saru pawar

Inspirational Children

3  

saru pawar

Inspirational Children

असे पेरावे ते ऋण..

असे पेरावे ते ऋण..

3 mins
226


 अंगाई गाणारी सुवर्णा ,झोळित झोपलेल बाळ आणि मागच्या अंगणात ऊखळात मिरची कांडणारी सगुना सगळे ऐका लईत जणू सवाद्य नाचत, गात होते. अंगाईचे सुर त्याला सगुनेचा ताल नि यावर हळुवार मागे पुढे होणारी झोळी ..उन्हाळ्यातल्या रखरखीत दुपारीही हे दृष्य कान आणि डोळ्यानां गारवा देणारे.

    तेवढ्यात सुया पोत विकणारी चिंधी बाई थिगळांच लुगड काखेत लेकरू आणि डोक्यावर धाग्यांच्या नक्षीनं विणवेल गोठोड घेऊन अंगणात अवतरली.

आधिच घरात वावर असलेली तिन्हीं माणसं आपापल्या कर्मात तल्लीन तेव्हा चिंधीच येणं त्यांना काही कळलच नाही .

  चिंधीनं गाठोड खाली टेकवलं आणि कडेवरच लेकरू पणं.तेवढ्यात ते लागल रडायला मग चिंधीन जे करायच ते त्याच्या रडण्यानं केल ,त्याच्या आवाजानं भोवतालच संगित बदलल.

   झोपलेल बाळं पण रडायचा येणार आवाज सुवर्णा आणि सगुणेच लक्ष पुढ्यात बसलेल्या चिंधी नि तिच्या बाळावर गेल आणि या बाळाच्या रडण्यान झोळितल बाळ ऊठू नये म्हणून सगुणेनं चिंधीला त्याला गप्प करला सांगितल.चिंधींनं लेकराल लगेचच पदराखाली घेतल आणि हातानच सगुनेला प्यायला पाणी मागितलं. सगुणा ऊठून पाणी आणायला गेली मागोमाग सुवर्णा आली ,ओट्यावरच्या डब्यातनं दोन पोळ्या ,थोडी भाजी ,भात आणि श्रीखंड ऐका ताटात वाढून चिंधी साठी नेल.

    चिंधीच्या पुढ्यात ताट टेकवत तिला नमस्कार केला आणि नानीनां चिंधी आल्याचा निरोप द्यायला परत घरात गेली.

   सगुना चिंधी जवळ जाऊन विचारपूस करू लागली.

    नानी काठी टेकवत अंगणात आल्या आणि "सुगुणे माय ला पोटभर जेऊ घाल आणि बाळासाठी गोदडी अंथर ,चिंधी झोपव त्याला आणि जेऊन घे बर.कधि आलात ग गावात ? बाकी सगळी कशी आहेत ?"

चिंधी ,"नानी सगळी ठिक हायत जी ,रातच्याला आलो मागच्या गावात बिढार टाकलय या वक्ताला .चार दिवसानं जाऊ म्हणला सुगुनाचा बाप, पण म्हयानं काही थांबन झाल नाही जी ,सुगुनेला भेटुन सहा महिनं झालत . पालावर नेऊ म्हणल आहेे तोवर ,तुम्ही परवावगी देली तरच नेईन जी" 

      नानी ,"अग अस काय बोलतेस ,मी कशाला द्यायला हविय परवानगी ,ने की तुझिच लेक आहे तिला ही तेवढाच तुमचा सहवास ,ने हो ,सुगुने जा हं चार दिवस आई बरोबर ."

चिंधी ,"नानी माझी असली तरी तुमच्या मुळच आहे ति ,तुम्ही सांभाळल नसत तर सुगुनी कवाच गेली असती आम्हाला सोडुन .लय उपकार हायेत नानी या लेकरावर तुमचे .त्या दिवशी तुम्ही सगुनेला त्या राक्षसां पासुन वाचवल आणि तुमच्या आस-याला ठेवल म्हणून मी बि सुगुनेच्या काळजीतनं मुक्त झाली .नाही तर कवा त्या पापी लोकायन पालावरून तिले उचलुन नेली असती समजल बी नसत. अन वर कुठे गेलो असतो पोरीला धुंडाळायला .तुम्ही तवा ठेऊन घेतल सुगुनेले आन त्यायची तक्रार बी केली . पोरीले संरक्षण ,शिक्षण बी मिळाल न त्यायले जेल .आता परत गावाकडे निघालो की नेईन मग कायमची आमच्या सगट.चालेल ना जी."

नानी ,"ने हो ,जिव लागलाय आता तिच्यावर वर सुगुनेची मदतही होते .पण तुझी लेक ,ने हं सोबत केव्हा तरी नेशिलच की पण तिची शाळा तेवढी बंद करू नको हो ."

चिंधी ,"शाळा कशी चालु राहीन नानी ,आम्ही अशे भटकत राहतो ,ऐका जागी कशी व्हणार शाळा .लेकर बोर्डिंगात राहता तवा ते शिकता ,हि पोरीची जात , दोन वरसानं न्हांन आल की देउन टाकू आत्याच्या घरी ."

सुगुना ,"न्हाई माय मी इथेच राहणार ,शाळेत जाऊन खुप खुप शिकणार आणि नानीं सारखी मास्तरीन होऊन दुस-या माझ्या सारखा लेकिनां शिकविन त्यांच्या साठी वसतिगृह उभारेन..मग किती सुगुना पुढे शिकुन मोठ्या व्हतिन.मी इथेच राहणार."

    सुवर्णा हे सगळ साक्षी होऊन ऐकत होती सहजच तिच्या मनात आल .," किती निरागस मुलांत नानीनीं शिकवण्यातुन मूल्य रूजवलित. परोपकाराच मुल्य तसच आज सगुनेत रुजलय ,खरच अस पेरावं ऋण या पुढचा पिढीत प्रत्येकानं..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational