saru pawar

Tragedy

3  

saru pawar

Tragedy

बाजार ! असा कसा ?

बाजार ! असा कसा ?

5 mins
157


बायजा आणि चिंधी आज आठवडे बाजारा साठी वरच्या गावात आल्या ,खाली त्यांचा भाग जरा आडवाटेचा , शिवाय याय जायला अवघ़ड ,डोंगरातून खाली उतरून जाव लागायच .

     मधे अशी आणिक तिन गावं ,शेवटच बायजाच म्हणजे यायला जायला जरा जास्तच कठिण, पावसाळ्यात तर विचारूच नका ,निसरडे रस्ते वरून खाली धो धो येणार पाणी ,सराईत असला तरी ऐखादा सरसरत बूड ठेचून घेऊन खाली यायचा. 

पण पावसाळ्यात इधे सृष्टि सौंदर्याची नूसती उधळणं.काय तो जमिनी वरून दिसणारा नजारा !!आहा !

वरची हिरवी झाडं , त्या मधून बरसणा-या जलधारा , वरून कधि हळूवार संथ वाहणारे तर कधि खळखळ मदमस्त झालेले झरे ,मधेच वर आकाशात डोकाऊन जाणारा इंद्रधनू वाह !वाह! कविला कविता न सुचावी तर नवल..

      डोंगर कपारी धूंध जाहल्या                  सरसर वाहती या जलधारा

     ओढ अनामिक जिवा लावती                    साजन गेला ,डोंगरा पार               आभाळ ढगांनी गर्द काळे                  विजेचे वाजती नगाडे                   धडकी बरते ह्रदयात माझीया               साजन येईल ना आज घरा ते ..                             मंजूळ मंजूळ झरे वाहती                     पानांवर थेंबाच्या माळा लोंबती                  या कूंद श्रावणी हवेत

                 मजला विरहाच्या तव

                  वेळा त्या किती

ये साजना 

ओलांडून ये डोंगराच्या या कपारी

वाट पाहते तुझी साजनी 

ऐ ना ऐना सांज जाहली ..

      येरवी रानातली हि पाखर कशी ,कधी पटकन वर चढायची हे आश्चर्यच .                       आता कुठे हिवाळा सुरू झाला ,थंडी कडाक्याची पडतेच पण कधी शेकोटीची उब तर कधी मोहाची काढलेली दारू त्यांना थंडीत ऊब देते .

आठवडे बाजारात आठवड्याभराच तेल -मिठ -मिरची अस जिन्नस ,मिळाल तर पिठ ,ऐक पुडक भेळभत्ता आणि लेकर सोबत असतिल तर पावभर जिलेबी किंवा पेढा ,मग आठवडा भर कुठल्याच दुकानाच तोंड पाहणं नको .

तसाच बाजार करायचा म्हणून बायजा चिंधीला घेऊन बाजारात आली ,चिंधी आता चौदाची झाली ,रंगान गव्हाळ पण नाकी डोळी रेखीव ,पोर आता लोकांच्या नजरेत भरेल अशी .

म्हणून बायजा आता तिला ऐकटी सोडत नव्हती. त्यांच्यात लग्न मुलगा मुलगी दोघांच्या संमतिन व्हायचे होळीच्या ,भोंग-याच्या बाजारात पसंती कळायची ,मागणी घातली जायची मग कुठे कुठे   त्यांच खास युवां साठीच अस घोटुल/गोटुल त्यात काही दिवसांच्या सहवासातुन ती मुल आयुष्यभराचा जोडिदार निवडणार तसा तोही नाही पटल्यास बदलण्याची मुभा ,म्हणजे आपल्या सारख जबजस्ती सामाजाच्या भितिने निभावण नको..

अस सगळ मोकळ ,समानतेच्या तत्वांवर चालणार तरी पांढर पेश्या समाजाचे नको ते त्यांच्यात शिरल आणि "बाई " म्हणजे उपभोग आणि त्याही पुढे जाऊन आता इतर समाजात मुलींची घटती संख्या म्हणून या मुलींची कधि नात्यातली तर कधि दलालां कडून विक्री होतेय .कधि लग्ना साठी तर कधी वेश्या व्यवसाय ,घरकाम ,बाल मजुर या सगळ्यां साठी.

    बायजाच्या आस पास हे असे अनेक किस्से घडले ..

बायजा जिलेबीच्या दुकाना जवळ चिंधी सोबत ..

तेवढ्यात काल्या आणि मगन तिथे येतात.

बायजा कमरेच्या चंचीतन पन्नासची नोट काढून दुकान दाराला देते तोच ,मगन ,"हे घे ,बायजा माय तू ठेव ते परत ."

बायजा ,"अर कशा पाई ऐवढ ,मगन्या मी देतो की "

काल्या ,"मावशे ,राहू दे चाल तिकड चहा घेऊ तुह्याशी थोड बोलायच व्हत .चाल "

म्हणत बायजा मागे बघत चिंधीला तिच्यामागे ऐण्याचा इशारा करते.

काल्या चहाच्या दुकाना जवळच्या चिंचे खाली बायजाला बसऊन चार चहा सांगतो ,चिंधीं अंग चोरून माय जवळ बसते.

मगन जिलेबीचे पैसे देऊन परततो.

मगन डोळ्यांनी काल्याला काही तरी इशारा करतो .

काल्या ,"मावशे चिंधीच लगिनबीगीन करायचा इचार आहे की न्हाई ,जाणती झाली ते ,करून टाक कि लगिन ."

बायजा ,"हाव रे भो ,पण ते अंगनवडी वाली ताई येते ते सांगत व्हती लेकिच लगिन अठरा पूर्ण झाल्यावर करायच , न्हाई तर पोलिस जेलात बंद करते ."

मगन ,"माय ,ते काईबी म्हणन ,आपल्या लेकिच लगिन कवा करायच ते आपल आपुन ठरवायच त्यायच काय ऐकते तू ,आता त्या चंदा मायच्या दोन लेकीचं लगिन केल काय झाल ??हे आपल भिती दाखवतेत ,व्हत काहीच न्हाई."

बायजा ,"पण मले बी पटत ते ,इवल्या लेकरायच लगिन करते मग पोरी पहिल्याच बायतपनात जीव सोडते ,कोन दवाखाना करत न्हाई ,आपल लेकरू अस जिवानिशी जात 

मी न्हाई करनार म्हाया चिंधीच लगिन आता ,व्हईन लेकरू म्हया घरीच मोठ "चिंधींच्या डोक्यावरून हात फिरवत बायजा तिला घेऊन गावा कडे निघाली.

मगन आणि काल्याचा पहिला डाव फसला ,पण काल्या ,"अय मगन्या अशी न्हाई ऐकत त उचलून घेऊ ऐक दिवस चिंधी ले ,त्या बायजा मवशीच कोन न्हाई मागे पुढे ,करन थोडे दिवस तनतन मग सगळ शांत ."

मगन ,"हा ,ठिकय यार तसच करू ,तो पिंटू शेट लय तगादा लावतोय,त्याले चिंधीं चा फोटो लयच आवडला व्हता "

काल्या ,",मग दुपारची ते लाकड गोळा क-याले गेली कि तडीच तिले गोणित घालू अन तिकडूनच तोरणमाळ मग धुळं ."

   मगन आणि काल्या दुस-याच दिवशी चिंधी जेव्हा ऐकटीच जंगलात लाकड गोळा करायला जाते तेव्हा बेशुध्द करून गोणित भरून गाडीवर तोरणमाळ कडे निघतात.

रात्री ते धुळ्या कडे निघतात पण इकडे बायजाला चिंधी घरी परतत नाही म्हणून मगन आणि काल्याचा संशय येतो .ति तडक अंगणवाडी ताई कडे जाते .पूर्ण हकिकत ऐकल्यावर अंगणवाडी ताई तिला अश्या गुन्ह्या संदर्भात मदती साठी दिलेल्या ऐका संपर्क क्रमाकांवर संपर्क करून माहीती देते.

     अश्या घटनांन मधे पोलीस आणि NGo संयुक्त रित्या काम करतात . या यंत्रणांच जाळ लगेच कामाला लागल आणि आणि ..

मगन आणि काल्याच मोबाई लोकेशन ट्रँक करून धुळे पोलिस आणि "कोवळ्या कळ्या" नावाच्या संस्थेच्या ताई तिथे पोहचतात तर तिथे अजुन ऐक तरूण आणि त्याची आई ,पन्नास हजारात चिंधीची खरेदी करतानां आढळून येते.

अर्थातच मगन ,काल्याला अटक होते पण तो तरूण आणि त्याची आई पोलिसांना ,"भाऊ ,चुकल असेल आमच माफी करा पण पोरीला लग्न करून नांदवायची होती ,आमच्या जातित पोरीच न्हाई जी ,पोरग तिशीत आल म्हणून शेवटी हे ..माफ करा दादा" 

पोलिस ,"हा गुन्हा आहे ,तुमच्यावर कारवाई तर होणारच चला चला जेल मधे ,"

तेव्हा संस्थेच्या ताई,"सर ! ऐक मिनिट मी बोलू का ?"

पोलिस,"हा हा ,ठिक आहे ."

ताई ,"हे बघा गुन्हा तर तुम्ही केलाचय ,अशी नाबालिक पोर विकत घेऊन लग्न करायच म्हणजे काय ? ऐक तर पोरी होऊ देत नाहीच ,त्या जन्मन्या आधीच गर्भात मारून टाकतात आणि मग शोधा परत ,कुठून येणार पोरी .तुम्ही याच पोरीला शिकवण्याची जबाबदारी घेत असाल तर तुमची शिक्षा माफ करायचा विचार केला जाईल."

तो तरूण आणि ती बाई खरतर गुन्हेंगार वाटत नव्हते पण परिस्थिती आणि समाज यां मुळे ते असा गुन्हा करून बसतात ..

ताईच्या या सुझावाला पोलिस पण हामी भरतात ..

  आता चिंधीची रवाणगी परत माय पाशी ,बायजा माय पाशी .

ताई मनात म्हणते बाजार याचा कसा ?असा कसा? बाजारात विकण्या पासुन वाचलेल हे अनमोल धन ! अमुल्य ठेवा !! म्हणून ताई आपल्या मासिकाच्या कवितेतून समाज मनाला साद घालते

लेकी जरा जपुन ठेवा

घेऊ दे जन्म् उरी

गर्भात नका खुडू 

हि कळी

देवी नका म्हणू

चालेल !

पण माय ,बहिण

लेक ,बायको

तर नक्की लागेल

या धरेवर 

प्रेमांकुर फुलवायला


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy