोकळीक आहे, मतभेद आहेत, भांडण आहे मात्र या सर्वांसाठी खुल्या मनाची, मनमोकळेपणाची विस्तृत जागा आहे... अतूट बंध, रेशीम बंध, अनुबंध, ऋणानुबंध, मर्मबंध आहेत.


भूतकाळ विसरायचं सामर्थ्य असेल तर भविष्याची सोनेरी स्वप्नं असतील आणि वर्तमान जगण्याचं भान. "आपण" - परीघ वाढवला की वर्तुळ विस्तारत जाईल!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract