लघुलेख
लघुलेख
#असं ही भावलेलं
सरसरून आलेली सर अंगावर झेलत ती दोघंही तिचा मनापासून आनंद लुटत होती... पण वेगवेगळ्या ठिकाणी... कशी कोण जाणे... पण दोघांनाही... अचानक झाली जाणीव... हृदयाची गोड तार... हळुवार झंकारली आहे... अगदी कळत नकळत... ही गोड संवेदनेची... हलकी भावना... आनंदात आणि भरच घालत होती... आणि पुन्हा एकदा... आपल्याच आनंदात... रमून जात... दोघेही आपापला मार्ग... क्रमित असतानाच... आले की ते वळण... जिथे ठरवून ठेवल्याप्रमाणे... दोघेही नेमक्या एकाच... स्पॉट ला... मन हरखून थांबले... निसर्गाचं... लुसलुशीत हिरवं... कोवळ्या उन्हातलं... रिमझिमणाऱ्या पावसातलं... सोनेरी रूप... नि:स्तब्धपणे... केवळ व्याकुळ लोचनांनी... हृदयाच्या अंतर्यामी... खोल-खोल गाभ्यात साठवून ठेवतानाचा... दोघांचाही आनंद... अगदी लोभसवाणा... मंत्रामुग्धावस्थेत... एकमेकांची बोटं... कधी एकमेकात गुरफटली... त्यांना भानही नव्हतं... हळूच मग त्यांच्या... मनातील भावनांना... शब्दांचे धुमारे फुटू लागले... समोर दिसणाऱ्या... छोट्याशा झऱ्यासारख्या... कविताही उमलू लागल्या... निसर्गाचा आस्वाद घेतानाच... एकमेकांच्या भावनांचा... शब्दांचा... कवितांचाही.... अनुभव घेतानाचा... उन्माद घेत... त्यांनी हळूच बघितले... दाद दिली... आणि पुन्हा... वाटा... आपापल्या... चालायला सुरुवात केली...

