saru pawar

Tragedy Children

3  

saru pawar

Tragedy Children

फडताडावरची पेटी ...

फडताडावरची पेटी ...

2 mins
158


   चानी आज शाळेतुन तोंड फुगऊनच आली. पाय आपटत आत येऊन दप्तर फेकून खाटीवर तोंड खुपसुन रडायला लागली .                  यमुना बाई ,चानीची आजी . आज स्वारीच काहीतरी बिनसल हे जाणून नाती जवळ गेली .             "काय झाल माय आमची चानी काऊन रडुन रायली?कुन रडवल आमच्या पाखराले .ये चानू बोल माय बोल." चानीच्या डोक्यावरून हात फिरवत आजी नातीला रडायच कारण विचारच होती.            चानी,"आज्जे आपल्या घरी पेटी न्हाई व ! ते कुट्टी मले म्हनत व्हती तिच्या घरी मोठ्ठी पेटी हाय ताल्या वाली .त्याच्यात त्यायचे लय नवे नवे कपडे अन तिले तिच्या वाढदिसाले भेटली व्हती ति खेळणी ,जत्रेतुन आणल व्हते ते कानातले अन तोरड्या हायत.आपल्या घरी त काहीच न्हाई ना आज्जी . आपल्या घरी त संमद गाठोड्यात बांधुन ठेवता .आपल्याले बी ऐक पेटी आन आज्जे ,आनशिन ना ?"

    छोट्या लेकरांच मनच ते ,कुठे दुखेल काय सांगाव आणि इथे तर झोपडीत भाकरीचा चंद्र महाग मग पेट्या बिट्याचें ते काय ?जिथे अंग झाकायच्या कपड्यांची मारामार तिथे ठेवणितले कपडे ?         पण यमुनेला चानीच दु:ख कळत होत म्हणून तिनं चानीला ,"हाव आनु हं ,त्याच्यात काय ?आमची चानी म्हनल तस्स व्हईन .आपुन बी आनु पेटी .मग तु तुह्य सामान ठेवजो त्याच्यात हं ,पण आता ऊठ अन जिऊन घे ,तुही माय पावभाजी ठिऊन गेली ,त्या पाटील मावशीच्या लेकिचा बडडे व्हता त्यायन देल्ली अन केक बी हाये ,तुले आवडतो ना .चाल चाल ऊठ"

    चानी पावभाजी अन केकच नाव ऐकुन ऊठली अन पटकन खायलाही बसली.          

 तृप्तीची ढेकर देत चानीनं वर हात करून देवाचे धन्यवाद केले आणि तिची नजर फडताडावर ठेवलेल्या काळ्या कुलुप असलेल्या पेटीवर पडली .

   चानीला जणू देवानच ति दिली तिच्या प्रार्थनेत. चानी वर बघत उड्या मारायला लागली..       टाळ्या पिटत ,"आपल्या कड बी हाय पेटी ,ताल्या वाली ,मोठी मोठी.

आज्जे हे काय ? तु हेच मले देनार व्हती ना ?काढ ना आज्जे खाली पेटी मग अपुनबी ठेऊ याच्यात कपडबिपडे ,हा ,बोल ना आज्जे "

  यमुना आज्जी लेकराच्या आनंदान हरकुन गेली. चानीला जणू खजिनाच मिळाला .

 चानी परत आजीच लक्ष आपल्या कडे वेधन्याचा प्रयत्न करत तिचा पदर ओढून ओरडतच होती .

  यमुना भूतकाळात गेली या पेटीत तिच्या ल्योकाच समान होत जो सिमेवर लढतानां शहिद झाला होता.   त्याच्या आठवणींनच्या खजिन्याची जागा चानीचा आनंद घेऊ पाहत होता        


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy