saru pawar

Tragedy Others

3  

saru pawar

Tragedy Others

म्हणून कदाचित

म्हणून कदाचित

2 mins
159


"तिला ऐकटीनं कुठेच जायची सवय नाही ग. तिनं कधी बाजारात जायला हातात साधी पिशवी घेतली नाही, कि कधी मुलांची शाळा ,नातेवाईकां कडे ऐकटी गेली नाही."सुनिता आरतीशी मनिषा बद्दल बोलत होती .पकंज मनिषाचा नवरा अचानक अटँकन गेला आणि त्याच्याच आठवणींनचा पसारा मनिषाच्या डोळ्यातुन घळाघळा वाहत होता.

 आत्ताच्या तिन - चार घटना अश्याच. ज्यात निरव्यसनी आणि बायकामुलानां भरपूर वेळ देणारा ,त्यांचे हट्ट पुरवणारा ,त्यांना हवा तेव्हा सोबत असणारा नवरा /बाबा गेला.

सिता हे सगळ ऐकत होती ,त्यांच्या बोलण्यातुन दु:ख तर व्यक्त होत होत पण कस त्याच्या वाचुन पान हलत नव्हत आणि आत्ता काय ?? 

तर अचानक बोटधरून चालवणा-यानं आपल बोट भर जत्रेत सोडून अचानक नाहीस व्हाव !

 अस काही तरी.

गेलेल्या माणसा शिवाय आत्ता कस ??तो गेल्याच दु:ख तर होतच पण व्यवहाराची काळजी अधिक अस.

सिता या बाबतित म्हटल तर लकी किंवा अनलकी पण..

म्हणजे काय तर या सितेचा वनवास राम सोबत शरिरानं असला तरी आहेच लग्न झाल्याच्या काहीच वर्षां पासनं.

पोरानां जस कुठल संपूर्ण कुटुंब सोबत बाहेर पाहुन वाटायच कि ही खरी #Happy family ..आणि या उलट आपली सगळ असुन पण जरा #अजिब फँमिली.ज्यात बाबा नावा शिवाय आणि धाका शिवाय कुठेच अस्तित्वात नसतो आणि जेव्हा ति मुलांना बापाची सो काँल्ड सामाजिक जबाबदारी वगैरे सांगते तेव्हाच आत तिही हेच प्रश्न स्वत:ला विचारत असतेच कि ..

    जर मित्रांचे ,स्वत:चे वाढदिवस ,सहजच #बसु म्हणत संपलेला अख्खा दिवस आणि ऐरवी मला वेळच नाही म्हणनारा नवरा जेव्हा आठ दिवस कसलही प्लँनिंग नसतानां मित्रांनी आग्रह केला म्हणून फिरायला जातो तेव्हा पडणारे असंख्य प्रश्न ...याच उत्तर ति गेले कित्येक दिवस ! ...नाही ! कदाचित कित्येक वर्ष शोधतेय.

पण या दु:खाचा आज तिनं नव्याने सुख असा अर्थ लावला कि बरचय या बापुड्यानां आता मजधार में छोडे गऐ ! अस काहीस वाटतय.पण मी तर आधिच ऐकटी ! त्याची बोट , त्याचा संसार आणि मुलं घेऊन वल्हवत नेतेय .So I am prepair ! already to leave alone ..

 खरच माझ्याच नव-याच माझ्यावर जास्तच प्रेम ! म्हणून तर आज भरवसा नसलेला मृत्यू कधि ऐकमेकानां दुर घेऊन जाईल ,निराधार करेल या जाणिवेनं त्यानं मला ऐकटीच मी सगळ सांभाळू शकते या साठी ट्रेनच केलयकी ...



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy