आणि शिवबा बोलले
आणि शिवबा बोलले
"मी माझ्या मुलानां
न्याय मिळावा ,नोकरी मिळावी ,आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे ..
मायबाप सरकारने आता तरी आम्हाला आरक्षण द्याव.."
देवा जवळ मायची चिठ्ठी बघुन दुर्गा पळतच विहिरी कडे गेली ..पण ..
पण ..तोवर जिजाच्या साडीचा पदर पाण्यावर तरंगत होता.
गेले कित्येक दिवस टि.व्हि. ,पेपर ,मोबाईल आणि गाव, घर सर्वच ठिकाणी अश्याच घटनानं बद्दल बोलल जात होत. तेच आता आपल्या वाट्याला आल.
दुर्गा मटकन विहिरीच्या पायरीवर डोक्याला हात लाऊन बसली.
आक्रोश तरी करून कोणाला हाक मारावी ??बाप असाच शेतातल्या झाडाले लटकून मेला ,गेला.
भाऊ उपोशनाले बसला आई अन मी घरी राहून शेतात कही तरी करून थोड फार मिळवायचा प्रयत्न करत होतो .त..
थोड्या येळानं मैना आजी भाजी माग्याले आली ,ते रोजच येई ..माय तिले काय रांधल असन ते वाढूून दे ..बुढीले तेवढच काय ते खायाले मिये.
मैना आजी "दुर्गी !ओ माय अस अंधाराच इहिरी जोय बसु नई.चाल चाल घरात चाल ,तुही आई कुड हाये ,आज सयपाक न्हाई केला का ??घरात बी उजेड न्हाई तो ."
दुर्गा ,"न्हाई .."
मैना आजी ,"काय न्हाई..?"
दुर्गा,"सयपाक केला न्हाई ."
मैना आजी ,"काऊन माय ??जिजा कुड हाये ??"
दुर्गा ,"इहिरीत !!"
मैना आजी ,"काय?"
दुर्गा अगदी शांतपणे विहिरी कडे इशारा करते .मैना आजी ओरडत ,"जिजा ये जिजा ,काय केल माय हे ,लेकर पोरकी करून गेली ..आता लेकरायले बाप बी न्हाई न माय बी न्हाई ..जिजा ओ जिजा.."
आजीचा आवाज ऐकुन वाडीतल्या आजुबाजुच्या काही बायका तिथे येतात..
मग रडारड , आक्रोश !!
काही हि असल तरी मरणोत्तर सोपस्कार समाज करून टाकतोच तसे ते सर्वानीं मिळून केले.
दुर्गाच्या डोळ्यांनी रडायच जणू नाकारलच..
सगळी मंडळी जिकडे तिकडे झाल्यावर मैना आजी तिच्या सोबतिला थांबली ..
दुर्गा आढ्या कडे नजर लाऊन झोपेची वाट पाहत होती ..
तोच तिला शिव स्मारक भेटी दरम्यान ,छत्रपती शिवरायांच्या तोंडुन निघालेले शब्द आठवतात..
" मी नसलो तरी हे स्वराज्य तुम्हा मावळ्यानां सांभाळायच . आपला समाज ,आपले बांधव यांचे रक्षण करायचे आहे.शोषित वंचितांच्या पाठिशी उभ रहायच आहे .तुम्हालाच आता रयतेच रक्षण करायच आहे....अस बरच काही.
याच आठवणित दुर्गाचा डोळा लागतो .ति जणू शिवरायांच्या स्मरणातच झोपी जाते.
आणि ..
प्रत्यक्ष छत्रपती समोर ..
"दुर्गा बाळा ..अशी हतबल होऊ नकोस. तुला अस हारमाणून चालायच नाही.."
दुर्गा ,"महाराज ! महाराज !!
तुम्ही !!साक्षात !!
तुम्ही.."
छत्रपती ," हो ,हो ! आम्हीच ."
दुर्गा ,"महाराज मी काय कराव अस तुम्हाला वाटत?"
महाराज ,"अग मि ही तुझ्या सारखाच हे सगळ बघुन निरूत्तर झालोय ,खरच मराठा विरांनी अस मैदान सोडुन मरण पत्कराव तेही या स्वत:ला 'सरकार ' म्हणवणा-या भ्रष्ट आणि खोटी वचन देणा-या लोकांच्यात बदल व्हावा म्हणून ?हे कसले कुणाला काही देऊ शकतात ,नुसते निवडणुकां मधले जाहिरनामे !!तेवढच..आणि या लोकांच्या मत परिवर्तनासाठी हि अशी माणस मरण कवटाळतायेत ,आधिच तिघळ लावलेल आभाळ त्यात ऐवढे मोठे आधार काढुन घ्यायचे ,लेकरांना अनाथ करायच.खरच तुम्हाला मिळालही आरक्षण तर ही माणस परत का मिळणार आहेत ?"
दुर्गा ,"हो महाराज ,मी वयान लहान असली तरी माझ ही हेच म्हणनं आहे .पण आपला हक्क मिळवण्या साठी अजुन कुठली लढाई लढायची ?"
महाराज ,"अग क्षत्रीय आपण ,अंगात दहा हत्तींच बळ !! शेतात राबुन नाही मिळाल ,पण बुध्दीमत्तेच्या जोरावर मिळवता येईल ..पण अस भिक मागुन नाही.उद्या अजुन कुठल्या समाजाला वाटेल या आरक्षणा मुळे त्यांच्यावर अन्याय होतोय ,मग तेही पेटुन ऊठतिल .पण हे आरक्षणाच देणं कुठवर आणि कुणा कुणाला पुरणार आहे ?
त्या पेक्षा बुध्दी ,पात्रता आणि गरज .या गोष्टी लक्षात घेऊन त्या त्या व्यक्तिला तेते काम मिळायला हव .मग तो कुठल्याही समाजाचा असो..ज्यानां हे मिळालय पण आता तशी गरज उरली नाही त्यांनी ते स्विकारू नये .मोठ्या मोठ्या तिजो-या आता सर्वांसाठी खुल्या व्हाव्यात ,रोजगार देण्या साठी..
ऐका घरात ऐक भाऊ खुप श्रीमंत मग त्यानं दुस-याला नको का हात द्यायला मोठ होण्या साठी.स्वार्थ आता पुरे ! म्हणत सर्वांना सोबत घेऊन हे स्वराज्य कुटुंब चालवावे .ऐवढच.."
तेवढ्यात बाहेर परत कुणि तरी विहिरीत ऊडी मारल्याचा आवाज ..