saru pawar

Tragedy Others

4.0  

saru pawar

Tragedy Others

अपराध माझा असा काय झाला?

अपराध माझा असा काय झाला?

4 mins
178


    "सांगा ना, अस काय चुकलय माझ ?सांगा !आज पाच महिने झालेत ,इतकी काय घोडचुक झालीय कि ऐक शब्द माझ्याशी बोलायचा नाहीय,

माझी जागा तरी काय आहे तुमच्या आयुष्यात ,स्वयंपाकिण ??मग ते तर बाई लाऊनही करता येईल की ,लोकानां दाखवाय साठी ,समाजा साठी मला का शिक्षा देताय ,कराना मोकळ आणि तुम्ही हि व्हा, अहो ,बैठकित बसुन तर इतरानां सल्ले देता ,'मागच विसरून पुढे जायच काहि धरून नाही ठेवायच ,माफ करून टाकायच ,आपल्याला सोबत काम करायच मग अस करून कस चालेल 'हे हे तुम्हीच तर संगता ना तुमच्या विरूध्द वागलेले ते ही तुमच्या सोबत मिरवतायत ,मग मग मी का नाही ,माझा गुन्हा अक्षम्य ??ऐका घरात राहुन हे अस ! बोला बोला ना.  तुमच्या चुका चुका नाहीत ,ते इतरांनी विसरायच पण तुम्ही नाही हो ना ,तुम्ही कोण तुम्ही कोण The great Koushal Joshi "

"आदी ,आता तु इथेच थांब त्यांना वाढायला ,नाही तर यानांच घेऊन जा सोबत किंवा मिच येते ,असतरी माझी काही गरज नाहीचय इथे ."

     सावी हुंदके देत ,चिडून ,त्रागा करत ,कौशलच्या पुढे जाऊन जाऊन बडबडत होती ,तरी तो ऐकही शब्द न बोलता पायात चपला अडकऊन दार उघडून बाहेर पडला ,थोड्या वेळात गाडीचा आवाज आला .

   आता आदी ,"जा तुला बागेत जायचय का, लिहायचय का ?जेवाटेल ते कर ते पोळ्याबिळ्या सोड जा नंतर कर ."

सावी "अरे खर सांग ,त्यांचा इगो हर्ट होऊ नये म्हणून मिच पुढे पुढे करते ,मग ताट वाढते ,हव नको ते विचारते ,माहितीय ते लागेल तेव्हा तेव्हा ते पुढ्यात नेऊन ठेवते ,मग त्याचही हो ,नाही ऐवढही उत्तर देऊ नये इतक ?इतक काय झालय ?"

आदी"खरच तुला नाही माहिती काय झालय? जरा विचार कर .."

सावी ,"अरे खरच तुमच्याशी त्यांनी बोलल पाहिजे हे च सांगत होते त्या दिवशी नंतर तर काहिच नाही ,मला तरी नाही आठवतय ,पण काहीही असेल तरी इतके दिवस ?महिने ..अस काय ना ?"

"अरे माझी चुक असली की मी मागतेच ना माफी ,पण आता तर कळतच नाहीय काय चुकल ते . पण मी करतेच ना पुढे पुढे ,काही सांगितल ,निरोप दिला तरी काहीच रिप्लाय ,रियाक्शन नाही .हेच मी जर बाहेरून आवाज आला कि "पाणी दे ,चहा कर ,याला रिप्लाय नाही दिला तर ,तर सांग ,हो तेही आहेच की लोकानां वाटेल साध बाहेरून आलेल्या माणसाला चहापाणी करता येत नाही ,शेवटी त्यांच काहीच अडत नाही आपलच ते काय.."

"अरे वाईट याच वाटत कि नवरा बायको हे नात ऐकमेकांचा आधार ,तेव्हा नाही का ते सारखे ,"नटसम्राट" पिक्चर मधले सीन शेअर करत होते गृपवर ,कसे नवराबायकोच ऐकमेकांचे सोबती ,मुलं कसे स्वार्थी वगैरे दाखवणारे पण आता काय ? काय नक्की यांच मत ,विचार आणि विश्वास,"

ति बडबडत ,डोळ्यातुन अखंड वाहणा-या अश्रूधारा पुसत पोळ्या लाटत राहते, अख्खा दिवस तिचा स्वत:शिच चाललेला संवाद ,द्वंद्व,कधि त्याच चुकतच असा सुर तर केव्हा असु दे , तु का त्रास करून घेतेस सोड ना ,तु आपली कर्तव्ये पार पाडलिस ,पाडतेयस ,सोड सोड .तरी परत काही क्षणातच ऐखादा हुंदका ऐतो ,वाटत घाय मोकलुन रडून घ्याव ,जोरात ,कुणाला तरी घट्ट मिठी मारावी आणि सगळ कस मोकळ मोकळ ,हलक व्हाव ...

   पण आत्ता घरात तिच्या पेक्षा मोठा तर तोच खरतर त्याच्याच मिठीत जाऊन मन मोकळ होई पर्यंत ति रडलिय ,काहीही कारण नसतांना ,खुप ! न थांबता ,तेव्हा त्यानच तर कुठलाही प्रश्न न विचारता तिला घट्ट मिठीत घेऊन ,हळुवार थोपटत शांत केलय.

 आज ही तिला अस त्यान जवळ घेतल तर...

त्याला तिच मन कळत असेल ? भावना ,आत्ता तिची मनाची गरज. शरिराची नाही तशी पण फक्त स्पर्श ! तो हि आधाराचा ,त्याच्या शिवाय कुठे ??

     यातच दिवस सरला ,विचार ,भावनाआवेग ,रडणं आणि सोबत सारी बाग साफ झाली ,हो हे तिच मनाच्या निच-यासाठी आवडत ठिकाण ,कुणाकडे जायला नको न काही सांगायला नको ,झाडं, ति ,पक्षी आणि असंख्य जीवं ,ज्यांच निरिक्षण करायला तिला खुप आवडायच.....

      परत सकाळ ! दुसरा दिवस ,नित्याची काम सुरू असतानां आदि आला ,तिच्या पुढ्यात ऐऊन छानस हसु आणुन तिला मोबाईलवरचा रिझल्ट दाखवत म्हटला ,"हे बघ रिझल्ट आला ,सगळे क्लियर आणि 80%"

सावी ,"हुश्श !!ऐकदाच झाल ,कस वाटतय ?मोकळ मोकळ .."

सावीला आनंद कसा व्यक्त करावा कळत नव्हत ,या क्षणा साठी तिन बरेच प्रयत्न केले ,मनाची घालमेल सहन करत ,घर सोडून त्याच्या सोबत वर्ष भर राहीली ,दर आठवड्याला घरी ये जा ,नात्यातल्या माणसांच घर ,नको वाटणारे उपकार ,कधि टोमणे ,कि ति पुण्यात मज्जा करतेय ,ऊनाडक्या आणि काय?काय? हे सगळ आठऊन परत डोळ्यात पाणी ..

तिन त्याला हातान ,नजरेन इशारा करत, रिझल्ट पप्पानां दाखवायला सांगितला .

  कौशलनं अभिनंदन केल त्याच ,कौतुक तर खुपच, ,"मला कधिच इतके मार्क मिळाले नाही आयुष्यात ,वा ,मस्त "

लगेच नातेवाईक आणि मित्रानां फोन ...लेकाच भरभरून कौतुक ..

संध्याकाळी कौशलचा मित्र आणि त्याची बायको आली ,"अभिनंदन आदी ,वहिनी तुमच पण विशेष अभिनंदन ,त्याची तर आहेच मेहनत पण त्याच्या यशात तुमचा महत्वाचा वाटा ."

सुवर्णा,मित्राची बायको आत, किचन मधे आली ,तिन सावीच अभिनंदन केल ,तिच्या खांद्यावर हात ठेवत ,"अखेर मिळाल तुझ्या मेहनतिला ,त्रासाला यश !"

तशी सावी तिच्या गळ्यात पडत परत रडली ,खुप खुप हुंदके दाबत कघि न दाबताही ,मुसमुसुन रडली ,का? 

   अस तिला कौशलन म्हणायला हव होत ,त्याच्या सोबत तर हे यश वाटायच ,सेलिब्रेट करायच होत.

पण ..

अजुनही तो गप्पच ,तिच्या गुन्ह्यां बद्दल वाच्यता न करता तिला शिक्षा देत ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy