आनंद गगनात माईना जी माईना
आनंद गगनात माईना जी माईना
"आनंद गगनात म्हाया माईना जी माईना .माईना जी माईना..!" विठू तल्लिन होऊन मंदिच्या पाय-या झाडत होता. चित्रा माई रोज सारख्याच पहाटे काकड्या साठी मंदिरात आल्या आणि विठूला आनंदात गुणगुणतानां बघुन ,"काय माऊली ?कसला खजाना गवसला रे ..विठुला माऊली भेटली की काय?"
विठू ,"माई ती तर केव्हाच भेटली ,मंदिरात सेवा द्यायला लागलो ....आणि त्या आनंदात माऊली सोबतच असल्या सारख वाटत ..भरलेल आणि हलक हलक पण ..पंढरपुरला दर्शन झाल्यावर वारक-यला होत तसाच अनुभव रोजचाच..."
माई ,"अरे मग आज काय बाबा नविन.."
विठू ,"माई मी मंदिरात कसा आलो.किती वर्ष झालेत इथे राहतो यातल काहिच मला आठवत नाही.
पण मंजुळा आई नि श्रीधर पंतानी सांभाळल ,मंदिरात येणा-या प्रत्येकानं माझ पालकत्व घेतल.कपडालत्ता ,शाळा ,पुस्तक ,आजारपण ,सण तुम्ही सगळ्यांनी केलेत.माझ्या जन्मदात्यांचा शोध कधी घ्यावासा वाटला नाही आणि इतरही कुणी मला तस बोलल नाही.पण काल अचानक मंदिराच्या पत्त्यावर ऐक पत्र आल ..
माऊली नमस्कार..
बारा वर्षा पूर्वी मी माझ्या लेकाला तुमच्या चरणांवर ठेऊन गेलो होतो.खुप भटकलो .खरतर सन्यास्याच जीवन जगत होतो ,कधी काशी ,कधी वृदांवन तर कधि केदारनाथाच्या कुशीत .स्वत:चा शोध कि अजुन काही ??
पण मागच्या महिन्यात गंगेच्या तिरावर स्नान करून बाहेर पडलो तर ऐक जटाधारी अंगावर ओरडला ."जा जा वापीस जा .तु ऐसे अपने कर्मो से भाग नही सकता. अपना दायित्व निभा ,जो इस जनम का है उसे झोड के भागेगा तो कभी मुक्ती नही मिलेगीं नाही उसको पा - सकेगा.लौट जा पगले ,लौटजा ,अपनी संतान को बडा कर फिर शायद तेरे हिसाब किताब चुकतू होगें और अगले जनम मे तुम हमारे साथ आके मुक्ती के मार्ग पर चलना.."
या आकाशवाणी नंतर मी परतिच्या वाटेवर निघालोय, पांडूरंगा ,"माझी अमानत सांभाळलियस ना ??तेवढी माझ्या स्वाधिन कर ."
श्रीधर पंतानी हे वाचुन मला सांगितल की माझे वडिल मला घ्यायला येताय.पांडुरंगाची लिला.म्हणून आपल त्याच्या सोबत आनंद वाटतोय ऐवढच."
चित्रा माईचाही चेहरा खुलला ,"तुच कर्ता आणि करविता ,तुला कुणाचा नाही हेवा .."
म्हणत माईनीं ताटातली काकड्याची बेल वात पेटवली..
