STORYMIRROR

Deepali Aradhye

Others

2  

Deepali Aradhye

Others

पुस्तक माझ्या नजरेतून

पुस्तक माझ्या नजरेतून

2 mins
87

ती दोघं - डॉ. विजयावाड

 

कथा म्हटलं की कल्पनाविस्तार सोबत कधी वास्तवाची किनार आणि वाचक म्हणून आपण त्याचा करायचा स्वीकार. अशीच ही एक कथा! भारत, त्याची ओळख असणारी संस्कृती म्हणजे कुटुंब असणारच. भारतीय संस्कृतीची ओळखच मुळी भक्कम एकत्र कुटुंब पद्धती अशी आहे. आज जागतिकीकरण आणि इतर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने बदल झाले आहेत, जे स्वीकार्य आहेत तर अस्वीकार्य ही. परंतु ते असो.

 

ही कथा आहे एकत्र कुटुंबात असणाऱ्या तीन पिढ्यांची. राधिका-मोरेश्वर (आजीआजोबा), मंदाकिनी-यशवंत (आईवडील) आणि ज्ञानेश्वर-लिली (प्रेमीक आणि लग्नासाठी संमती मिळवण्यासाठी धडपड करणारं सर्वात आधुनिक म्हणण्यापेक्षा तरुण, सर्वात अलीकडच्या पिढीतील जोडपं). ज्ञानेश्वरच्या घरून आता लग्नाला संमती मिळाली आहे म्हणून ज्ञानेश्वरच्या घरातील प्रत्येक पिढी एकत्र प्रवासाला निघाली आहे.

 

ज्ञानेश्वर-लिली, जगाचं भान विसरून मर्यादेत का असेना परंतु आपल्या प्रेमात अडकलेले आहेत. स्वत:पुरतं का असेना पण विविध प्रकारे आनंद व्यक्त करताना प्रेमही व्यक्त होत आहे. लिली विसरून जाते की सासू-सासरे आणि आजेसासूबाई-आजेसासरे सोबत आहेत आणि ज्ञानेश्वर ही विसरतो. परंतु बाकीचे मात्र त्यांच्याकडे बघत आपापल्या वेळी काय घडलं आणि आता काय घडत आहे त्याची संगती लावण्याचा प्रयत्न करत आपापल्या जोडीदाराशी संवाद साधत आहेत.


परंतु, लिली काय, मंदाकिनी काय किंवा राधिकाबाई काय - सर्वानुमते एक गोष्ट मात्र नक्की की मोरेश्वरराव म्हणजे आजोबांनी पुढाकार घेतला नसता, संमती दिली नसती, ज्ञानेश्वर-लिलीची मैत्री-नातं उचलून धरलं नसतं तर..? तर बाकी इतर सगळ्यांकडून या लग्नाला परवानगीच मिळाली नसती आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे दोघांचा धर्म. आणि स्वतःचा धर्म बदलण्यास लिलीचा असलेला ठाम नकार (बघा हं मंडळी ठाम नकार, विरोध नाही म्हणजे विचारांची स्पष्टता). ज्याला आजोबांनी पूर्णपणे सहमती दर्शविलेली आहे.


घरातील सगळ्यांनाच आश्चर्यात पाडणारा हा निर्णय आजोबा म्हणजे मोरेश्वर का घेतात याचं रहस्य उलगडतं ते नेरळ स्टेशनला उतरल्यावर आणि त्यातही निर्णयमागचं कारण कळाल्यानंतर राधिकाबाईंची स्पष्ट आणि ठाम भूमिका एक वेगळाच दृष्टिकोन देऊन जाते - 'तारुण्य असतं उपभोग घेण्यासाठी, अधिकार गाजवण्यासाठी-गाजवून घेण्यासाठी तर म्हातारपण असतं समजून घेण्यासाठी' - असं सुंदर वाक्य कथेत येऊन साऱ्या कथेला आपल्यात सामावून घेतं.

 नक्की वाचावीच अशी कथा - "तीदोघं"!


Rate this content
Log in