STORYMIRROR

Deepali Aradhye

Others

2  

Deepali Aradhye

Others

अंतरंग

अंतरंग

1 min
110

प्रत्येकाचं एक अंतरंग असतं.... विविधतेने नटलेलं.... सहवासातून थोडं थोडं उलगडतं.... परंतु असा कोणताही खास दरवाजा अथवा किल्ली आजही कोणाकडे नाही, ज्यायोगे.... या आपल्या माणसाच्या अंतरंगाची सफर करता येईल.... मनसोक्त.... आणि समजून घेता येतील.... तिथल्या उलाढाली.... उलथापालथ.... विविध कंगोरे.... अनेकानेक विश्लेषण.... आणि कदाचित अजुन बरंच काही.... खोलवर रुजलेलं.... वसलेलं.... अंत:करण.... आणि म्हणूनच समर्पक शब्द, उत्तर, प्रश्न, प्रतिक्रिया नसतात.... भूमिका समजत नाही.... उत्कटता अनुभवता येत नाही.... एकमेकांची भूमिका जगता येत नाही.... आणि सूर बेसुरतेकडे वळायला लागतो.... आणि आपल्याच प्रत्येक जाणीवेचा फोलपणा आपला आपल्यालाच कळायला लागतो.... मग विशिष्ठ अशी भूमिकाच शिल्लक राहत नाही.... आयुष्याच्या कधीतरी लक्षात येतं की, अरे! नाही जगता येत दुसऱ्याची भूमिका.... कधी-कधी उमजही नाही पडत.... पण मोडता घालण्यापेक्षा चार पावलं माघार घेण उत्तम....


 कारण, आपण कोणत्याही भूमिकेत नसतोच आणि मग शिलकेत उरते.... ती प्रगल्भता, परिपक्वता, मनाची निरामय शांतता.... वसलेली असते.... आपल्यातच दडून.... अवकाश असतो फक्त भूमिकारहित होण्याचा, फक्त नि फक्त.... भूमिका सोडण्याचा..!


Rate this content
Log in