saru pawar

Tragedy

3  

saru pawar

Tragedy

अखेर कळले

अखेर कळले

3 mins
199


   आज परत तो पिऊन आला आणि मुलांच्या गुणांनच कौतुक करत ,"तुम्हीच माझे हिरे ,तुमच्या साठी काहीही करेन ..फक्त ऐकच प्राँब्लेम आहे "       कोप-यात बसलेल्या तिच्या कडे इशारा करत तो बरळला .तिच्याही ते लक्षात आल. पण असो माझ्या नाहि पण मुलांच्या तर हा जवळ गेला आणि पुढेही राहिल कदाचित या विश्वासानं तिला हायस वाटल.          

यातले काही शब्द तिला आधि मुलां साठी ऐकावे लागत ,"काय कराव यांच ऐक असा तर दुसरा तसा, या वयात मुलं कमावती होतात पण आपल्यालाच अजुन यानां पोसाव लागत " वगैरे वगैरेअसे प्रसंग घरात येतच राहीले कधि ति तर कधि मुलं ब्लँकलिस्टेड ..                        

पण या वेळी गेले पाच सहा महिने तिच आरेपिच्या  पिंज-यात !!                            

तिला त्या दिवशीची दुपार आठवली . तो आज दुपारीच पिऊन आला आणि ,"वैतागलोय या पोरांच्या वागण्याला कुठवर पुरेन मी ,----च्यानां सगळ आयत पुरवतो पण हे मातलेत ---बस झाल आता काही तरी केलच पाहिजे."

तिनं आज ठरवलच नेहमिच काय ऐकायच, ऐकदाच मुलं आणि यानं परस्परात ठरवाव काय ते मुलं वेगळ बोलतात नि हा वेगळ .आज बोलायचच .        

ति ,"अहो तुम्ही बोलानां ऐकदा मुलांशी त्यानां काय हवय ?काय करायचय ते . सारख तिही माझ्या जवळ करूकुरतात नि तुमच हे अस . तुम्ही मोकळे पणानी बोला तर"                             

तो ,"ह: तुझ आपल काही तरीच ,आमचे वडिल कुठे आमच्याशी बोलायचे अस काही ,आम्ही कसे घडलो ,तु रिकामच त्यांना पाठिशी घालते ,तुझ्याच मुळे आज हे समोर आलय.आईनच वळन लावायच असत .मगच मुलं बिगडत नाहीत .पण तुमच तर लक्ष दुसरी कडेच मुलां कडे लक्ष द्यायला वेळ तर पाहिजे ना ?"        

आता तिच परत डोक फिरल .मेल सगळ करून पण शेवटी मुलांच्या वागण्याचे बोल तिलाच . का म्हणून ऐकुन घ्यायच मी म्हणून ति परत बोललिच," अच्छा म्हणजे परत माझ्यावरच का ? मी काहि सांगू पाहत होती तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला असता तर पण तेव्हाही माझ्यावरच संशय आणि आता परत हे असच." 

आत्ता त्याच्या चुकांवर बोट ! त्याच्या जिव्हारी लागलं. आणि आठ ,पंधरा दिवसात सुटणारा अबोला सहा महिने पुरतोय.                             

हाच माणुस मी गावाला जायला निघाली की कासाविस व्हायचा.गेले वर्षभर ति लेका साठी जा ये करत होती. पण दर आठवड्याला तिची आतुरतेने वाट पाहणं ,ति नसतानां घर कस ओस पडत याची कबुली देणं आणि तिच्या शिवाय तो ऐकटा पडतो अस सार सार तो बोलुन जायचा .                    

कधि विरहाची दर्दभरी गाणी तिला पाठवत व्यक्त व्हायचा तर कधी नटसम्राट मधले डायलाँग तिला ऐकवत शेवटी नवरा बायकोच कसे ऐकमेकां साठी ..   आज ते आठऊन तिला वाटल हा खरचच तोच का? 

पण आज मुलांच पारड जड होत .मुलांनी शेवटी स्वत:ला सिध्द केल होत .अगदी त्याला हव तस ! मग काय ? आज बाप म्हणून तो खुप खुश होता आणि मुलाच्या याशावर अभिमानी ही होता.               

मग आत्ता तिच्या वर्षभराच्या कष्टांची जाणिव कुठे ?

लेकाच पाऊल वाकड पडल आणि त्याला अखेर मानसिक आजार जडले . मग शिक्षण तर पूर्ण करायला हवच म्हणून ति अगदी लहान लेकराच्या वर्गा बाहेर बसाव तस त्याच्या सोबत सावली होऊन भटकली .डाँक्टर कडे माय म्हणून तिच सोबत . तर कधि मित्र म्हणून .कधि त्याचा सगळा राग तिनं सहन केला अगदी ,"मला वाटत कधि कधि तुलाच मारून टाकाव ." अस ही ऐकल .                     

पण आईला मुलांच भल करायच असत आणि त्यांच भल झालेलही बघायच असत मग जशी ति बांळतपणाच्या वेणा सहन करते तसच त्यांनी लावलेले बोल ,मनावरचे आघातही.                      

अखेर तिच्या कष्टांच चिज झालं ,त्यानही साथ दिली .                              

त्या दिवशी त्यानं, तिचा हात पकडून म्हणाव कि ,"तुझ्या मुळे हे क्षण आलेत " अस तिला वाटत होत .डोळे न थांबता वाहत होते पण तो निष्ठुर होऊन बघत होता.आज तर ति दुधातल्या माशी सारखी बाहेर काढून फेकली गेली .मुलं आणि बाप ऐकत्र आणि ती परकी ,वेगळी ,ऐकटी.                             

आज तिला अखेर कळलच कि ती फक्त ऐक केअर टेकर ..एवढीच काय तिची घरातली जागा.

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy